
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
स्वाध्याय
प्रकरण 14 – भारतीय वैचारिकता आणि भक्ती पंथ
धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी
कालगणना
- शंकराचार्य – 8 वे व 9 वे शतक
- रामानुजाचार्य -11 वे व 12 वे शतक
- बसवेश्वर- 12 वे शतक
- मध्वाचार्य – 13 वे व 14 वे शतक
- श्री चैतन्य – 1486-1534
- गुरु नानक – 1469-1538
- मीराबाई – 1498-1546
- निजामुद्दीन औलिया – 1238-1325
- मोइनुदिन विस्ती – 13 वे शतक
- बंदेनवाज – 15 वे शतक
- सलीम चिस्ती – 16 वे शतक
गटांमध्ये चर्चा करा आणि उत्तर द्या.
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
- गुरुनानक यांच्या गाण्यांना ‘जपजी’ असे म्हणतात.
- शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहिब’ आहे.
- रामानुजाचार्यांचा जन्म श्रीपेरंबुदूर येथे झाला.
- कलीयुगातील राधा असे ‘मीराबाई’ यांना म्हणतात.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
1. शंकराचार्यांनी कोणत्या सुधारणा केल्या?
उत्तर –
- त्यांनी अद्वैत तत्वज्ञान मांडले आणि मानवजात एक असल्याचे प्रतिपादन केले.
- जातिभेद दूर करण्यासाठी प्रयत्न केले.
- बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि शृंगेरी येथे पीठांची स्थापना केली.
- अनेक शास्त्रीय ग्रंथ लिहिले, त्यातील ‘भज गोविंदम्’ आजही प्रसिद्ध आहे.
2. बसवेश्वरांची शिकवण काय आहे?
उत्तर –
- ‘कायकवे कैलास’ म्हणजेच काम हीच पूजा हा त्यांचा मुख्य संदेश होता.
- त्यांनी जातिभेद, मूर्तिपूजा, यज्ञयाग यांना विरोध केला.
- स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ केली.
- ‘अनुभव मंटप’ नावाचे व्यासपीठ स्थापन केले.
- त्यांचे वचन साहित्य मानवतेच्या कल्याणासाठी आहे.
3. वचन साहित्याचे महत्व सांगा. काही वचनकारांची नावे सांगा.
उत्तर –
- वचन साहित्य हे भक्ती आणि समाजसुधारणा यांचे मिश्रण आहे.
- हे गद्य आणि पद्य या दोन्ही रूपात मांडले जाते.
- वचन साहित्याने समाजातील जातीभेद दूर करण्यासाठी मदत केली.
- प्रमुख वचनकार: बसवेश्वर, अक्कमहादेवी, चन्नबसवण्णा, अल्लमप्रभू, जेडर दासिमय्या.
4. भक्ती संतांनी काय उपदेश केला?
उत्तर –
- देवाच्या प्राप्तीसाठी भक्ती हा एकमेव मार्ग आहे.
- जातिभेद, धार्मिक कर्मकांड यांना विरोध केला.
- मानवता आणि प्रेम हा खरा धर्म आहे असे सांगितले.
- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थन केले.
5. भारतातील प्रमुख सूफी संत कोण?
उत्तर –
- निजामुद्दीन औलिया
- मोइनुद्दीन चिस्ती
- बंदेनवाज
- बाबा बुडन
6. भक्ती चळवळीचे परिणाम सांगा.
उत्तर –
- हिंदू-मुस्लिम ऐक्य वाढले.
- स्थानिक भाषांमध्ये धार्मिक साहित्याची निर्मिती झाली.
- सामाजिक समरसता आणि जातीभेद विरहित समाज घडण्यास मदत झाली.
- भक्तीमार्ग लोकप्रिय झाला.
7. बंदेनवाज दर्गा कोठे आहे?
उत्तर – बंदेनवाज दर्गा कलबुर्गी (कर्नाटक) येथे आहे.
8. तुलसीदासांची प्रसिद्ध काव्य रचना कोणती?
उत्तर – ‘रामचरितमानस’ हे तुलसीदासांचे प्रसिद्ध महाकाव्य आहे.
9. गुरु नानकांचा प्रसिद्ध उपदेश कोणता?
उत्तर –
- देवाचे नामस्मरण करा आणि चांगले कर्म करा.
- स्त्री-पुरुष समान आहेत.
- सर्व धर्म समान आहेत.
- “माझ्याकडे लाखो जीभ असत्या तर त्या सर्व जिभांनी भगवंताचे नामस्मरण करीन.”
10. भक्ती पंथाचे सार कोणते?
उत्तर –
- सर्व मानव समान आहेत.
- जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा यांना विरोध.
- मानवतेची सेवा हाच खरा धर्म.
- प्रेम, दयाळूपणा आणि भक्ती हेच मोक्षाचे साधन.
III. गटात चर्चा करून उत्तरे द्या:
1. भक्ती संतांच्या शिकवणीचे विश्लेषण करा.
उत्तर –
- भक्ती संतांनी समाज सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले.
- त्यांनी जातिभेद नाकारून सर्वांना समान अधिकार दिले.
- भक्ती आणि प्रेमाद्वारे मोक्ष मिळतो असे शिकवले.
- त्यांनी स्थानिक भाषेत ग्रंथ लिहून लोकांमध्ये समज वाढवली.
2. समाजसुधारकांमुळे झालेले बदल गटात चर्चा करा.
उत्तर –
- जातीभेद हळूहळू कमी झाले.
- स्त्रियांना अधिक हक्क मिळाले.
- धार्मिक अंधश्रद्धांना विरोध झाला.
- सामाजिक समरसता वाढली आणि मानवतेला महत्त्व आले.