लेखक परिचय
:
वि. वा. शिरवाडकर (1912-1999)
पूर्ण नाव – विष्णू वामन शिरवाडकर
जन्म – 27 फेब्रुवारी 1912
काव्यनाम/टोपणनाव – कुसुमाग्रज
हे मराठीतील प्रतिभासंपन्न ज्येष्ठ कवी, नाटककार, कादंबरीकार व ललितलेखक म्हणून ओळखले जातात.
प्रसिद्ध काव्यसंग्रह – ‘विशाखा‘, ‘जीवनलहरी‘, ‘हिमरेषा‘, ‘वादळवेल‘, ‘किनारा‘, ‘स्वगत‘, ‘मराठी माती‘, ‘प्रवासी पक्षी‘, ‘मुक्तायन‘ इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.
प्रसिद्ध नाटके – ‘नटसम्राट‘, ‘कौंतेय‘, ‘ययाती आणि देवयानी‘, ‘वीज म्हणाली धरतीला‘, ‘चंद्र जिथे उगवत नाही,’ ‘दूरचे दिवे‘ इ. त्यांची प्रसिद्ध नाटके.
प्रसिद्ध कादंबरी – ‘कल्पनेच्या तीरावर‘, ‘जान्हवी‘, ‘वैष्णवी‘ इ. कादंबऱ्या असे विविध प्रकारचे
साहित्य प्रसिद्ध आहे.
1964 मध्ये मडगाव येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1988चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
कुसुमाग्रजांनी केलेल्या मराठी भाषा साहित्यातील कार्यांचा गौरव म्हणून 27 फ्देबृवारी हा त्यांचा जन्म दिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
‘कौंतेय‘ या नाटकातून हा पाठ घेण्यात आला आहे. या पाठात अर्जुन आणि कर्ण यांचा युद्धप्रसंग, कर्णाच्या मनात निर्माण झालेले प्रश्न आणि कृतीविषयी असणारे कर्णाचे प्रेम आणि जांघिलाची स्वामीनिष्ठा व्यक्त होते.
शब्दार्थ :
■ करंटा-अभागी
■ अधाशीपणे – हावरटपणे
■ विरथ- रथहीन
■ लांछन – कलंक
■ निकराचा हल्ला- शर्थीचे आक्रमण
■ अस्त्र – मंत्रोच्चाराने उगारण्याचे आयुध (हत्यार)
■ शस्त्रविद्या- हत्यार चालविण्याची विद्या
■ ऋण- उपकार
■ वध – ठार मारणे
■ गर्वाढ्य -अहंकारी
■ सुतपुत्र- सारथ्याचा मुलगा
■ दांभिक- खोटा दिखाऊपणा, अहंकार
■मानखंडना – अपमान
■कुरुक्षेत्र- युद्धभूमी
■ अधम- नीच
■ अधर्म- धर्माला सोडून
■भ्रांत- साशंक, घोटाळ्यात पडलेला
■ उद्विग्न- हताश
■ बेचैन- अस्वस्थ, उदास
टीपा:
■ कर्ण-कुंतीला कुमारीका अवस्थेत दिव्य मंत्राच्या सहाय्याने सूर्यापासून झालेला पुत्र.पाच पांडवांचा सर्वात मोठा भाऊ परंतु तो एका सारथ्याने व त्याच्या राधा नावाच्या पत्नीने सांभाळला म्हणूनच तो सूतपुत्र म्हणून ओळखला गेला.
■ जांघिल कर्णाचा स्वामीनिष्ठ सेवक
■ कुंती-पंडुराजाची पत्नी, पाच पांडवांची व कर्णाची माता.
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ) पृथ्वीने कोणाचा पक्ष घेतला?
(अ) कौरवांचा
(ब) पांडवांचा
(क) कुंतीचा
(ड) कृष्णाचा
उत्तर – (ब) पांडवांचा
(आ) विरथ व निःशस्त्र कोण झाले होते ?
