7वी मराठी पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका Class 7 Bridge Course Marathi Pre-Test Model Question Paper
- Bridge Course
- सेतूबंध
- Sub. – Marathi
- Competencies
- Model Question Papers
- Pre Test (पूर्व परीक्षा)
- Post Test
अध्यापन व अध्ययन प्रक्रिया बाल-केंद्रित, कृती-आधारित आणि आनंदी शिक्षणावर जोर देणारी असावी.यासाठी शिक्षकांनी अगोदर चांगली तयारी करणे गरजेचे आणि आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सर्जनशील कृतींची रचना करण्यासाठी शिक्षकांना पूर्ण वाव आहे.
शिक्षक सेतुबंध कार्यक्रमाचे साहित्य वाचून समजून घ्यावे. |
पहिले तीन दिवस मूलभूत साक्षरता (FL) उपक्रम दिले जातात. |
नंतर बारा दिवस चार ते सहा अध्ययन निष्पत्तींची निवड करून त्यावर आधारित उपक्रम दिले आहेत. |
येथे दिलेले उपक्रम केवळ नमुण्यासाठी असून शिक्षकानी सर्जनशीलपणे अधिक कृती व उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे तयार करावे. |
या साहित्यात यावर्षीची अध्ययन निष्पत्ती व मागील वर्षीच्या अध्ययन निष्पत्ती लक्षात घेऊन उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. |
या साहित्यात अनेक सल्लागार उपक्रम दिलेले आहेत आणि शिक्षकाने करावयाच्या एका उपक्रमाचे स्पष्टीकरण दिले आहे. |
या साहित्यात अनेक सहाय्यक उपक्रम दिले आहेत कृतींचे वर्णन दिले आहे. |
दिलेला उपक्रम वर्गात कालमर्यादेत पूर्ण करणे शक्य झाले नाही तर गृहपाठ म्हणून द्यावे. |
पूर्व आणि साफल्य परीक्षेसाठी येथे दिलेली प्रश्नपत्रिका फक्त नमुन्यासाठी आहेत.यांचा संदर्भ घेऊन आपापल्या पातळीवर प्रश्न निर्माण करावेत. |
7वी मराठी पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका
सेतुबंध पूर्व परीक्षा/ साफल्य परीक्षेसाठी नमुना प्रश्न
इयत्ता – सातवी
अ. खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे द्या.
1. मला तुमच्या आवडत्या कवितेच्या चार ओळी सांगा, तुम्हाला ती कविता का आवडली ते सांगा.
2. तुझ्या गावात झालेल्या निवडणुकीबद्दल सांग.
3. तुमचा आवडता व्यवसाय कोणता आहे? का?
4. तुम्ही दहा अक्षरी शब्द म्हणू शकता का?
5. उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या तुझ्या दोन गोष्टी मला सांग?
6. या वृत्तपत्रातील पाच बातम्या वाच.
आ. प्रायोगिक (मौखिक) उत्तरे घेण्याचे प्रश्न
7. शब्दकोशाच्या मदतीने खालील शब्दांचे अर्थ शोधा आणि सहा शब्द वर्णक्रमानुसार म्हणा :
गगन, अरण्य, कांचन, द्रोह, लावण्या, उदय
8. तुमच्या कुटुंबातील किंवा शेजारच्या आवडत्या व्यक्तीची मुलाखत घ्या. (त्यांचा परिचय करून घ्या)
9. तुमच्या घरात असलेली निमंत्रण पत्रिका, लग्न पत्रिका, नामकरण कार्ड, मासिक कॅरी पैकी कोणतेही एक वाचा आणि सारांश द्या.
इ. लेखी उत्तरे आवश्यक असलेले प्रश्न
10. खालीलपैकी कोणताही एक शब्द वापरून तुमचे स्वतःचे वाक्य बनवा
कर्तव्य धन्यता संभ्रम आई वडील
11. खालील शब्दांमधील क्रियापद असणारा शब्द ओळखून त्याचा अर्थ लिहा.
लगबगिने
नाक दाखवणे
12. खालील वाक्यामध्ये न वापरलेल्या लेखन चिन्हाला वर्तुळाकार करून दर्शवा
“महाराज हे कोण आहेत? कशासाठी आले आहेत? काय झाले हे मला कळेच ना.”
प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह,पूर्णविराम, अवतरण चिन्ह
13. खालील लेखाशी जुळणारा प्रश्न चिन्हांकित करा.
“मैत्री एक पवित्र नाते आहे. येथे गरीव श्रीमंत, दारिद्य गरीबी, सुशिक्षित अशिक्षितचा पूर्वाग्रहण नसतो मैत्रीमध्ये एकमेकांना मदत करुन जगले पाहिजे.
1) गंधर्व सेना कोण आहे?
2) राणीचे हसण्याचे कारण काय होते?
3) मैत्री हे एक पवित्र नाते आहे हे समजावून सांगा?
4) उन्हाळ्याच्या सुट्टीत काय केलास?
14. खालील विधानापैकी चुकीचे विधान ओळखा.
दैनिक वृत्तपत्र वाचन हा चांगला छंद नाही
आपण आपल्या मोठ्यांचा आदर केला पाहिजे
रस्त्याचे नियम पाळले पाहिजेत
सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
15. खालीलपैकी कोणत्याही एका परिस्थितीसाठी चार वाक्य लिहा.
आज बेळगाव मध्ये जोरदार पाऊस
सरकारी शाळांमधून पट संख्येची वाढ झाली
ग्रामीण मुलांसाठी वेगवेगळ्या सुविधा
खानापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी
16. खालील उताऱ्याचा अर्थ तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहा.
मानवाच्या जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे खेळ हे करमणुकीचे साधन आहे. खेळामुळे एकता, सहनशीलता, सांघिक सहकार्य, निर्णय क्षमता, युक्ती हे गुण सहज वाढीस लागतात. खेळामुळे शरीर सुदृढ बनते. मानवी विचारांना सुयोग पद्धतीने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन खेळच करतात.
17. खालील अक्षरांमधून कवींची नावे ओळखा आणि लिहा.
व त स म ट ना दे शां वा
दा बा मी व ट व या के क
सं रा प दे शे व न ऊ ट ग
ळ दा स या प ज हे ण ऊ
18. तुम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत केलेल्या संपूर्ण महत्त्वाच्या गोष्टींची यादी करा
19. दिलेल्या पद्यातील यमक शब्द ओळखा आणि लिहा.
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दुःखितांचे दुःख हो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
20. तुमच्या शाळेबद्दल तुम्हाला आवडणाऱ्या पाच गोष्टी लिहा.
- SSLC Model Letter Writing 3rd Language English
- KARNATAKA TEXTBOOK SOLUTION CLASS -6 कर्नाटक 6वी पाठ्यपुस्तक नमूना प्रश्नोत्तरे
- KSEEB 4th ENGLISH UNIT – 8 ART
- कर्नाटक राज्य 4थी परिसर अध्ययन पुस्तकातील प्रश्नोत्तरे भाग -2 Karnataka State Syllabus 4th EVS Textbook Solutions: PART-2
- 4th EVS 18. व्यक्तीची वैशिष्ट्ये 18.Characteristics of a Person