शिक्षक या नात्याने, आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात.प्रभावी अध्यापन आणि प्रशासकीय प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षकांनी योग्य कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. कर्नाटकात सरकारी , अनुदानित, विनाअनुदानीत शाळा कर्नाटक शिक्षण विभागाच्या शैक्षणिक मार्गदर्शिकेचे पालन करतात आणि विविध नोंदी ठेवतात.
कर्नाटकातील मराठी शाळांमधील शिक्षकांसाठी, शैक्षणिक दस्तऐवजांचा सुरेख संग्रह अपरिहार्य आहे. ही संसाधने केवळ अभ्यासक्रमाचे मानकीकरण आणि वितरणास समर्थन देत नाहीत तर शिक्षण अधिक सुलभ, आकर्षक आणि प्रभावी बनवून एकूण शिकण्याचा अनुभव वाढवतात. या दस्तऐवजांचा फायदा घेऊन आणि प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचा अवलंब करून,शिक्षक शैक्षणिक परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा करू शकतात आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात योगदान देऊ शकतात.
वेळापत्रकाबद्दल मुलभूत माहिती -:
संदर्भ – शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 (Page | 27)
राज्यातील सर्व सरकारी,अनुदानित,विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी शाळा दैनंदिन वेळापत्रक :-
9.45 ते 10.00 स्वच्छता व परिपाठ
10.00 ते 10.10 क्षीरभाग्य
अध्यापन तासिका खालील वेळापत्रकाप्रमाणे –
प्राथमिक शाळा 1ली ते 7वी/8वी दैनंदिन वेळापत्रक माहिती-
तासिका | वेळ |
पहिली तासिका | 10.10 ते 10.50 |
दुसरी तासिका | 10.50 ते 11.30 |
लहान सुट्टी | 11.30 ते 11.40 |
तिसरी तासिका | 11.40 ते 12.20 |
चौथी तासिका | 12.20 ते 01.00 |
जेवणाची सुट्टी | 01.00 ते 1.40 |
पाचवी तासिका | 1.40 ते 2.20 |
सहावी तासिका | 2.20 ते 3.00 |
लहान सुट्टी | 3.00 ते 3.10 |
सातवी तासिका | 3.10 ते 3.50 |
आठवी तासिका | 3.50 ते 4.30 |
नली-कली वर्ग असल्यास एकूण ८० मिनिटांच्या 4 तासिका वरील वेळापत्रकाप्रमाणे घ्याव्यात.
माध्यमिक शाळा (HIGH SCHOOL) 8वी ते 10 वी
तासिका | वेळ |
पहिली तासिका | 10.10 ते 10.55 |
दुसरी तासिका | 10.55 ते 11.40 |
लहान सुट्टी | 11.40 ते 11.50 |
तिसरी तासिका | 11.50 ते 12.35 |
चौथी तासिका | 12.35 ते 01.20 |
जेवणाची सुट्टी | 01.20 ते 2.05 |
पाचवी तासिका | 2.05 ते 2.50 |
सहावी तासिका | 2.50 ते 3.35 |
लहान सुट्टी | 3.35 ते 3.45 |
सातवी तासिका | 3.45 ते 4.30 |
शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 नुसार विषयावर तासिकांची विभागणी करून त्यावर आधारित नमुना वर्ग वेळापत्रक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
विषयानुसार तासिका विभागणी –
तासिका विभागणी (1ली ते 5वी)
मराठी – 10
कन्नड – 5
इंग्रजी – 5
गणित – 9
परिसर – 9
दै.शि. – 3
स.उ.उ.का. – 3
मू.शि. – 1
एकूण – 45
(शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 PAGE NO.37 मध्ये द्वितीय भाषा इंग्रजी साठी 10 तासिका देण्यात आलेल्या आहेत पण मराठी माध्यमसाठी कन्नड व इंग्रजी अशा 2 द्वितीय भाषा असल्याने दोन्ही भाषेना प्रत्येकी 5 तासिका नियोजन करून वेळापत्रक बनवण्यात आले आहे.)
तासिका विभागणी (6वी ते 8वी)
मराठी 7
कन्नड 5
इंग्रजी 5
गणित 6
विज्ञान 6
समाज 6
व्या.शि. 2
शा.शि. 4
स.उ.उ.का. 3
मू.शि. 1
एकूण तासिका 45
(शैक्षणिक मार्गदर्शिका 2024-25 PAGE NO.38 मध्ये देण्यात आलेल्या तासिका नियोजन करून वेळापत्रक बनवण्यात आले आहे.)
वर्गानुसार वेळापत्रक व सामुहिक वेळापत्रक PDF –
2024-25 शैक्षणिक वर्षातील नमुना दाखले
[…] साहित्य (2री ते 8वी) विद्याप्रवेश वर्ग वेळापत्रक व सामुहिक वेळापत्रक वार्षिक अंदाज पत्रक 1ली ते 8वी SAPSDPशाळा […]