Fundamental Numeracy पायाभूत संख्याज्ञान आकर्षकपणे शिकविण्यासाठी उपयुक्त व्हिडीओ लिंक –
बेरीज,वजाबाकी,गुणाकार,चढता क्रम,उतरता क्रम,लहान मोरही संख्या इत्यादी अनेक उपयुक्त घटक आकर्षकपणे शिकवण्यासाठी उपयोगी व्हिडीओ लिंक शेवटी देण्यात आलेल्या आहेत..
भारत सरकारने “समग्र शिक्षा” मध्ये निपुण भारत (National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3 री पर्यंत मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषयसूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे. यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य (ऑफलाईन व ऑनलाईन), निश्चित क्षमता विधाने (Learning Competencies) व अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes), शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. सध्या इयत्ता 4थी व 5वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मूलभूत कौशल्ये प्राप्त केली नाहीत, त्यानांही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य (छापील व डिजिटल स्वरूपात) उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
राज्यात इयत्ता 3री पर्यंतच्या 100% विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच इयत्ता 3 री पुढे गेलेल्या तथापि, अपेक्षित क्षमता प्राप्त न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी “निपुण भारत” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानासाठी भाषिक कौशल्ये आणि पायाभूत संख्या साक्षरता, संख्याज्ञान व गणितीय कौशल्ये खालीलप्रमाणे –:
पायाभूत संख्या साक्षरता म्हणजे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी साध्या संख्यात्मक कल्पनांचा वापर करण्याची क्षमता. संख्या पूर्व व संख्या कल्पनेचा विकास, तुलना करण्याचे ज्ञान व कौशल्य, क्रमशः मांडणी करणे, आकृतीबंध/संरचना ओळखणे व त्याचे वर्गीकरण. या बाबी प्राथमिक वर्गात गणित अध्ययनाचा पाया घालतात
प्रारंभिक गणिताचे दृष्टीकोन:-
संख्या पूर्व:- गणन व संख्या ज्ञान
संख्या व संख्येवरील क्रियाः- दशमान पध्दतीचा वापर, संख्येवरील क्रियांवर प्रभुत्व संपादन करणे,
गणना करणे: तीन अंकी संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितीय क्रिया करण्याच्या पद्धती समजावून घेणे व त्याचा उपयोग करणे.
आकार व अवकाश याबाबत समजून घेणेः तीन अंकी संख्यांपर्यंतची सोपी आकडेमोड करुन त्यांच्या विविध संदर्भातील दैनंदिन कार्यात उपयोग करणे.
नमुना/संरचना:- आकार व अवकाशातील वस्तू समजून घेण्यासाठी संबंधित शब्द संग्रह शिकणे.
2.संख्या साक्षरता
इयत्ता | किमान शैक्षणिक लक्ष्य |
अंगणवाडी/ बालवाडी अखेर | 10 पर्यंत अंक ज्ञान (ओळखणे व वाचणे) |
इयत्ता पहिली अखेर | 99 पर्यंत संख्यांचे वाचन, लेखन.साधी बेरीज व वजाबाकी करतो. |
इयत्ता दुसरी अखेर | 999 पर्यंत संख्यांचे वाचन,लेखन. 99 पर्यंत संख्यांची वजाबाकी करतो. |
इयत्ता तिसरी अखेर | 9999 पर्यंत संख्यांचे वाचन,लेखन.सोपी गुणकाराची उदाहरणे सोडवतो. |
FLN मधील पायाभूत संख्याज्ञान साठी संदर्भ व उपयुक्त व्हिडीओ खालीलप्रमाणे –
1 ते 10 अंक मोजणे.. Counting from 1 to 10 (Marathi)
वर खाली आणि आत बाहेर Up down and In out (Marathi)
1 ते 20 अंक मोजणे..Counting from 1 to 20 (Marathi)
1 ते 20 अंक मोजुया Let’s count from 1 to 20 (Marathi)
10 च्या पटीत मोजणे.. Skip Counting in groups of 10 (Marathi)
2 च्या पटीत मोजणे.. Skip Counting in groups of 2 (Marathi)
बेरीज 1 Simple Addition (Marathi)
एक अंकी संख्येची बेरीज Single digit addition (Marathi)
संख्या एक बेरजा अनेक Addition facts for number 10 (Marathi)
तोंडी बेरीज शिकण्याचा तक्ता Addition using an addition chart (Marathi)
दोन अंकी संख्यांची बेरीज Addition of Two Digit Numbers with Tens and Units (Marathi)
वजाबाकी 1 Simple subtraction (Marathi)
वजाबाकी 2 Subtraction (Marathi)
वजाबाकीची गणिते 3 Questions on subtraction (Marathi)
एक अंकी वजाबाकी Subtraction of single digit numbers (Marathi)
वजाबाकी – वीसपर्यंत Subtraction upto 20 (Marathi)
वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे Word Problems on Subtraction (Marathi)
तोंडी वजाबाकी शिकण्याचा तक्ता Subtraction using a subtraction chart (Marathi)
संख्यांचा अंदाज Understanding numbers in units and tens (Marathi)
वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे Word Problems on Subtraction (Marathi)
गुणाकार भाग-1 Multiplication Part 1 (Marathi)
गुणाकार भाग 2 Multiplication Part 2 (Marathi)
गुणाकार भाग 3 Multiplication Part 3 (Marathi)
पाढे Multiplication Table (Marathi) –
एकक आणि दशक भाग 1 Place value units and tens (Marathi)
स्थानिक किंमत Place Value (Marathi)
संख्यांची स्थानिक किंमत Place Value using Match sticks Part 3 (Marathi)
संख्या चार्ट वाचण्याच्या पद्धती How to read a number chart (Marathi)