कर्नाटक राज्यातील सर्व माध्यमातील कली-नली,अनुदानित आणि अनुदानरहित प्राथमिक शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 01/06/2023 पासून 40 दिवसांचा विद्या प्रवेश कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमासंबंधी महत्वाचे मुद्दे…
इयत्ता पहिली वर्गासाठी दिलेल्या विद्याप्रवेश वेळापत्रक प्रमाणे कृतीची अंमलबजावणी करणे.
•प्रत्येक शनिवारी अध्ययनासाठी 5 तासिका व इतर दिवशी प्रत्येकी 8 तासिका यांचा मुलांच्या अध्ययनासाठी वापर होईल असे नियोजन करणे.
•मागील शैक्षणिक वर्षातील एकूण अध्ययन कोपरे यावर्षी वर्गातील अध्ययन संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे चार अध्ययन स्थळे म्हणून परिवर्तन करावयाची आहेत.
1) गणित आणि विज्ञान संशोधन अध्ययन स्थळ.
2) बाहुल्या आणि बिल्डिंग बॉक्स अध्ययन स्थळ.
3) लेखन व वाचन अध्ययन स्थळ.
4) खेळ/ करा आणि शिका/ कलेसाठी एक स्थळ / हस्तकला अध्ययन स्थळ
(साहित्यामध्ये अध्ययन कोपरा म्हणून उल्लेख केला आहे त्याला अध्ययनस्थळ असे वाचावे).
• विद्याप्रवेशासाठी प्रत्येकी अध्ययन पत्रिका (साहित्य) दिलेले आहेत.40 दिवसांमध्ये यातील उपयुक्त अध्ययन कृतीसाठी याचा अवश्य वापर करावा या शैक्षणिक कृती अध्ययनपत्रातील कृतींचे आयोजन गटात किंवा सामूहिकरित्या करावयाचे आहे.
•विद्याप्रवेश कार्यक्रमांतर्गत 40 दिवसानंतर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे व ते विद्यार्थ्यांच्या कृती संचास ते जोडावे.
अवधी | वेळ (वि.प्र.) | कृती | 8 अवधी |
1 | 30 मिनिट | अभिवादन व संभाषण / संवाद | 40 मिनिट |
2 | 30 मिनिट | माझा वेळ | 40 मिनिट |
| 10 मिनिट | छोटी विश्रांती |
|
3 | 30 मिनिट | पायाभूत संख्या ज्ञान | 40 मिनिट |
4 | 30 मिनिट | सृजनशील कला | 40 मिनिट |
| 40 मिनिट | जेवणाची सुट्टी |
|
5 | 60 मिनिट | ¨भाषा विकास ( श्रवण , बोलणे, वाचन, लेखन) | 60 मिनिट |
6 | 30 मिनिट | मैदानी खेळ. | 40 मिनिट |
| 10 मिनिट | माझा वेळ |
|
7 | 20 मिनिट | गोष्ठ | 40 मिनिट |
8 | 10 मिनिट | पुन्हा भेटू | 20 मिनिट |