अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण – 5
सनातन धर्म
स्वाध्याय
I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा :
1) वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान आहे.
2) उपनिषद मुख्यतः तात्विक चर्चेच्या स्वरूपात आहेत
3) वेदांच्या उच्चारासाठी आणि अभ्यासासाठी तयार केलेले सहाय्यक क्षेत्रे वेदांग आहेत.
4) भारतातील महान महाकाव्ये रामायण आणि महाभारत ही होय.
5) भारतीय तत्वज्ञानाचे आधारस्तंभ दर्शन आहे.
II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
6) वेदांची नावे सांगा.
उत्तर – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ही वेदांची नावे आहेत.
7) वेदांचे चार विभात (स्कंद) कोणते ?
उत्तर –वेदांचे चार विभाग (स्कंद) म्हणजे संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद हे होय.
8) स्मृती म्हणजे काय? त्यांना धर्मसूत्रेही का म्हणतात ?
उत्तर – स्मृती म्हणजेच स्मरण.स्मृती वेदोत्तर काळातील वेद आणि उपनिषदांची आठवण करून देणारी आहेत.त्यांना धर्मसूत्रे देखील म्हटले जाते कारण ते दैनंदिन जीवनाचे नियम,आचार, शिष्टाचार आणि चांगले चारित्र्य व आचरण यांचे नियम सांगतात.
9) महत्वाची दर्शने कोणती ?
उत्तर – न्याय, वैश्विक, योग, सांख्य, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही महत्वाची दर्शने आहेत.
10) आगम परंपराच्या प्रमुख शाखा किती व कोणकोणत्याा ?
उत्तर – ‘आगम परंपरा’च्या तीन प्रमुख शाखा आहेत:वैष्णव, शैव आणि शाक्त.
11) सनातन धर्माचा संदेश काय आहे ?
उत्तर – ‘सनातन धर्माचा’ संदेश म्हणजे सार्वभौम सुख,चिंता आणि रोगांपासून मुक्ती,चांगुलपणाची दृष्टी आणि प्रत्येकाची शांती आणि समृद्धीची इच्छा यासारख्या परोपकारी विचारांचा आणि तत्त्वांचा प्रचार करणे.
इतर प्रकरणावरील प्रश्नोत्तरे
4. जगातील कांहीं महत्त्वाच्या संस्कृती
3.भारतातील प्राचीन संस्कृती : सिंधू – सरस्वती संस्कृती व वेदकालीन संस्कृती