इयत्ता – नववी
विषय – मराठी
2.राजे लोकीं बहुत सगुण असावें
शब्दार्थ व टीपा :
■ धर्मपथप्रवर्तक – धर्माचरण करणारी
■ नियंता – नियंत्रण ठेवणारा
■ ईश्वराज्ञेस – ईश्वराच्या आज्ञेचे
■ अन्यथा केल्याने – पालन न केल्यास
■ क्षोभ – अवकृपा
■ ऊहापोह – चर्चा
■ अप्रमत्त- नम्र
■ अवगणना – निंदा, अपमान
■ अव्याहत – सतत
■ योगक्षेम – चरितार्थ, उपजीविका
■ निर्वाह करणे – पार पाडणे
■ योगक्षेमाचा निर्वाह करणे – चरितार्थाची सोय करून देणे
■ पाकालय – स्वयंपाक घर
■ वसनागार – कपडे ठेवण्याची जागा
■ अलालुची – निर्लोभी
■ परामृष – परामर्श
■ हतास्थ – हलगर्जीपणा करणारे
■ मर्यादा – मान
■ उणी करणे – कमी करणे
■ कुचोद्य – कुचाळे करणे
■ शेरखोर – उन्मत्त
■ बिलाकसूर – बिनचूक
■ हुजरात- राजाचे खास सैन्य
■ नेमस्त करणे – नेमणूक करणे.
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) ‘राजे लोकीं बहुत सगुण असावें‘ या पाठाचे मूल्य हे आहे.
(अ) श्रद्धा
(ब) भक्ती
(क) कर्तव्यनिष्ठा
(ड) मानवत
उत्तर –(क) कर्तव्यनिष्ठा
(आ) ‘आज्ञापत्र‘ या पुस्तकाचे संपादन यांनी केले.
(अ) डॉ. यू. म. पठाण
(ब) डॉ. वि. भि. कोलते (क) प्र.न. जोशी
(ड) ग. प्र. प्रधान
उत्तर –(क) प्र.न. जोशी
(इ) ‘आज्ञापत्रा‘चे लेखन यांनी केले.
(अ) छत्रपती शिवाजी महाराज
(ब) रामचंद्रपंत अमात्य
(क) कवि भूषण
(ड) कृष्णाजी शामराव
उत्तर – (ब) रामचंद्रपंत अमात्य
(ई) अमात्यांना हा किताब मिळाला.
(अ) पद्मश्री
(ब) हुकुमतपन्हा
(क) शौर्यपदक
(ड) सरकार
उत्तर – (ब) हुकुमतपन्हा
उ) ……………म्हणजे राज्याचे जीवन.
(अ) खजीना
(क) सैन्य
(ब) जलसंपत्ती
(ड) खनिजसंपत्ती
उत्तर – (अ) खजीना
प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) मराठ्यांच्या राज्याला संकटातून कोणी निभावून नेले?
उत्तर – मराठ्यांच्या राज्याला संकटातून रामचंद्रपंत अमात्य यांनी निभावून नेले.
(आ) परमेश्वराने याविश्वात प्रथम कोणाला निर्माण केले ?
उत्तर –परमेश्वराने या विश्वात प्रथम राजे लोक यांना निर्माण केले.
(इ) राजाने कशाचे भय बाळगावे?
उत्तर –राजाने ईश्वराच्या अवकृपेचे व अपकृतीचे भय बाळगावे.
(ई) राजाने कोणाचा सहवास दुरून करावा?
उत्तर –राजाने तपस्वी,शीघ्रकोपी यांचा सहवास दुरून करावा.
(उ) राजाने कशाविषयी अतिशय सावध राहावे?
उत्तर –राजाने स्वशरीर संरक्षणाविषयी अतिशय सावध राहावे.
(ऊ) कोणत्या सेवकांची नेमणूक करू नये?
उत्तर –तऱ्हेवाईक,शेरखोर,अमर्याद,बालभाष्य,व्यसनी, कुचाळ्या करणारा व एका धन्यापासून हरामखोरी करून आला असेल
तर अशा सेवकांची नेमणूक करू नये.
(ए) राजाला कोणते व्यसन असू नये ?
उत्तर –राजाला विनोदाचे व्यसन असू नये.
(ऐ) ईश्वराचा क्षोभ केव्हा होईल ?
उत्तर –ईश्वराच्या आज्ञेचे पालन न केल्यास ईश्वराचा क्षोभ होईल.
प्र. 3 (रा) खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ)
ईश्वराने राजास का निर्माण केले ?
उत्तर –संपूर्ण जनतेवर कोणाचे तरी नियंत्रण असले पाहिजे.त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाची तरी गरज असते म्हणून ईश्वराने राजास निर्माण केले.
(आ) राजाने सेवकांची नेमणूक कशी करावी ?
उत्तर –जे लोक प्रामाणिक व हुशार असतात व लालची नसतात.आपल्या कामाला प्रथम स्थान देतात. त्याला कशाचीही अपेक्षा नसावी आणि त्यामध्ये जो कोणी विश्वासू असेल अशा सेवकांची नेमणूक करावी.
(इ) राजाला विनोदाचे व्यसन का नसावे ?
उत्तर –सेवकानं बरोबर विनोद करताना त्या विनोदात मर्यादा राहत नाही.त्यामुळे आपणच आपली मर्यादा घालवून घेतल्याप्रमाणे होते व कमीपणा येतो.म्हणून राजाला विनोदाचे व्यसन नसावे.
(ई) राज्याच्या खजिन्याबद्दल कोणता विचार मांडला?
उत्तर –राजाने जमाखर्चाचा विचार करून जेणेकरून दिवसेंदिवस राज्यात खजिना मोठ्याप्रमाणात राहील.खजिना म्हणजे राज्याचे जीवन.वेळप्रसंगी खजिना जवळ असेल तर सर्व संकटांचा परिहार करता येतो म्हणून खजिना समृद्ध करून ठेवावा आणि त्यावर बारीक लक्ष ठेवावे.
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) “राजे लोकास विनोदचे व्यसन एकंदर नसावे.
संदर्भ – वरील ओळ ‘राजे लोकी बहुत सगुण असावे‘ या पाठातील असून हा पाठ आज्ञापत्र या पुस्तकातून निवडला आहे.
स्पष्टीकरण-: जेव्हा आपण विनोद करतो.तेव्हा त्याला कोणाचेही भान राहत नाही.विनोद करता करता
ते आपली मर्यादा ओलांडू शकतात म्हणून वरील वाक्य म्हटले आहे.
(आ) खजीना म्हणजे राज्याचे जीवन,
संदर्भ –वरील ओळ ‘राजे लोकी बहुत सगुण असावे‘ या पाठातील असून हा पाठ ‘आज्ञापत्र‘ या पुस्तकातून
निवडला आहे.
स्पष्टीकरण -: जेव्हा राजाकडे खजिना असतो. तेव्हा तो कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवू शकतो. वेळप्रसंगी खजिन्याचा वापर करून संकटांचा परिहार करु शकतो. म्हणून वरील वाक्य म्हटले आहे.
(इ)
सकलकार्यामध्ये अपकीर्तीचे भय बहुत वागवावे.
संदर्भ –वरील ओळ ‘राजे लोकी बहुत सगुण असावे‘ या पाठातील असून हा पाठ ‘आज्ञापत्र‘ या पुस्तकातून निवडला आहे.
स्पष्टीकरण -: राजाने जास्तीत जास्त प्रजेला महत्व दिले पाहिजे ही प्रजा करण्यासाठी राज्य दिले हे राजाला समजले पाहिजे व या आज्ञेचे पालन न केल्यास ईश्वराचा क्षोभ होईल आणि कोणत्याही कार्यात राजाने अपकिर्तीचे भय बाळगावे.
(ई) ‘राजे लोकी लहान अथवा थोर कोणी एक सेवकाचा दोष मुखे उच्चारीत जाऊ नये.”
संदर्भ –वरील ओळ ‘राजे लोकी बहुत सगुण असावे‘ या पाठातील असून हा पाठ ‘आज्ञापत्र‘ या पुस्तकातून
निवडला आहे.
स्पष्टीकरण-: जेव्हा काही लोक काम करतात तेव्हा त्याला बक्षीस दिले पाहिजे.तसेच राजवाड्यात लोक काहीतरी करतात तेव्हा त्यांचे दोष त्यांना सगळ्यांसमोर दाखवून देऊ नये.यासाठी ही वाक्य म्हटले आहे.
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची सहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) ब्राह्मण, वैदिक, शास्त्रज्ञ, सत्पुरुष इत्यादी लोकांबरोबर राजाने कसे वागावे?
