6th SS 23.AFRICA आफ्रिका

23.आफ्रिका

 इयत्ता – सहावी

6th SS 23.AFRICA आफ्रिका

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

प्रकरण – 23. आफ्रिका 

अभ्यास
गटात चर्चा करून
उत्तरे लिहा

1.
आफ्रिकेला काळा खंड
असे का म्हणतात
?
उत्तर – या खंडावर मुख्यतः काळे लोक राहतात म्हणून आफ्रिकेला काळा
खंड म्हणत नाहीत तर येथील घनदाट अरण्ये
,पठारी प्रदेश,ओसाड जमिनी,उत्तरेकडे सहारा वाळवंट इत्यादी मुळे या खंडातील बराच
प्रदेश जगाला अज्ञात आहे.म्हणून या खंडाळा काळा खंड असे म्हटले जाते.

2.
आफ्रिकेला केंद्रीय खंड असे का म्हणतात ?
उत्तर – विषुववृत्त या खंडाच्या मध्यातून गेल्यामुळे तसेच अत्यंत
लांब आणि रूंद असलेला आफ्रिका खंड उत्तर गोलार्ध
आणि दक्षिण गोलार्धात
पसरलेला आहे. म्हणून आफ्रिका खंदाला केंद्रीय खंड म्हणून ओळखले जाते.

3.
कालवा म्हणजे काय ? आफिकेतील
महत्वाचा कालवा कोणता
?
उत्तर – दोन विशाल भूभागांना जोडणारा आणि दोन समुद्राना
वेगळेकरणारा चिंचोळा भूभाग म्हणजेच
कालवा‘ (भूकंठ).सुवेझ
आफिकेतील महत्वाचा कालवा आहे.

4.
आफ्रिकेतील सखल मैदानी प्रदेशाची नावे सांग ?
उत्तर – सुदानचा सखल मैदानी प्रदेश, चाडचा सखल मैदानी प्रदेश, जोफचा सखल मैदानी प्रदेश,काँगो सखल मैदानी प्रदेश आणि कलहरी सखल मैदानी प्रदेश
आफ्रिकेतील सखल मैदानी प्रदेशाची नावे आहेत.

5.
आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
उत्तर – किलीमांजारो हे आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.
6.
आफ्रिकेतील विविध वनस्पतींची नावे सांगा ?
उत्तर – रबर, बीटे, एबोनी, शिसम, नारळ, ताड
करिमर
,मॅग्रोव,पाइन,ऑलिव्ह,जेनिफर,सिडार,फिग, सड इत्यादी वनस्पती आफ्रिका खंडात आढळतात.
7.
आफ्रिकेतील सर्वात लांब नदी कोणती ?
उत्तर – आफ्रिकेतील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे.तिची लांबी 6,650 किलोमीटर आहे.
8.
आफ्रिकेतील प्रमुख आहार धान्य पिके कोणती ?
उत्तर – आफ्रिकेतील महत्त्वाच्या अन्न पिकांमध्ये मका,बाजरी, तांदूळ,रताळे,शेंगदाणे
आणि स्टार्च इत्यादी आहार धान्यांचा समावेश होतो.

9.
आफ्रिकेतील कोणते देश हिऱ्याचे उत्पादन करतात ?

उत्तर – आफ्रिकेतील बोत्सवाना,झैरे,दक्षिण
आफ्रिका
,
अंगोला, नामिबिया
आणि घाना या देशांमध्ये हिऱ्याचे उत्पादन होते.

 *इतिहास*

*12.उत्तर भारतातील कांही राजवंश*

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 305

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *