शिक्षक या नात्याने, आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात.प्रभावी अध्यापन आणि प्रशासकीय प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षकांनी योग्य कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. कर्नाटकात सरकारी , अनुदानित, विनाअनुदानीत शाळा कर्नाटक शिक्षण विभागाच्या शैक्षणिक मार्गदर्शिकेचे पालन करतात आणि विविध नोंदी ठेवतात.
कर्नाटकातील मराठी शाळांमधील शिक्षकांसाठी, शैक्षणिक दस्तऐवजांचा सुरेख संग्रह अपरिहार्य आहे. ही संसाधने केवळ अभ्यासक्रमाचे मानकीकरण आणि वितरणास समर्थन देत नाहीत तर शिक्षण अधिक सुलभ, आकर्षक आणि प्रभावी बनवून एकूण शिकण्याचा अनुभव वाढवतात. या दस्तऐवजांचा फायदा घेऊन आणि प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचा अवलंब करून, शिक्षक शैक्षणिक परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊ शकतात.
शैक्षणिक कागदपत्रे अध्यापनाचा कणा म्हणून काम करतात. त्यामध्ये पाठ्यपुस्तके, पाठ योजना, पूरक वाचन साहित्य, क्रियाकलाप मार्गदर्शक आणि मूल्यांकन साधने यासारख्या विविध सामग्रीचा समावेश आहे. कर्नाटकातील मराठी शाळांसाठी, ही कागदपत्रे राज्याच्या शैक्षणिक दर्जा आणि मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या भाषिक गरजा या दोन्हींशी सुसंगत असणे आवश्यक आहे. दर्जेदार शैक्षणिक दस्तऐवज यामध्ये मदत करतात:
2024-25 या शैक्षणिक वर्षात मुख्याध्यापक,वर्ग शिक्षक,विषय शिक्षक यांना अनेक कार्यालयीन दाखले ठेवणे आवश्यक आहेत. उदा. प्रवेश अर्ज,दाखला मागणी पत्र, सेतुबंध शिक्षणासाठी सामर्थ्य, पूर्व परीक्षा, साफल्य परीक्षा व ग्रेड विवरण तक्ता, वर्ग वेळापत्रक, सामूहिक वेळापत्रक, वार्षिक अंदाज पत्रक,SAP,SDP, वार्षिक पाठ नियोजन,पाठांवरील प्रश्नोत्तरे,CCE मूल्यमापन नमूने,शूज सॉक्स योजना फॉरमॅट्स,
इत्यादी..
29,30 मे या दिवशी शाळा प्रारंभोत्सव तयारी करून 31 मे 2024 दिवशी उत्साहाने शाळा प्रारंभोत्सव साजरा करणे.
31.05.2024 रोजी SDMC सभा,मोफत पाठ्यपुस्तके,मोफत गणवेश वितरण करून व गरम दूध,रुचकर चविष्ट जेवण देऊन प्रारंभोत्सव साजरा करावा.
इयत्ता पहिलीसाठी 40 दिवस विद्याप्रवेश (01.06.2024 ते 19 जुलै 2024 पर्यंत)
2री ते 10वी साठी सेतुबंध शिक्षण
2024-25 या शैक्षणिक वर्षातील कांहीं महत्वाची कागदपत्रे नमूना स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
सेतूबंध शिक्षण –
इयत्ता 2री ते 3री साठी 30 दिवस व 4थी ते 10वी साठी 15 दिवस सेतूबंध शिक्षण असून यासाठी सामर्थ्य यादी,पूर्व परीक्षा, साफल्य परीक्षा,परिहार बोधन,ग्रेड विवरण इत्यादी दाखल्याची आवश्यकता असेल.
SAP आणि SDP अहवाल:
– शालेय शैक्षणिक योजना (SAP) आणि शाळा विकास योजना (SDP) मध्ये शाळेची उद्दिष्टे, धोरणे आणि संसाधन वाटपाची रूपरेषा असते.या संबंधी माहिती संकलित ठेवणे आवश्यक असते.
शिक्षकांचे वैयक्तीक दाखले:
वर्ग हजेरी पुस्तिका,वर्ग वेळापत्रक,वैयक्तिक,वेळापत्रक,वार्षिक पाठ योजना,वार्षिक अंदाजपत्रक,पाठ टाचण,डायरी इत्यादी दाखले असणे आवश्यक आहे.
वर्ग वेळापत्रक:
शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 नुसार विषयावर तासिकांची विभागणी करून त्यावर आधारित नमुना वर्ग वेळापत्रक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सामूहिक वेळापत्रक –
शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 वर आधारित वर्ग वेळापत्रकानुसार नाशिकच्या विभागणीनुसार एकूण शाळेचे सामूहिक वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
सेतुबंध ग्रेड विवरण-
वर्ग साहित्य:
– शिक्षकांना पाठ्यपुस्तके,प्रश्नपत्रिका आणि इयत्तेनुसार अभ्यासक्रम सामग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे.
CCE शिक्षकांचे वैयक्तिक रेकॉर्ड:
– या रेकॉर्डमध्ये विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे दाखले,प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका,निकाल इत्यादी आवश्यक आहेत.
शूज सॉक्स योजना फॉरमॅट्स:
– शूज सॉक्स योजनेचा उद्देश शाळेतील मुलांना बूट आणि मोजे प्रदान करणे आहे.शिक्षकांनी या वस्तूंच्या वितरणाशी संबंधित नोंदी ठेवणे आवश्यक आहे.
महत्त्वाची सूचना –
या ठिकाणी दिलेले सर्व दाखले नमुना स्वरूपात असून आपल्या कार्यालयीन सोयीनुसार व आपल्या सोयीनुसार आपण त्यामध्ये बदल करावा.
2024-25 शैक्षणिक वर्षात उपयुक्त शैक्षणिक दाखल्यांचे नमुने खालीलप्रमाणे –
[…] योजना 2024-25 KGID Compulsory- Chart Teacher Transfer Revised Time Table शैक्षणिक व कार्यालयीन नमुने 2024-25 शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 सेतुबंध […]