अणू आणि रेणू
अणू – पदार्थाच्या अतिसूक्ष्म कणास अणू असे म्हणतात.
रेणू – दोन किंवा दोनापेक्षा जास्त अणू एकत्र येतात तेव्हा त्यास रेणू असे म्हणतात.
लॅव्हाझिए आणि प्राऊस्ट यांनी रासायनिक संयोजनाचे दोन नियम मांडले.
द्रव्य अक्षय्यतेचा नियम-
रासायनिक क्रियेत द्रव्याचे वस्तुमान निर्माणही होत नाही किंवा नाशही होत नाही.त्यालाच द्रव्य अक्षय्यतेचा नियम असे म्हणतात.
Eg. 2Na+Cl2 → 2NaCl
स्थिर प्रमाणाचा नियम रासायनिक पदार्थांमध्ये मूलद्रव्यांचे वस्तुमान नेहमी प्रमाणात असते म्हणजेच स्थिर असते यालाच स्थिर प्रमाणाचा नियम म्हणतात.
Eg. N2 + 3H2 → 2NH3
प्रमाण – N2 : H2
1 : 3
1. एका विक्रियेत, 5.3 ग्रॅम सोडियम कार्बोनेटची 6 ग्रॅम इथेनॉइक आम्लाशी विक्रिया होऊन 2.2 ग्रॅम कार्बन डाय ऑक्साइड, 0.9 ग्रॅम पाणी आणि 8.2 ग्रॅम सोडियम इथोनेट तयार * झाले. हे परीक्षण द्रव्य अक्षय्यतेच्या नियमाशी मेळ खाते असे दर्शवा.
सोडियम कार्बोनेट + इथेनॉइक आम्ल सोडियम → इथेनॉइट + कार्बन डाय ऑक्साइड + पाणी
1) Na2CO3
= ( 2 × Na ) + ( 1 × C) + (3 × [ O ] )
= ( 2 × 23 ) + ( 1 × 12) + ( 3 × 16)
= 46 + 12 + 48
= 106 u
2) CH3COOH
= ( 1 × C) + ( 3 × H ) + ( 1 × C ) + ( 1 × [O ] ) + ( 1 × [O ] ) + ( 1 × H )
= ( 1 × 12 ) + ( 3 × 1 ) + ( 1 × 12) + ( 1 × 16) + ( 1 × 16) + ( 1 × 1)
= 12 + 3 + 12 + 16 + 16 + 1
= 60 u.
3) CO2
= (1 × C ) + ( 2 + O)
= ( 1 × 12 ) + ( 2 × 16 )
= 2 + 32
= 44 u.
4) H2O
= ( 2 × H ) + ( 1 × [0] )
= ( 2 × 1 ) + ( 1 × 16 )
= 18 u.
5) CH3COOHNa
= ( 1 × C ) + ( 3 × H ) + ( 1 × C ) + ( 1 × [0] ) + ( 1 × [0] ) + ( 1 × Na )
= ( 1 × 12 ) + ( 3 × 1 ) + ( 1 × 12 ) + ( 1 × 16 ) + ( 1 × 16 ) + ( 1 × 23 )
= 12 + 3 + 12 + 16 + 16 + 23
= 82 u.
Na2CO3 + CH3COOH = 2CH3COONa + CO2 + H2O
106 + 2 × 60 → 2 × 82 + 44 + 18
106 + 120 → 164 + 44 + 18
226 u/g → 226 u/g
2) हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे वस्तुमानाच्या 1 : 8 प्रमाणात संयोग होऊन पाणी निर्माण होते.3g. हायड्रोजनशी पूर्णपणे संयोग होण्यास किती ग्रॅम ऑक्सिजनची आवश्यकता आहे?
उत्तर – H2O
= ( 2 × H ) + ( 1 × [0] )
= ( 2 × 1 ) + ( 1 × 16 )
= 18 u.
H2O
2 × 1 : 16
2 : 16
1 : 8
3 : 8 × 3
3g. : 24g
3) कोणते गृहीतक म्हणजे द्रव्य अक्षय्यतेच्या नियमाचा परिणाम आहे?
उत्तर – परमाणु अविभाज्य असून रासायनिक क्रियेत त्यांना निर्माण करता येत नाही किंवा त्यांचा नाश होऊ शकत नाही.हे डॉल्टनच्या परमाणु सिद्धांताचे गृहीतक द्रव्य अक्षय्यतेच्या नियमाचा परिणाम आहे.
4) डॉल्टनच्या परमाणु सिद्धांताचे कोणते गृहीतक स्थिर प्रमाणाच्या नियमाचे स्पष्टीकरण देते?
उत्तर –मूलद्रव्यांच्या परमाणुचे रासायनिक गुणधर्म आणि वस्तुमान समान असतात.
To be continued……..