(अ) शल्य
(ब) जांघिल
(क) दुर्योधन
(ड) कर्ण
उत्तर – (ड) कर्ण
(इ) उदारपणाने जीवाचं दानं देणारा खरा देवमाणूस कोण ?
(अ) भीष्म
(ब) अर्जुन
(क) जांघिल
(ड) सात्यकी
उत्तर – (क) जांघिल
(ई) मातृहत्येचं पातक पत्करण्यासही तयार व्हावे असे कोणास वाटते ?
(अ) अर्जुन
(ब) कुंती
(क) भीम
(ड) कर्ण
उत्तर – (क) भीम
(उ) कुंतीने, कर्णबाळास जन्माला घालताच काय केले ?
(अ) पदराखाली घेतले
(ब) वात्सल्याने पाहिले
(क) त्याग केला
(ड) आपल्यासोबत नेले
उत्तर –(क) त्याग केला
प्र. 2 (रा)खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) कर्णाला कशाची भ्रांत पडली होती ?
उत्तर –कर्णाला त्याचा पक्ष कोणतायाची भ्रांत पडली होती.
(आ) जांघिल कोणाचा सेवक होता?
उत्तर
– जांघिल कर्णाचा सेवक होता.
(इ) कौरवांचा आधारस्तंभ कोणाला म्हटले आहे ?
उत्तर– कौरवांचा आधारस्तंभ असे कर्णाला म्हटले आहे.
(ई) कर्णाचा वध कोणी केला?
उत्तर – कर्णाचा वध अर्जुनाने केला.
(उ) पांडवांच्या मातेचे नाव काय?
उत्तर –पांडवांच्या मातीचे नाव कुंती होते.
(ऊ) जांघिलाने कोणाच्या सेनेचा
पराभव केला ?
उत्तर – जांघिलाने पांडवाच्या सेनेचा पराभव केला.
(ए) कर्णाचे शल्य कोणते ?
उत्तर – जन्मापासून हरवलेली त्याग करणारी आई तिनंच कर्णाला जन्म दिला व मरणही दिले हे
करण्याचे शल्य होते.
प्र. 3 (रा)खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कौरवांनी कोणते कारस्थान केले होते ?
उत्तर
– कौरवानी लक्षात पांडवांना जाळण्याचे कारस्थान केले होते.द्यूतामध्ये असत्याचा आश्रय घेतला होता.भर राज्यमंडळात
पांचालीच्या निरीला हात घातला होता.अशी कौरवांनी कारस्थाने केली होती.
(आ) जांघिलाच्या छातीची चाळणी कोणी व का केली?
उत्तर – जांघिलाच्या छातीची चाळणी सात्यकीने बाणाचा वर्षाव करून केली होती.कारण त्यांना जांघिलबरोबर युद्ध करून कर्णाचा वध करायचा होता.
(इ) कर्ण विरथ का झाला?
उत्तर – युद्धाच्या वेळी रणांगणावर कर्णाच्या रथाचे चक्र मातीमध्येच म्हणजेच पृथ्वीच्या पोटात रुतले तेव्हा ते चक्र चिखलातून काढता येत नव्हते म्हणून कर्ण विरथ झाला.
(ई) कर्णाच्या मृत्यूनंतर भीमाने आपला संताप कसा व्यक्त केला आहे?
उत्तर – अर्जुनाने कर्णाचा वध केल्यानंतर कुंतीने पांडवांना सांगितले की,कर्ण तुमचा मोठा भाऊ आहे.हे समजतात भीमाला संताप झाला.त्याने कुंतीला म्हटले मातृहत्त्येचं पातक पत्करून सुद्धा या गदेने कुंतीच्या मस्तकाचा चुराडा करून टाकावा असं वाटतंय.
प्र.4(था)संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ)‘तुझी जागा – माझ्या हृदयाजवळ आहे, पायाशी नाही!‘
संदर्भ – वरील वाक्य ‘कर्णाचे शल्य‘ या पाठातील असून प्रस्तुत पाठ विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिला आहे.
स्पष्टीकरण
–युद्ध चालू असताना जांघिल सात्यकीबरोबर लढताना त्याच्या छातीची चाळणी होते.तरी देखील तो सात्यकीचा पराभव करतो व शेवटचे क्षण मोजत असताना कर्णाच्या जवळ येतो आणि त्याच्या पायाशी येऊन पायावर मस्तक ठेवतो.त्यावेळी कर्णाने त्याला उद्देशून वरील वाक्य म्हटले आहे.
(आ)‘आई गं मारा, कर्णालाही अधर्मानंच मारा !”
संदर्भ
– वरील वाक्य ‘कर्णाचे शल्य‘ या पाठातील असून प्रस्तुत पाठ विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिला आहे.
स्पष्टीकरण
–
युद्धभूमीवर युद्ध करत असताना ज्यावेळी कर्ण विरथ झाला.त्यावेळी रथाचे चक्र बाहेर
काढत असताना तो खूप धडपड करत होता.पांडवांच्या बाणाचा वर्षाव सुरू होता.त्यावेळी
कर्णाने वरील वाक्य म्हटले आहे.
(इ) माझा कर्ण गेला! माझा मुलगा गेला !
संदर्भ – वरील वाक्य ‘कर्णाचे शल्य‘ या पाठातील असून प्रस्तुत पाठ विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिला आहे.
स्पष्टीकरण – जेव्हा युद्धभूमीवर पांडवांना कर्णाचा राग येतो व अर्जुन बाणाच्या वर्षावांनी कर्णाचा वध करतो.तेव्हा कर्ण रथाजवळ कोसळतो.त्यावेळी कुंती धावत येते व कर्णाचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन वरील वाक्य म्हणते.
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) कौरवांनी कोणता अधर्म केला होता?
उत्तर – कौरवांनी लक्षात पांडवांना जाळण्याचे कारस्थान केले होते.द्युतामध्ये असताना असत्याचा आश्रय घेतला होता.भर राजमंडळात पांचालीच्या निरीत हात घातला.असे अनेक अधर्म कौरवांनी केले होते.
(आ) जांघिलाने कर्णाला शेवटी कोणती विनंती केली ?
उत्तर – जांघिल कर्णाला शेवटी एक आग्रहाची विनंती करतो की,याठिकाणी चाक उपसून काढण्याच्या नादामध्ये राहू नका.अर्जुन पुन्हा आपल्यावर चढाई करण्याच्या तयारीने येत आहे,म्हणून आग्रहाचे सांगणे होते की,तुम्ही माघारी जा एवढे बोलून जांघिल निरोप घेतो.
(इ)एका आवाजाने अर्जुनास कोणता संदेश दिला ?
उत्तर – कुरुक्षेत्रावर जेव्हा महाभारत घडत होते.तेव्हा कर्ण आपले चाक काढण्यात दंग असते.तेव्हा अर्जुन त्याच्यावर बाणांचा वर्षाव करीत असतो.त्यावेळी कर्ण मोठ्याने अर्जुनाला अधर्म करू नकोस म्हणून ओरडू लागतो.तेव्हा एक आवाज अर्जुनाला सांगतो हीच ती वेळ आहे कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस.हा कर्ण धर्मयुद्धात अजिंक्य आहे.पृथ्वीने त्याचा रथचक्र गिळून तुला आज अखेरची संधी दिली आहे.त्याचा लाभ घे व सुतपुत्राचा नायनाट कर.असा एका आवाजाने अर्जुनास संदेश दिला.
प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) कर्णाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर – कर्ण हा सूतपुत्र होता.तो कुंतीचा मुलगा व सर्वात मोठा पांडव होता.त्याचा स्वभाव चांगुलपणाचा व दयेने भरलेला होता.तो सेवकांवर मित्राप्रमाणे प्रेम करीत असे. जरी कौरव अधर्माने वागत असले तरी कर्णाने त्यांना कधीच दगा दिला नाही.सतत उपकाराची जाणीव ठेवली. पांडव हे त्याचे सख्खे भाऊ होते.पण त्यांच्यावर भावाप्रमाणे त्यांनी कधीच प्रेम केले नाही.सैनिकांना व गोरगरिबांना आपल्या हृदयात ठेवले.
(आ) कुंतीच्या स्वभावाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर – कुंती ही शूरवीर स्त्री होती.तिच्या पोटी वीर पुरुषाचा जन्म झाला.कर्ण हा कुंतीचा सर्वात मोठा मुलगा होता व युद्धभूमीवरील एक श्रेष्ठ महावीर होता.कुंती आपल्या मुलावर जीवापर प्रेम करत होती.तिच्या स्वभावामध्ये त्यागाचा गुण ममतेचा गुण झळकून येतो.सहज स्त्रिया युद्धभूमीवर जात नाहीत.पण कुंती आपल्याप्रमाणे कुणाचाही विचार न करता युद्धभूमीवर गेली व आपल्या पुत्राचे म्हणजेच कर्णाचे मस्तक स्वतःच्या मांडीवर घेऊन घडलेली हकीकत सांगत होती.
(इ) जांघिलाची व्यक्तिरेखा रेखाटा.
उत्तर – जांघिल हा एक शूरवीर सैनिक होता व कर्णाचा मोठा जिवलग मित्र होता.तो कर्णाच्या आज्ञेचे पालन करीन होता.युद्धाच्यावेळी सात्यकीच्या सेनेचा चुराडा करून मरता मरता त्यालाही परतवून लावतो.जांघिल देवमाणूस होता.किती सहजपणानं,किती उदारपणाने जांघिलने आपल्या जीवाचे दान केले व जांघिल कर्णाला शेवटची विनंती करतो की,तुम्ही माघारी जा असे म्हणून जांघिल निरोप घेतो.
भाषाभ्यास
:
(अ) वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तुटून पडणे – आक्रमण करणे
अर्जुन कर्णावर तुटून पडला.
भ्रांत पडणे – शंका येणे
कर्णाला भ्रांत पडली.
बेचैन होणे – अस्वस्थ होणे
श्रीकृष्णविना गोकुळ बेचैन झाले होते.
उद्विग्न होणे – हताश होणे
कबड्डी मध्ये हरल्याने मुले उद्विग्न झाली.
मानखंडना होणे – अपमान करणे
वर्गामध्ये कोणीही कोणाची मानखंडना करू नये.
कदर करणे – मान देणे
सर्वांनी वडीलधाऱ्यांची कदर करावी
डांगोरा पिटणे – गोंधळ करणे
मुलांनी वर्गामध्ये डांगोरा पिटवला.
(आ) समानार्थी शब्द लिहा.
सर्प – साप
दुःख – क्लेश
मृत्यू – मरण,निधन
चक्र – चाक
लांछन – कलंक
(इ) खालील शब्दांचे संधी सोडवा.
राजेश्वर – राजा + ईश्वर
निःशस्त्र – नि: + शस्त्र
निःपात – नि: + पात
परमेश्वर – परम + ईश्वर
महात्मा – महान + आत्मा
(ई) खालील शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
रथचक्र – रथाचे चक्र
षष्ठी तत्पुरूष समास
असत्य
– सत्य नाही असे
नञ तत्पुरूष समास
सुतपुत्र – सारथ्याचा मुलगा
षष्ठी तत्पुरूष समास
महारथी – महान असा योद्धा
कर्मधारय तत्पुरूष समास
अधर्म
– धर्म
नाही तो
नञ तत्पुरूष समास
सर्वश्रेष्ठ – सर्वात श्रेष्ठ असा
कर्मधारय तत्पुरूष समास
महात्मा – महान असा आत्मा
कर्मधारय तत्पुरूष समास
(उ) खालील ओळीतील अलंकार ओळखा
(अ) काळोखात शस्त्रांच्या प्रकाशरेषा विजांप्रमाणे लखलखतात
उपमा अलंकार
(आ) हे रथाचे चक्र नव्हे! दुर्दैवाचे चक्र आहे.
रुपक अलंकार
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..
Thank you