अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण – 3
3.ANCIENT INDIAN CIVILIZATIONS : SINDHU-SARASWATICIVILIZATION AND VEDIC CIVILIZATION
प्राचीन भारताची संस्कृती : सिंधू – सरस्वती संस्कृती आणि वेदकालीन संस्कृती
I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा :
1. सिंधू सरस्वती संस्कृतीतील नाण्यावर आढळणाऱ्या लिपीला चित्र लिपी म्हणतात.
2. या संस्कृतीतील समुद्री व्यापाराचे प्रमुख केंद्र लोथल.
3. पावसाचे पाणी संग्रहित करण्याचे ठिकाण ढोलविरा.
II. खालील प्रश्नांची योडक्यात उत्तरे लिहा.
4. सार्वजनिक स्नानगृहाचे वर्णन करा.
उत्तर – या संस्कृतीतील मोहेंजोदारो या शहरात सार्वजनिक स्नानगृहाचे अवशेष सापडले आहेत.या स्नानगृहाचे बांधकाम पक्क्या विटांनी केले होते.या स्नानगृहात पाणी आणण्याची व वापरलेले पाणी बाहेर सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.या स्नानगृहात उतरण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्यांची रचना केली होती. या स्नानगृहाला पाण्याचा पुरवठा बहुतेक विहिरीमार्फत केला जात असे.
5. सिंधू सरस्वती संस्कृतीतील नगररचना कशी होती ? स्पष्ट करा.
उत्तर – सिंधू-सरस्वती संस्कृतीतील नगरांचे बांधकाम पद्धतशीर आणि वैशिष्ट्यपूर्ण केले जात होते.शहरांमध्ये अनेक विभाग होते,लहान उंच भागांना पश्चिम भागात किल्ले म्हणून संबोधले जात असे आणि विस्तीर्ण, सखल भागांना पूर्वेकडील गावे म्हणून ओळखले जात असे. .
येथील स्नानगृहाचे बांधकाम पक्क्या विटांनी केले होते.हडप्पा, मोहेंजोदारो आणि लोथल येथे सुव्यवस्थित धान्यसाठा करण्यात आला होता.शहरातील सखल भागात लोकांनी वस्ती केली होती.व्यवस्थित बांधलेली घरे,रस्ते आणि गटारी दिसून येतात.घरे मजबूत विटांच्या भिंतींनी बांधलेली होती आणि सामान्यत: एक किंवा दोन मजली होती.घराचे दरवाजे रस्त्याला लागून होते.घराघरांत स्नानगृह होते.कांही घरांना पाणी पुरवठ्यासाठी विहिरीदेखील होत्या.
शहरांमध्ये अंतर्गत गटारींची रचना होती.गटारी विटानी बांधलेल्या व दगडांनी अच्छादन केलेला होत्या.घरातील सांडपाण्याचा निचरा मुख्य गटारामध्ये होत असे. नाले वेळोवेळी स्वच्छ ठेवण्यासाठी खड्डे बांधण्यात आले होते.
इजिप्त आणि मेसोपोटेमिया सारख्या समकालीन संस्कृतींच्या तुलनेत सिंधू-सरस्वती संस्कृतीतील शहर बांधकाम नियोजन,अंमलबजावणी, देखभाल आणि एकूण भौतिक विस्ताराच्या बाबतीत श्रेष्ठ होते.
6. सिंधू संस्कृतीतील सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळवण्यासाठी आवश्यक घटकांची यादी करा.
उत्तर – सिंधू- सरस्वती संस्कृतीच्या उत्खननात मडकी,खेळणी,मूर्ती, दागिने,धातू, रत्ने,दगड,मणी, अलंकार, हस्तीदंताच्या नक्षीदार वस्तू, कुऱ्हाडी,कठोर छन्नी, मुद्रा इत्यादी वस्तू सापडल्या आहेत यावरून सिंधू संस्कृतीतील सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते.
7. सिंधू सरस्वती संस्कृतीतील आर्थिक व्यवस्थेचे वर्णन करा.
उत्तर – या संस्कृतीतील अर्थव्यवस्था शेती,व्यापार आणि पशुपालन यावर आधारित होती.त्यांनी गहू, बार्ली आणि कडधान्ये पिकवली आणि कापडासाठी कापूस शेती केली.त्यांनी बैल, गायी, म्हशी, मेंढ्या आणि शेळ्यांसह गुरे पाळली.शहरी केंद्रे, ग्रामीण भागात आणि मेसोपोटेमिया सारख्या परदेशी प्रदेशांसोबत व्यापार करत असल्याने खूप व्यापार होत असे. लोथल हे समुद्री व्यापाराचे एक महत्त्वाचे केंद्र होते आणि ढोलवीरामध्ये पावसाचे पाणी व्यवस्थापन करण्याच्या ठिकाणाचे पुरावे सापडले आहेत.
8. पूर्व वेदकाळ आणि उत्तर वेदकालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक व्यवस्थेचे स्पष्टीकरण करा.
उत्तर –
पूर्व-वेदकाळ :
▶ सामाजिक व्यवस्था: समाजात व्यवसायावर आधारित चार वर्ण (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) होते. स्त्रियांना समान दर्जा होता आणि विधवा पुनर्विवाहाची प्रथा होती.
▶ राजकीय व्यवस्था: राजन नावाच्या राजाला सभा, समिती आणि विधाता यांची मदत असे.
▶ आर्थिक व्यवस्था: पशुपालन आणि शेती हे मुख्य व्यवसाय होते.
उत्तर वेदकालीन:
▶ सामाजिक व्यवस्था: जातिव्यवस्था अधिक गुंतागुंतीची बनली आणि जात जन्माने ठरवली गेली.स्त्रियांचा दर्जा घसरला आणि विधवा पुनर्विवाहावर बंदी घालण्यात आली.हुंडा, पर्दा, बालविवाह पद्धती प्रचलित झाल्या.
▶ राजकीय व्यवस्था: राजकीय पद्धतीत विदत,विच यांची बैठक नाहीशी झाली.
▶ धार्मिक व्यवस्था : यज्ञयागाचा उपयोग केला जात असे.
▶ आर्थिक व्यवस्था :शेती हा मुख्य व्यवसाय बनला.तसेच शिकार आणि पशुपालनाचा यांचा समावेश होता.
इतर प्रकरणावरील प्रश्नोत्तरे
4. जगातील कांहीं महत्त्वाच्या संस्कृती
3.भारतातील प्राचीन संस्कृती : सिंधू – सरस्वती संस्कृती व वेदकालीन संस्कृती