तू वापरत असलेल्या विविध पोशाखांची नावे लिही.
उत्तर –
- साडी
- धोतर
- कुर्ता-पायजमा
- शर्ट-पँट
- सलवार-कुर्ता
- घागरा-चोली
- लुंगी
- जीन्स-टीशर्ट
- स्कर्ट-टॉप
- शेरवानी
मी कोण आहे?
- मी लोकरीपासून बनतो, मला सर्वजण हिवाळ्यात वापरतात.
उत्तर – → स्वेटर / शाल
2. माझ्यापासून बनलेले कपडे प्रत्येकाला उन्हाळ्यात आवडतात. शेतकरी मला आपल्या शेतात पिकवितात.
उत्तर – → कापूस
तुझा पोशाख तयार करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या समजून घे आणि दिलेल्या जागेत लिहलेल्या शब्दांचा वापर कर.
(या शब्दांचा वापर कर. – पोशाख, विणणे, कापूस, रंग, कपडा, धागा)
पोशाख तयार करण्याच्या वेगवेगळ्या पायऱ्या:
- पोशाख
- रंग
- कपडा
- विणणे
- धागा
- कापूस
वेगवेगळ्या ऋतूमध्ये वापरल्या जाणाऱ्या पोशाखांची नावे लिही.
- पावसाळा: रेनकोट, छत्री, गमबूट
- हिवाळा: स्वेटर, शाल, मफलर
- उन्हाळा: सुती कपडे, टी-शर्ट, स्कर्ट, लूंगी
शिवलेल्या तयार पोशाखांची तीन उदाहरणे लिही.
- शर्ट
- सलवार-कुर्ता
- स्कूल युनिफॉर्म
न शिवता वापरल्या जाणाऱ्या तीन पोशाखांची उदाहरणे लिही.
- साडी
- धोतर
- लुंगी
हे तुला माहीत आहे का?
- प्राचीन काळी लोक वस्त्रे कातडी, लोकर, पाने आणि गवतापासून बनवत होते.
- कापूस आणि रेशीम हे नैसर्गिक धागे आहेत.
- भारतातील कर्नाटक हे राज्य सर्वाधिक रेशीम उत्पादन करते.
- इलकल (बागलकोट, कर्नाटक) येथील साड्या जगभर प्रसिद्ध आहेत.
कर्नाटक मधील वैशिष्ट्यपूर्ण पोशाख:
- पुरुष: धोतर, कुर्ता, टॉवेल
- स्त्रिया: साडी, पोलका किंवा चोळी