इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
पहिले सत्र
इतिहास
पाठ – 3
3. भारतात युरोपियनांचे आगमन
I. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1) भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम आलेले युरोपियन कोण?
उत्तर – भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम आलेले युरोपियन पोर्तुगीज होय.
2) भारताला येण्याचा जलमार्गाचा शोध कोणी लावला?
उत्तर- भारताला येण्याचा जलमार्गाचा शोध वास्को-द-गामा यांनी लावला.
3) डचांची राजधानी कोणती?
उत्तर – डचांची राजधानी पुलिकत होय.
4) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?
उत्तर – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सा.श. 1600 मध्ये झाली.
5) फ्रेंचांची व्यापारी केंद्रे कोणती? ते सांगा.
उत्तर – फ्रेंचांची व्यापारी केंद्रे खालीलप्रमाणे
- पांडिचेरी
- मच्छलीपट्टण
- कालिकत
- माहे
- कारकल
- चंद्रपूर इत्यादी
6) ब्रिटिशाना दस्तक हक्क दिलेला मोगल राजा कोण?
उत्तर – ब्रिटिशांनी दस्तक हक्क दिलेला मोगल राजा फारुक सिया होय.
II. खालील प्रश्नांची उत्तरे गटात चर्चा करून लिहा.
1) भारतात पोर्तुगीजांच्या पतनास कारणीभूत कारणांची यादी करा.
उत्तर – भारतात पोर्तुगीजांच्या पतनास कारणीभूत कारणांची यादी खालील प्रमाणे –
- बलवान नौका दल असलेले डच आणि इंग्रज हे पोर्तुगीजांचे प्रबळ प्रतिस्पर्धी होते.
- पोर्तुगीज सरकारच्या नोकर वर्गाने भ्रष्टाचार केल्यामुळे त्यांनी विश्वास गमावला.त्यामुळे त्यांचे सरकार हीन स्थितीला पोहोचले.
- धार्मिक असहिष्णूता हेच पोर्तुगीजांच्या अधोगतीचे प्रमुख कारण ठरले.पोर्तुगिजांनी येथील विविध धर्मातील लोकांचे बळजबरीने धर्मांतर केले.
- विजयनगरच्या साम्राज्याची अधोगती झाल्याने त्यांचा व्यापार कुंठीत झाला.
2) भारतात फ्रेंचांच्या पतनाची कारणे कोणती?
उत्तर – भारतात फ्रेंच यांच्या अधोगतीची कारणे खालील प्रमाणे –
- भारतातील फ्रेंच सैन्य प्रमुखाना फ्रान्स सरकारने पूर्ण पाठिंबा दिला नाही.
- फ्रान्समध्ये राजकीय गोंधळ आणि क्रांती घडून आल्या.हेच भारतातील त्यांच्या अधोगतीचे कारण ठरले.
- फ्रेंच हे ब्रिटिश नौकादळा इतके प्रबळ नव्हते.इत्यादी
III. खालील अ गटातीत संबंधित ब गटातील विषयांच्या जोड्या जुळवा.
अ ब
पोर्तुगीज गोवा
डच पुलिकत
फ्रेंच पाँडिचरी
ब्रिटिश कलकत्ता
सरावासाठी अधिक प्रश्न
1) दस्तक म्हणजे काय?
उत्तर – दस्तक म्हणजे इंग्रज व्यापाऱ्यांना भारतात करमुक्त व्यापार करण्यासाठी दिलेला विशेष परवाना होय.
2) कोणत्या दिवशी वास्को-द-गामा कालिका त्या बंदरात पोहोचला?
उत्तर – 17 मे 1498 या दिवशी वास्को-द-गामा कालिकत बंदरात पोहोचला.
3) पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय गव्हर्नर कोण होता?
उत्तर – पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय गव्हर्नर अल्मेडा होता.
4.भारतात व्यापारासाठी आलेले शेवटचे युरोपियन कोण?
उत्तर – फ्रेंच हे भारतात व्यापारासाठी आलेले शेवटचे युरोपियन होय.