Regarding Age crateria for Admission to 1st class

  इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे वय सहा करणेबाबत….
Regarding Age crateria for Admission to 1st class

Regarding Age crateria for Admission to 1st class
Regarding Age crateria for Admission to 1st class
कर्नाटक राज्य सरकारच्या दि. 23.05.२०१८ रोजीच्या आदेशानुसार राज्यातील सर्व सरकारी,अनुदानित व विना अनिदानित शाळेतील इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांना किमान 5 वर्षे 5 महिने व कमाल 7 वर्षे वयाची अट घालण्यात आली होती.याला संबंधित राज्यपत्र सरकारी आदेश संख्या ED 60 PGC 2020 DATE – 20.03.2020मध्ये शैक्षणिक वर्षाच्या जून 1 तारखेला LKG प्रवेशासाठी 3 वर्षे 5 महिने व 1ली प्रवेशासाठी 5 वर्षे 5 महिने वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती.

        सरकारी आदेश क्रमांक – ED 708 PGC 2017 दिनांक – 23.05.२०१८ आणि राज्य पत्र ED 60 PGC 2020 DATE – 20.03.2020 मागे घेऊन RTE अधिनियम 2009 आणि सक्तीचे शिक्षण नियम 2012 नुसार जून 1 तारखेला 6 वर्षे पूर्ण असणाऱ्या मुलांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात यावा असा प्रस्ताव आयुक्त सार्वजनिक शिक्षण विभाग बेंगलोर यांनी सादर केला होता.

वरील प्रस्तावाचा सर्वंकष विचार करून खालील आदेश देण्यात आला आहे…

सरकारी आदेश क्रमांक:EP 260 PGC 2021,दिनांक 26.07.2022

वरील प्रस्तावाचा विचार करून सरकारी आदेश क्रमांक – ED 708 PGC 2017 दिनांक – 23.05.२०१८ आणि राज्य पत्र ED 60 PGC 2020 DATE – 20.03.2020 मागे घेऊन RTE अधिनियम 2009 आणि सक्तीचे शिक्षण नियम 2012 नुसार शैक्षणिक वर्षाच्या 1 जून रोजी 06 वर्षे पूर्ण केलेल्या मुलानाच पहिलीत प्रवेश दिला जावा.असा आदेश देण्यात आला आहे.

शुद्धिपत्रक (आदेश क्रमांक:EP 287 PGC 2022,दिनांक 15.11.2022)

सरकारी आदेश क्रमांक:EP 260 PGC 2021,दिनांक 26.07.2022 मधील भाग 3 मध्ये शैक्षणिक वर्षाच्या 1 जून रोजी 06 वर्षे पूर्ण केलेल्या मुलानाच इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जावा असा आदेश दिला होता.सदर नियमानुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांचे वय 1 जून रोजी 06वर्षे पूर्ण असणे अनिवार्य असेल असे वाचावे.असे EP 287 PGC 2022,दिनांक 15.11.2022 या शुद्धीपत्रकात म्हटले आहे.

  वरील बदल वगळता सरकारी आदेश क्रमांक:EP 260 PGC 2021,दिनांक 26.07.2022 मध्ये कोणताही बदल होणार नाही.

  वरील आदेश क्रमांक EP 260 PGC 2021,दिनांक 26.07.2022 आणि आदेश क्रमांक:EP 287 PGC 2022,दिनांक 15.11.2022 यांचा संदर्भ घेऊन निर्देशक प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिनांक 17.12.२०२२ रोजी नवीन आदेशात म्हटले आहे की, RTE अधिनियम 2009 आणि सक्तीचे शिक्षण नियम 2012 नुसार 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून 1 जून रोजी 06 वर्षे पूर्ण केलेल्या मुलानाच पहिलीत प्रवेश दिला जावा.संबंधित अधिकारी व शाळा प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असे आदेशात म्हटले.

  

अधिकृत माहितीसाठी सरकारी आदेश खालील प्रमाणे…

Regarding Age crateria for Admission to 1st class
Regarding Age crateria for Admission to 1st class
 


 


Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *