इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
प्रकरण -1
साधने
स्वाध्याय
1. योग्य शब्द वापरून गाळलेल्या जागा भरा.
1. दोन प्रकारचे लिखित साहित्य स्थानिक साहित्य आणि विदेशी साहित्य.
2. अश्वघोषाने लिहिलेले लिखित साधन बुद्ध चरित्र
3. कन्नड भाषेतील पहिला शिलालेख हाल्मीडी होय .
II. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा.
4. साधने म्हणजे काय ?
उत्तर –इतिहासाची मांडणी करण्याकरिता मूलभूत घटकांची गरज आहे त्या घटकांना साधने म्हणतात.
5. देशी साधने व विदेशी साधनांची प्रत्येकी दोन उदाहरणे द्या?
उत्तर –
देशी साधने :–
विशाखा दत्ताचे :-मुद्रारक्षस
कल्हणाचे :- राजतरंगिणी
अश्वघोषाचे :-बुद्ध चरित्र
विदेशी साधने :-
मेगॅस्थनचे :- इंडिका
यु . एन.त्संग :- सियूकी
फाहियान :- फु – को -की
6. नाणेशास्त्र म्हणजे काय?
उत्तर – नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे नाणे शास्त्र.
7. पुरातत्व साधने म्हणजे काय? उदाहरणासह स्पष्ट करा ?
उत्तर – लिपी, नानी, स्मारके, गाडगी, थडगी ,मडकी ,आणि इतर कलाकृती ज्या उत्कलनामध्ये मिळालेले आहेत त्यांना पुरातत्त्व साधने म्हणतात.
1) लिपी :-धर्म ,संस्कृती, अर्थव्यवस्था, व्यवस्थापन, शिलालेख ,दगडी खांबावरील लिपी इत्यादी .
2) नाणी :– काळ, धर्म, संस्कृती ,राज्यव्यवस्था, सामाजिक ,आर्थिक परिस्थितीची माहिती मिळते.
3) स्मारके थडगी अवशेष :- खांब , बस्ती ,मंदिरे, स्मारके , थडगी स्थगित अवशेष सापडतात.
4) मौखिक साधने :-मानवाने आपले अनुभव गीत काव्य कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले
5) आख्यायिका पौराणिक कथा :-गोष्टी कथा मार्फत ऐतिहासिक धाडसी वृत्ती चे चित्रण पाहावयास मिळते..
8.मौखिक साहित्यातून स्थानिक इतीहास समजून घेण्यास मदत होते.स्पष्ट करा. उत्तर – मौखिक साहित्यामध्ये कविता, गाणी, नृत्यगीत आणि पिढ्यानपिढ्या आलेल्या मौखिक कथांचा समावेश होतो.ते मानवी समाजाचे अनुभव आणि आठवणी जतन करतात, स्थानिक इतिहास समजून घेण्यास मदत करतात.मौखिक साहित्य स्थानिक नायकांचे जीवन आणि कथा, महत्त्वपूर्ण घटना, प्रथा आणि परंपरा याविषयी माहिती देतात. उदा. केम्पेगौडा, टिपू सुलतान आणि कित्तुरु राणी चेन्नम्मा यांसारख्या व्यक्तिमत्त्वांबद्दल विपुल मौखिक कथा आहेत.
प्रकरण 13. राज्यशास्त्राचा अर्थ व महत्व या पाठाच्या प्रश्नोत्तरे – CLICK HERE
इतर प्रकरणावरील प्रश्नोत्तरे
4. जगातील कांहीं महत्त्वाच्या संस्कृती
3.भारतातील प्राचीन संस्कृती : सिंधू – सरस्वती संस्कृती व वेदकालीन संस्कृती