9th Marathi1.Gurakhyache Netrapatan (1.गुराख्याचे नेत्रपतन)

 


 

1.     
गुराख्याचे नेत्रपतन

   म्हाइंभट

(मुल्य
– दया , प्रेम)

9th Marathi1.Gurakhyache Netrapatan (1.गुराख्याचे नेत्रपतन)

 

शब्दार्थ  :

खीरारी – गुराखी
दाटुन – दामटुन,घुसवून
सीवारु – रानात, शेतात
चारी – चारत असे
गोरूवे – गुराखी
परती – परत आला
तयासि- त्याला
लाचु देति लाच देतात
बोंब जाली – दोन गटात
भांडण झाले.

धावणे निगाले-
(त्याला पकडायला) धावपळ सुरू झाली.

पींड बांधणे -जखम बांधणे
तळुसुति – कंबर कसून
पुढां पुढां – पुढे
पुढे

वाढीनलें पळत असता
बीजे करणे- जाणे
निकाळ जाला -बरा झाला
तांबूळ – विडा
चडकणा – हाताचा
प्रहार करून

दामटुन – घुसकळ
 

स्वाध्याय

प्र. 1 – खालील पर्यायातून
योग्य तो पर्याय निवडून लिहा.(
अ) महानुभावपंथाचे संस्थापक हे होते.(
अ) श्री गोविंदप्रभु

(ब) बाईदेवबास

(क) श्री चक्रधरस्वामी

(ड) म्हाइंभट्ट

 

उत्तर – (क) श्री चक्रधरस्वामी(
आ) म्हाइंभट्ट येथे राहणारे होते.

(
अ) पैठण

(ब) आळंदी

(क) सराळे

(ड) सौंदल


उत्तर – (क) सराळे


(
इ) लीळाचरित्र ग्रंथात यांच्या आठवणी आहेत.

(
अ) श्रीकृष्ण

(ब) श्री चक्रधरस्वामी

(क) श्री गोविंदप्रभु

(ड) श्रीराम


उत्तर – (ब) श्री चक्रधरस्वामी

(
ई) गुराख्याचे नेत्रपतनहा उतारा यांनी संपादित केलेल्या पुस्तकातून
घेतला आहे.


(
अ) शं. गो. तुळपुळे

(ब) लीना सोहनी

(क) भालचंद्र सोहनी

(ड) डॉ. यू. म. पठाण

उत्तर –  भालचंद्र
सोहनी
 

प्र. 2 रा – खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(
अ) श्री चक्रधरस्वामी कोठे
बसले होते
?

उत्तर –  श्री चक्रधरस्वामी
दोन गावांमधील असलेल्या एका वृक्षाच्या सावलीच्या पारावर बसले होते.

(आ) श्री
चक्रधरांनी कोणाचा पाठलाग केला
?

उत्तर –  श्री चक्रधरस्वामींनी गुराख्याचा पाठलाग केला.


(
इ) गुराख्याने कोणता अपराध केला होता?

उत्तर –  गुराख्यायाने लोकाकडून लाच घेऊन दुसऱ्याच्या शेतात गुरे
चारण्याचा अपराध केला होता.


(
ई) गुराख्याला शिक्षा देण्यासाठी चक्रधरांनी काय केले?

उत्तर –  गुराख्याला शिक्षा देण्यासाठी श्री चक्रधरस्वामी इतरांबरोबरच गुराख्यामागे पळत जाऊन त्यांनी त्यांच्या
तोंडावर जोराने हाताचा प्रहार करून डोळ्याला जखम केली.


(
उ) या लीळेतून कोणता संदेश मिळतो?

उत्तर –  या लीळेतून
जशास तसे वागावे परंतु दुःखीतांवर वेळप्रसंगी प्रेम ही करावे हा संदेश मिळतो.

 


 

प्र. 3 (रा) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.

(
अ) तयासि गावीचे (लोकु) लांचु देति:

संदर्भ – वरील ओळ म्हाइंभट्ट लिखित ‘गुराख्याचे नेत्रपतन’ या पाठातील असून हा पाठ
लीळाचरित्र या ग्रंथातून घेतला आहे.

स्पष्टीकरण – गुराख्याला दुसऱ्याच्या शेतात फुकटात गुरे चारण्याकरिता गावातील लोक लाच
देत असत.ही माणसांची सर्वसाधारण प्रवृत्ती वरील ओळीतून सांगितली आहे.


(
आ) आणि : कळि समलीं मग श्रीकरी डोळा


संदर्भ – वरील ओळ म्हाइंभट्ट लिखित ‘गुराख्याचे नेत्रपतन’ या पाठातील असून हा पाठ
लीळाचरित्र या ग्रंथातून घेतला आहे.

स्पष्टीकरण – गुराख्याबरोबर झालेले भांडण संपले.पण त्या भांडणात गुराख्याच्या डोळ्यावर
श्री चक्रधरस्वामींनी मारल्याने डोळा फुटला होता.पण जशी शिक्षा केली तसे माणसाने
प्रेम हि केले पाहिजे.या न्यायाने चक्रधरस्वामींनी आपल्या तोंडात चघळत असलेला
तांबूळ(विड्याच्या लगघाचा लेप) डोळ्यावर लावून त्या गुराख्याचा डोळा पुन्हा पूर्वी
होता तसा केला.असे वरील ओळीतून सांगितले आहे.(
इ) धावणे निगाले गोसावी ही बीजें केले :संदर्भ – वरील ओळ
म्हाइंभट्ट लिखित ‘गुराख्याचे नेत्रपतन’ या पाठातील असून हा पाठ लीळाचरित्र या
ग्रंथातून घेतला आहे.

स्पष्टीकरण – भांडणे विकोपाला गेली व मारामारी धावाधाव सुरू झाली. चक्रधरस्वामीही
त्याला धरण्यासाठी त्या गुराख्याच्या मागोमाग पळाले हे वरील ओळीतून सांगितले आहे.
 

प्र.4 (था) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे
लिहा.


(
अ) गावात भांडण का निर्माण
झाले
?

उत्तर – गावातील लोकांकडून लाच घेऊन गुराखी दुसऱ्याच्या शेतातील गवतावर गुरे
चारण्यासाठी घेऊन जात होता.गुराख्याच्या या लाच देण्या व खाण्यावरून आणि
दुसऱ्याच्या शेतात गुरे चारण्यावरून गावात भांडणे निर्माण झाली.


(
आ) चक्रधरांनी गुराख्याला पकडण्याचा प्रयत्न का केला?

उत्तर – गुराखी वेगाने पळत होता.तो लोकांच्या हाती लागत नव्हता.म्हणून श्री चक्रधरस्वामींनी कंबर कसून चपळ व
आडदांड गुराख्याला पकडण्याकरिता व शिक्षा देण्याकरिता चक्रधरांनी गुराख्याला
पकडण्याचा प्रयत्न केला.

 (इ) चक्रधरांनी त्या गुराख्याला धडा शिकविण्यासाठी
काय केले
?

उत्तर – आडदांड व चपळ गुराखी लोकांच्या झटापटीत
कोणालाच आवरत नव्हता.म्हणून चक्रधरांनी आपल्या दणकट हाताने त्याच्या चेहऱ्यावर
प्रहार केला.हाताचा फटका बसून डोळा फुटला.त्याला योग्य शिक्षा मिळाली.पण शारीरिक
नुकसानीची त्यांना दया आल्याने त्यांनी तो डोळा बांधून पुन्हा पूर्वीप्रमाणे ठीक
केला.
 

प्र.5 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे
लिहा.


(
अ) श्री चक्रधरांनी गुराख्याचा जखमी झालेला डोळा कसा बरा
केला
?
उत्तर – श्री चक्रधरस्वामींनी हाणामारीत भाग घेऊन आपल्या
दणकट हाताने गुराख्याच्या चेहऱ्यावर सपाटून मार दिला.त्यामध्ये त्यांच्या डोळ्याला
जखम झाली.गुराख्याला शिक्षा झाली पण त्यांचा डोळा अधू झाला याचे श्री चक्रधरस्वामींनी
वाईट वाटले.म्हणून त्यांनी ताबडतोब आपल्या तोंडातील खात असलेल्या तांबूळाचा लगदा
काढला आणि गुराख्याच्या डोळ्याला बांधून गुराख्याचा  डोळा पूर्वीप्रमाणे बरा केला .


(
आ) या पाठाचा सारांश लिहा.

उत्तर – दोन्ही गावाच्या मध्यावर असलेल्या झाडाखालच्या पारावर श्री
चक्रधरस्वामी बसले असताना त्यांना भांडणाचा गलका ऐकू आला.एका गुराख्याला लोक गुरे
राखण्यासाठी लाच देत.तो दुसऱ्याच्या शिवरात गुरे चारण्यास नेत असे.त्यामुळे
भांडणाला सुरुवात झाली.गुराखी व लोकांमध्ये हाणामारी सुरू झाली.गुराखी दणकट
असल्याने तो कोणालाच दाद देत नव्हता.श्री चक्रधरांनी हे पाहून स्वतःच्या
गुराख्याला शिक्षा करण्यास ते पुढे सरसावले.गुराखी पळू लागला.पण चक्रधरस्वामींनी आपल्या
दणकट हाताने गुराख्याच्या चेहऱ्यावर सपाटून मार दिला.त्यात गुराख्याचा डोळा फुटला त्याला
शिक्षा झाली.पण त्याचे शारीरिक नुकसान झाले. हे श्री चक्रधरस्वामींनी पाहून आपल्या
तोंडातील तांबुळ काढून गुराख्याचा डोळा बांधला व त्याचा डोळा बरा केला.
जशास तसे वागावे पण दु:खितावर प्रेमही करावे ही शिकवण देऊन श्री चक्रधरस्वामी
पुढील मुक्कामास गेले.
 

भाषाभ्यास
प्रमाण मराठी भाषेत लिहा.


(
अ) दोही गावामध्ये वृक्षातळि
आसन:

दोन गावाच्या शिवेमध्ये असलेल्या एका वृक्षाखालील
बसायची जागा .


(
ब) खीरारी एक दाटुनि सीवारु चारू

एक गुराखी बेधडक शेतामध्ये गुरे चारीत असे.


(
क) गोसावी चडकणा हाणौणि तेयाचा डोळा खालि पाडीला:

श्री चक्रधरस्वामीस्वामींनी आपल्या हाताचा प्रहार
करून त्या गुराख्याच्या डोळ्याला जखम केली आणि
 डोळा खाली पडला .


(
ङ) श्रीमुखीचेया तांबूळाची पींड बांधली:

आपल्या तोंडातील खात असलेल्या विड्याच्या पानाचा
लगदा काढून तो गुराख्याच्या डोळ्यावर बांधला.


(
इ) डोळा निकाळ जाला:

डोळा बरा झाला.


वरील प्रश्नोत्तरे pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा… 

9th Marathi1.Gurakhyache Netrapatan (1.गुराख्याचे नेत्रपतन)


      
                                   

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *