इयत्ता – दहावी
कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
विषय – समाज विज्ञान
स्वाध्याय
नमूना उत्तरे
6. सार्वजनिक प्रशासन – एक परिचय
स्वाध्याय
I. खालील वाक्यांमधील रिकाम्या जागा भराः
1. सार्वजनिक प्रशासनाचे जनक वुड्रो विल्सन
2. सार्वजनिक प्रशासन हा शब्द प्रथम वापरणारे अलेक्झांडर हॅमिल्टन
3. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
4. घटनेच्या 315व्या कलमात राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद आहे.
II. खालील प्रश्नांची चर्चा करा आणि त्याांची उत्तरे द्याः
5. सार्वजनिक प्रशासन अति आवश्यक आहे. चर्चा करा.
उत्तर – आधुनिक जगात जटिल आणि जलद बदल होत असल्याने सार्वजनिक प्रशासनाला महत्व प्राप्त झाले आहे.कारण सरकारची धोरणे आणि कायदे प्रभावीपणे अंमलात आणले जातील याची खात्री करून ते सरकारचा कणा म्हणून काम करते.कायदा व सुव्यवस्था राखणे, सार्वजनिक हितांचे रक्षण करणे,सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि कायदेमंडळाच्या कामकाजात मदत करणे.यासाठी सार्वजनिक प्रशासन जबाबदार आहे.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राज्याच्या कार्यक्षम कारभारासाठी सार्वजनिक प्रशासन अत्यंत आवश्यक आहे.
6. सार्वजनिक प्रशासन व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत व्यापकपणे कार्य करते. स्पष्ट करा.
उत्तर – सार्वजनिक प्रशासन एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. सार्वजनिक प्रशासन व्यक्तीला आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा,रोजगाराच्या संधी पेन्शन आणि इतर सामाजिक लाभ प्रदान करते.याशिवाय समाजातील लोकांच्या कार्यांचे नयमन करण्यासाठी,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे अंमलात किंवा लागू करते.अशा प्रकारे सार्वजनिक प्रशासन एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात सामील आहे.
7. भरतीचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर – भरतीचे दोन प्रकार आहेत.
अ) थेट भरती: स्पर्धा परीक्षांद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणे म्हणजे थेट भरती होय.ही भरतीची लोकप्रिय आणि वैज्ञानिक पद्धत आहे.या भरतीसाठी उमेदवारांनी विशिष्ट पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे आणि सार्वजनिक सेवा पदांवर नियुक्तीसाठी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. उदा. नागरी सेवांमध्ये भरती
ब) अप्रत्यक्ष भरती:यालाच अंतर्गत भरती असेही म्हणतात.अप्रत्यक्ष भरती म्हणजे सरकारी सेवेत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या पात्रता आणि ज्येष्ठतेच्या आधारावर उच्च पदांवर पदोन्नती देणे किंवा नियुक्त करणे.भारतासह बऱ्याच देशांमध्ये याचा वापर केला जातो.
8. कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्याची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर – सामाजिक शांतता,सुरक्षा,कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्याची प्राथमिक भूमिका असते. राज्याचे पोलीस प्रशासन राज्याच्या गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असते.पोलीस महानिर्देशक आणि पोलीस महासंचालक (DG आणि DGP) पासून पोलीस कॉन्स्टेबल (PC) पर्यंत गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे आणि गुन्ह्यांचा तपास करणे,कायद्यांची अंमलबजावणी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कार्य करत असतात.याव्यतिरिक्त राज्यात मोठ्या सुरक्षा समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी CRPF, BSF, RPF आणि CISF सारख्या केंद्र सरकारच्या सैन्याशी समन्वय साधते.नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी,अराजकता रोखण्यासाठी आणि आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थिर वातावरण निर्माण करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे.