FLN पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान माहिती व संदर्भ साहित्य

The Objectives of the Foundational Literacy and Numeracy (FLN) Framework

The objectives of foundational literacy and numeracy provide teachers with a clear direction to prioritise crucial elements of literacy and numeracy development. By placing emphasis on these goals, teachers strive to equip students with essential FLN skills. Below are a few typical objectives of Foundational Literacy and Numeracy:

  • Acquisition of Phonemic Awareness
  • Reading Comprehension
  • Vocabulary Development
  • Writing Proficiency
  • Numerical Operations
  • Problem-Solving Skills

इयत्ता पहिली अखेर – अक्षरे व त्यासंबंधी आवाज ओळखणे किमान 2-3 अक्षरे असलेले साधे शब्द वाचने.

इयत्ता दुसरी अखेर- अपठीत मजकूर 40-50 शब्द प्रती मिनिट अर्थासकट वाचने.

इयत्ता तिसरी अखेर – अपठीत मजकूर 60 शब्द प्रती मिनिटे अर्थासकट वाचने.

इयत्ता पहिली अखेर – 99पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. साधी बेरीज व वजाबाकी करणे.

इयत्ता दुसरी अखेर – 999 पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन. 99 पर्यंत संख्यांची वजाबाकी करणे.

इयत्ता तिसरी अखेर – 9999 पर्यंत संख्या वाचन, लेखन. गुणकाराची उदाहरणे सोडवणे.

निपुण भारत अंतर्गत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान

  • भाषिक कौशल्ये ३ ते ९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचा प्रारंभिक भाषा विकास होण्यासाठी मातृभाषेमध्ये मौखिक भाषा ज्ञान, समजपूर्वक ऐकणे व त्याचे आकलन, मुद्रणशास्त्र व उच्चारशास्त्र यांच्या विकासाची जाणीव व लेखन कौशल्याचा विकास होणे गरजेचे आहे. भाषिक कौशल्ये प्राप्त होण्यासाठी भाषेचे पूर्वज्ञान मदतगार ठरेल. ज्या विद्यार्थ्यांचा मातृभाषेचा पाया मजबूत असतो, ते विद्यार्थी इंग्रजी वा अन्य भाषा अधिक सहजतेने शिकू शकतात.

1.पायाभूत साक्षरतेचे घटक:

  1. मौखिक भाषा विकासः लेखन व वाचनाची कोशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे.
  2. उच्चार शास्त्राची जाणीव शब्दांची लय व ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.
  3. सांकेतिक भाषा / लिपी समजून घेणे यामध्ये छापील मजकूरांचे आकलन करण्याची क्षमता, अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे,
  4. शब्द संग्रहः- मौखिक शब्द संग्रह, वाचन / लेखन शब्दसंग्रह व शब्दांच्या विविध अर्थछटा,
  5. वाचन व आकलन:- मजकूराचे वाचन करून अर्थ समजून घेणे, माहिती प्राप्त करणे व मजकूराचे स्पष्टीकरण करणे.
  6. वाचनातील ओघवतेपणाः- मजकूर अचूकपणे व लयबद्ध वाचणे, अभिव्यक्ती व आकलन.
  7. लेखन:- अक्षरे व शब्द लिहिणे, अभिव्यक्तीसाठी लिहिणे याची क्षमता.
  8. आकलन:- छापील मजकूर / पुस्तके यामुळे आकलन कौशल्ये विकसित होण्यास मदत..
  9. वाचन संस्कृती / वाचनाकडे कल:- यामध्ये विविध तन्हेची पुस्तके व इतर वाचन साहित्य वाचण्याकडे कल असणे.

पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता, संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध / संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात.

  1. संख्या पूर्व:- गणन व संख्या ज्ञान
  2. संख्या व संख्येवरील क्रियाः- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे..
  3. गणना करणे:- तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे,
  4. आकार व अवकाश याबाबत समजून घेणे:- तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करून त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
  5. नमुना / संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *