7th Science Question Answers 1.Plant Nutrition|1.वनस्पतींचे पोषण –

इयत्ता – सातवी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

image

आपण काय शिकलात?

  • सर्व सजीव आहार सेवन करतात आणि त्याचा वापर ऊर्जा मिळविण्यासाठी करतात, जी शरीराच्या वाढीसाठी आणि प्रतिपालनासाठी आवश्यक असते.
  • हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करुन घेतात. त्या स्वयंपोषी आहेत.
  • कस्कुटासारखी वनस्पती ही परोपजीवी आहे. ती आपला आहार यजमान वृक्षाकडून घेते.
  • अन्नाच्या संश्लेषणासाठी वनस्पती कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि खनिजे या सारख्या साध्या रासायनिक पदार्थांचा वापर करतात.
  • हरित द्रव्य, पाणी, कार्बन डायऑक्साइड आणि सूर्य प्रकाश हे प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी अत्यावश्यक आहेत.
  • कार्बोहाइड्रेटसारखे संकीर्ण रासायनिक पदार्थ हे प्रकाशसंश्लेषण क्रियेचे उत्पादन आहे.
  • वनस्पती हरीत द्रव्याच्या सहाय्याने सौर ऊर्जा शोषून अन्नाच्या स्वरुपात पानामध्ये साठविली जाते.
  • प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी ऑक्सिजनची निर्मिती होते.
  • प्रकाश संश्लेषण क्रियेच्या वेळी मुक्त झालेला ऑक्सिजन इतर सजीव आपल्या जगण्यासाठी वापरतात.
  • मृत अथवा कुजणाऱ्या पदार्थापासून बुरशी अथवा कवक आपले पोषण करुन घेतात. ते शवोपजीवी आहेत.
  • काही वनस्पती आणि सर्व प्राणी आपल्या पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात.

 

उत्तर: सजीवांना शरीराच्या वाढीसाठी, उर्जा निर्माण करण्यासाठी आणि शरीरातील खराब भाग दुरुस्त करून योग्य प्रकारे काम करण्यासाठी अन्नाची गरज असते. म्हणून सर्व सजीवांना आहाराची आवश्यकता असते.

परोपजीवी आणि शवोपजीवी यातील फरक खालीलप्रमाणे:

वैशिष्ट्यपरोपजीवी (Parasites)शवोपजीवी (Saprotrophs)
अन्न कोठून मिळवतात?ते दुसऱ्या जिवंत वनस्पती किंवा प्राण्यांकडून अन्न घेतात.ते मेलेल्या किंवा कुजलेल्या गोष्टींमधून अन्न घेतात.
उदाहरणेअमरवेल (दुसऱ्या झाडावर वाढते), उवा (माणसाच्या केसात असतात),कुस्कुटाआळंबी (मशरूम), बुरशी (ब्रेडवर येणारी बुरशी),जीवाणू
दुसऱ्या सजीवावर परिणामते ज्याच्याकडून अन्न घेतात त्याला ‘यजमान’ म्हणतात आणि यजमानाला नुकसान पोहोचवतात.ते मेलेल्या गोष्टींना कुजवून साफ करतात, पर्यावरणासाठी चांगले असतात.
हरितद्रव्यत्यांच्यात हरितद्रव्य नसते.त्यांच्यात हरितद्रव्य नसते.

उत्तर: पानावर आयोडीन सोल्यूशन टाकले असता जर ते निळसर काळे झाले, तर त्यात स्टार्च आहे हे सिद्ध होते.

4. हिरव्या वनस्पतींमध्ये होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया थोडक्यात समजवा.

उत्तर: प्रकाश संश्लेषण क्रिया वनस्पतीच्या पानामध्ये होते.सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने पानांतील हरितद्रव्य अन्न तयार करते.यावेळी ऑक्सिजन वायू बाहेर टाकला जातो आणि तयार झालेलं अन्न स्टार्च स्वरूपात साठवले जाते.

(a) हिरव्या वनस्पती स्वतः अन्न तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात.

(b) तयार अन्न स्टार्चच्या स्वरूपात साठवले जाते.

(c) सौर ऊर्जा शोषण करणाऱ्या रंगद्रव्याला हरितद्रव्य (क्लोरोफिल) म्हणतात.

(d) प्रकाश संश्लेषणात वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन वायू सोडतात.

उत्तर–

सूर्य ➝ वनस्पती ➝ शाकाहारी प्राणी ➝ मांसाहारी प्राणी ➝ मिश्राहारी ➝ मृत सजीव ➝ शवोपजीवी

(i) पिवळ्या रंगाची परपोषी वनस्पती 

उत्तर – कुस्कुटा (अमरवेल)

(ii) स्वयंपोषी आणि परपोषी अशा दोन्ही प्रकारची वनस्पती 

उत्तर – घटपर्णी

(iii) पानात वायू देवाणघेवाणीचे रंध्र 

उत्तर– पर्णरंध्र

(a) कुस्कुटा याचे उदाहरण आहे

(i) स्वयंपोषी

(ii) परपोषी

(iii) शवोपजीवी

(iv) यजमान

उत्तर : (ii) परपोषी

(b) कीटकांना पकडून आपला आहार बनविणारी वनस्पती –

(i) कुस्कुटा

(ii) चिनी गुलाब

(iii) घटपर्णी

(iv) गुलाब

उत्तर : (iii) घटपर्णी

स्तंभ – I         स्तंभ – II

हरितद्रव्य      सुक्ष्मजंतू

नायट्रोजन    परपोषी

कुस्कुटा        घटपर्णी

प्राणी             पान

कीटक           परोपजीवी

स्तंभ I              स्तंभ II

हरितद्रव्य          पान

नायट्रोजन        सूक्ष्मजंतू

कुस्कुटा             परपोषी

प्राणी                  परोपजीवी

कीटक               घटपर्णी

(i) प्रकाश संश्लेषणात कार्बन डायऑक्साईड मुक्त होते – चूक

(ii) स्वतः अन्न न बनवणाऱ्या वनस्पती शवोपजीवी असतात – चूक

(iii) प्रकाश संश्लेषणामुळे प्रोटीन तयार होत नाही – बरोबर

(iv) सौर ऊर्जा रासायनिक ऊर्जेत बदलते – बरोबर

(i) प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पतीचा कोणता भाग कार्बन डायऑक्साईड घेतो ?

(a) तंतूमूळे

(b) स्टोमॅटा

(c) पानातील वाहिन्या

(d) फुलाच्या पाकळ्या

उत्तर : (b) स्टोमॅटा

(ii) वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड मुख्यतः ज्या भागातून घेतात तो भाग –

(a) मूळ

(b) खोड

(c) फुले

(d) पाने

उत्तर : (d) पाने

12. शेतकरी हरितगृहात फळे व फुले का घेतात?

उत्तर: शेतकरी हरितगृहात पिके घेतात कारण तिथे नियंत्रित तापमान आणि आर्द्रता असते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते.तसेच, राइजोबियमसारखे सूक्ष्मजंतू जमिनीत नायट्रोजन वाढवतात, जे पिकांना आवश्यक असते. यामुळे शेतीत उत्पादन वाढते व शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now