उत्तर –ब्राह्मण,वैदिक,शास्त्रज्ञ,सत्पुरुष इत्यादी लोकांबरोबर राजाने परमनिष्ठेने वागले पाहिजे. त्यांच्याकडून ज्ञान संपादन करून घेतले पाहिजे. त्यांच्याकडून स्वतःच्या कल्याणाभिवृद्धीसाठी आशीर्वाद घेतला पाहिजे.त्यांच्या चरितार्थाची सोय करून घ्यावी व ब्राह्मण,वैदिक,शास्त्रज्ञ,सत्पुरुषांना
संतुष्ट करावे.
(आ). कालय, जनस्थान, वसनागार, फलस्थान, कारखाने इत्यादी ठिकाणी नेमावयाचे सेवक कसे असावेत ?
उत्तर –जेव्हा राजा पाक आले.जनस्थान,वसनागार, बलस्थान,कारखाने इत्यादी ठिकाणी सेवकांची नेमणूक करतो.तेव्हा त्याने प्रथमत: ते लोक विश्वासू असले पाहिजेत.त्याचबरोबर ते सेवक प्रामाणिक असले पाहिजेत.लालची नसावेत व कामाला महत्त्व देणारे असावेत.याची काळजी घ्यावी व त्यांची परीक्षा घेऊनच सेवकांची नेमणूक करावी.
प्र.6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) परमेश्वराने राजालाच राज्य करण्यास का निर्माण केले?
उत्तर –पूर्ण विश्वाचा निर्माता परमेश्वर असतो.ईश्वराने राजाला निर्माण केले कारण सकल सृष्टीचा रक्षक कुणीतरी असला पाहिजे.जेव्हा सृष्टीमध्ये रक्षक असत नाहीत.तेव्हा धर्माचे पालन करून धर्म प्रवर्तन केले पाहिजे.यासाठी ईश्वराने राजाला निर्माण केले आहे.त्याचप्रमाणे जेव्हा गरीब लोक स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत नाहीत.तेव्हा राजाने त्यांची मदत केली पाहिजे.जनतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी व त्यांच्या रक्षणासाठी एका नियमाची गरज असते.जेंव्हा कोणीतरी जनतेचा पालन पोषण करणारा असतो.तेव्हा त्यांना दिलासा मिळतो व ते न घाबरता सांगू शकतात.यासाठी ईश्वराने राजाला निर्माण केले आहे.
(आ) राजाने सेवकांची नेमणूक परीक्षा करूनच का करावी?
उत्तर –कारण काही लोक असे असतात की,त्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकत नाही. दरबारामध्ये अनेक लोक असतात जे लालची,फक्त स्वतःचा विचार करणारे व दुसर्याची निंदा करणारे असतात.ते ढोंगी व राजाला लुबाडण्यासाठी आलेले असतात.तेव्हा राजा आपल्या सैनिकांची निवड करताना ते विश्वासू आहेत का? लालची आहेत का? हे तपासून म्हणजेच त्यांची परीक्षा घेऊनच नेमणूक करावी.
(इ) आदर्श राजा कसा असावा ?
(ई) राज्य कारभार करताना राजाने कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात असे अमात्य सुचवितात?
भाषाभ्यास :
(अ)वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
योगक्षेमाचा निर्वाह करणे – चरितार्थाची सोय करणे.
ब्राम्हण,वैदिक,शास्त्रज्ञ,सत्पुरुष यांच्या योगक्षेमाचा उदरनिर्वाह करणे राज्याचे कर्तव्य आहे.
उणी करणे – कमी करणे.
राजाला विनोदाचे व्यसन असल्यास तो आपली मर्यादा आपणच उणी करून घेतो.
नेमणूक करणे – नेमस्त करणे.
राजाने विश्वासू सेवकांची नेमस्त करावी.
(आ) समानार्थी शब्द लिहा.
योगक्षेम – चरितार्थ
मर्यादा – मान
अप्रमत्त – नम्र
निस्पृह – स्पष्ट
अवगणना – अपमान
(इ) विरुद्धार्थी शब्द लिहा.
शेरखोर r नम्र
अपकीर्ती r कीर्ती
अंध r डोळस
अनाथ r सनाथ
विश्वास r अविश्वास
संतुष्ट r असंतुष्ट
व्यसनी r निर्व्यसनी
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करा..
मराठी व्याकरण
शब्दांच्या जाती संपुर्ण माहिती
शब्दांच्या जाती
1. नाम व नामाचे प्रकार
2.सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार
3.विशेषण व प्रकार
4.क्रियापद
5.क्रियाविशेषण अव्यय
6. शब्दयोगी अव्यय
7.उभयान्वयी अव्यय
8.केवलप्रयोगी/ उदगारवाचक अव्यय
वचन विचार
वाक्याचे प्रकार