कर्नाटक राज्य सरकारच्या सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी HRMS कर्मचारी सेल्फ सर्व्हिस (ESS) लॉगिन मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना (PMJJBY) व प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) या विमा योजनेची माहिती अद्यावत करणेबाबत..
वरील विषयानुसार प्रधानमंत्री जन सुरक्षा योजने अंतर्गत येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) या विमा योजनेची महिती सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी HRMS कर्मचारी सेल्फ सर्व्हिस (ESS) मध्ये माहिती भरून या विमा योजनेचा फायदा सर्वानी घ्यावा असे आदेशात म्हंटले आहे.
प्रथम विमा योजना समजून घेऊया-
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या भारत सरकारने सुरू केलेल्या दोन महत्त्वपूर्ण विमा योजना आहेत.या योजनांचा उद्देश देशभरातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षा आणि विमा संरक्षण प्रदान करणे आहे.
PMJJY ही जीवन विमा योजना आहे जी प्रत्येक व्यक्तीला परवडणारा जीवन विमा कव्हरेज देते.
या योजनेअंतर्गत कोणत्याही कारणास्तव विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या नॉमिनीला ₹2 लाख आर्थिक सहाय्य दिले जाते.
या विमा योजने अंतर्गत वार्षिक ₹436 इतका विमा हफ्ता भरावा लागतो.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ची प्रमुख वैशिष्ट्ये-
वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे
राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) कमीत कमी प्रीमियममध्ये व्यक्तींना अपघाती विमा संरक्षण देण्याला प्राधान्य देते.
PMSBY ची प्रमुख वैशिष्ट्ये-
या योजनेअंतर्गत विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा आल्यास ₹2 लाख रुपये कुटुंबीयांना व कायमस्वरुपी किंवा अल्प अपंगत्व आल्यास विमाधारकाला ₹1 लाख अर्थसहाय्य मिळते.
या योजनेमध्ये सामाविष्ट होण्यासाठी वार्षिक फक्त ₹20 विमा हफ्ता भरावा लागतो.
पात्रता:
बचत बँक खाते असणे आवश्यक.
वयोमर्यादा – 18 ते 70 वर्षे
PMJJY आणि PMSBY मधील फरक**
आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा दोन्ही योजनांचा उद्देश आहे.PMJJY जीवन विमा अंतर्गत कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ₹2 लाख इतके आर्थिक सहाय्य मिळते.तर PMSBY हा विमा अपघातामध्ये अर्थ सहाय्य देतो. म्हणजेच अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास आर्थिक मदत मिळते.
कर्नाटक सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेमध्ये नाव नोंदणी करणे अतिशय सोपे आहे.
नावनोंदणी खालील प्रमाणे करता येते.
1.HRMS ESS Login करावे.
4. ओपन झालेल्या फॉर्म मध्ये PMJJBY व PMSBY हे दोन्ही टॅब सिलेक्ट करा.
5. त्यानंतर Name of Bank & Branch details भरा.(मोबाईल स्क्रीन रोटेट करा.)
6. Date of initiation of insurance premium –
(कोणत्या तारखेपासून premium चालू करणार आहात ती तारीख निवडा व submit करा..
आता आपले नाव या विमा योजनेत नोंद झाले असेल आणि आपल्या दिलेल्या बँक खात्यातून वर्षाला ₹436 आणि ₹20 असे एकूण ₹456 Auto Debit होतील..
– आर्थिक सुरक्षा**: दोन्ही योजना विमाधारकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनपेक्षित परिस्थितीत आर्थिक सुरक्षा प्रदान करतात.
-परवडण्या योग्य : अतिशय कमी विमा हफ्ते असल्याने सर्वाना परवडणाऱ्या आहेत.
-राष्ट्रव्यापी : या योजना देशभरातील सर्व व्यक्तींना सुरक्षा देतात.
सारांश,प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJY)आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या भारतीय सरकारच्या जनतेला परवडणारा विमा कव्हरेज देण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम आहेत.