इयत्ता – नववी
विषय – विज्ञान
भाग – 2
प्रकरण – 12
नैसर्गिक साधन संपत्ती
निसर्गात निर्माण होणाऱ्या घटकास व ज्यांचा उपभोग सजीव घेतो.त्यास नैसार्गिक साधन संपत्ती म्हणतात.
उदा. हवा,पाणी,जमीन,माती,वन्यजीव सृष्टी,जंगले,जीवाश्म इंधने,क्षार, खनिजे
पृथ्वीवर सजीव सृष्टी आढळते.
1.वातावरण 2.जलावरण 3.मृदावरण
हवा – हवा हा मानवी जीवनाचा श्वास आहे.नैट्रोजन,ऑक्सिजन,CO2,पाण्याची वाफ अशा अनेक घटकांचे मिश्रण म्हणजे हवा होय .
हवा प्रदूषण– मानवी हस्तक्षेपामुळे वातावरणातील वायूंच्या प्रमाणात अनैच्छिक बदल घडतो त्यास हवा प्रदूषण म्हणतात,
कारणे–
⇒️औद्योगिक कारखान्यांची वाढ
⇒️वाहनामधून बाहेर पडणारा धुर
⇒️️इंधनाचे ज्वलन
⇒️टाकावू पदार्थाचे ज्वलन
⇒️ध्रुमपान केल्याने
परिणाम
⇒️श्वसनासंबधीत आजार
⇒️आम्लीय पाऊस पडतो
⇒️जागतिक तपमानात वाढ होणे
⇒️आम्लीय पावसामुळे त्वचेचे डोळ्याचे आजार
⇒️ओझोनचा थर कमी होणे
हवेची गती
⇒️सुर्याच्या किरणामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो उष्णतेमुळे हवा हलकी होते व वरती जाते.त्यामुळे कमी दाबाचा पहा तयार होतो तेव्हा उच्च वहनाला आपण वारा म्हणतो. पृथ्वीचे तपमान स्थिर राखण्यासाठी वातावरण मदत करते.कारण वातावरणात हवा आहे हवा उष्णतेची सुवाहक नाही
अंतराळात रात्रीच्या वेळी उष्णतेचा वेग कमी होतो याचे कारण वातारण आहे.चंद्राच्या पृष्ठभागावर वातावरण नाही तिथे तपमान 1900 – 1100 आहे
पाऊस
⇒️जलाशय उषतेमुळे तापतात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वाफेत रुपांतर होते.वाफ हवेत मिसळते.तापलेली गरम हवा हलकी होऊन वरती जाते.हवा जसजशी वर जाते तशी प्रसरण पावते.नंतर ती हवा थंड होते थंड झाल्यामुळे हवेत असणारी पाण्याची वाफ गोठते.गोठल्यामुळे त्याचे छोटे थेंब तयार होतात.लहान लहान थेंब एकत्र येऊन मोठ्या थेंब बनतात.तेव्हा ते जड होतात.घर्षणामुळे पावसाच्या रुपाने खाली पडतात.(समजा हेवेचे तपमान अगदी कमी असेल तेव्हा पावसाचे पाणी बर्फाच्या स्वरूपात खाली पडतात.त्यालाच आपण गाराचा पाऊस असे म्हणतो.)
ढग कसे निर्माण होतात?
⇒️भरपुर बाष्प असलेली हवा उच्च दाबाकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वहन होते.पाण्याचे वाफेत रुपांतर होऊन गरम हवा वरती जाते.तेव्हा हवा आपल्यासोबत बाष्प होऊन जाते.थंड झाल्यामुळे हवेतील वाफ गोठते त्यास ढग असे म्हणतात.
पाणी प्रदूषण
मानवी हस्तक्षेपामुळे जलावरणामध्ये अनैच्छिक बदल घडतो.त्यास पाणी प्रदूषण म्हणतात.
कारणे-:
⇒️कारखान्यातील टाकावू पदार्थ जलाशयात सोडल्याने.
⇒️मानवाच्या दैनदिन कृतीमधून बाहेर पडणारे सांडपाणी.
⇒️शेतामध्ये रसायनांचा अतिवापर केल्याने.
⇒️समुद्रात जहाजामधून होणारी तेल गळती वापरात असलेली तीव्र स्वच्छतेचे.
⇒️आम्लीय पावसामुळे.
परिणाम
⇒️मानवी आरोग्यावर घातक परिणाम उदाहरण कॅन्सर कॉलरा कावीळ इत्यादी
⇒️जलीय सजीव सृष्टीवर घातक परिणाम
⇒️जड पाण्याचा अतिवापर केल्याने,कारखान्यातील
⇒️यंत्रामध्ये बिघाड.
⇒️प्रदूषित पाणी उच्च रसायने पाण्यात सोडल्याने जलाशयाचे
⇒️तापमान वाढते.त्यामुळे तेथील सजीवांच्या पुनरुत्पादन क्रियेवर परिणाम होतो.
शुक्र आणि मंगल ग्रहावरील वातावरणापेक्षा आपल्या पृथ्वीवरील वातावरण कसे वेगळे आहे?
शुक्र आणि मंगळ ग्रहावरील वातावरण CO2 हा वायू जास्त असल्यामुळे तेथील तापमान जास्त असते. पण पृथ्वीवरील वातावरणात O2,N2,CO2 व इतर वायू असतात त्यामुळे तपमान नियंत्रण राहते म्हणून शुक्र आणि मंगळ ग्रहावरील वातावरणापेक्षा पृथ्वीवरील वातावरण वेगळे आहे .
वातावरण एका रंगासारखे कार्य कसे करते?
हवा उष्णतेचा सुवाहग नाही.पृथ्वीचे दिवसा तापमान स्थिर राखण्याचे तसेच वर्षभर देखील तापमान जवळजवळ स्थिर ठेवण्याचे कार्य वातावरण करते.तसेच रात्रीच्या वेळी अंतरिक्षामध्ये जाणाऱ्या उष्णतेचा वेग कमी करण्याचे काम वातावरण करते.
वारे कशामुळे निर्माण होतात?
उष्णतेमुळे हवा हलकी होते व वरती जाते त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो.तेव्हा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे हवेचे वहन होते त्यामुळे वारा निर्माण होतो .
माती
जमिनीच्या वरच्या थरास माती असे म्हणतात.खडकाची झीज होऊन मातीची निर्मिती होते.खडक भौतिक रसायनिक आणि जैविक्रीमुळे फुटतात.तेव्हा हजारो वर्षानंतर खडकाचे रूपांतर मातीत होते मातीत विविध खनिजे क्षार पोषक द्रव्य पदार्थ असतात .
माती प्रदूषणाची कारणे
⇒️ऊन वारा आणि पाणी यामुळे खडकाची झीज होते.तसेच अति पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनीचा वरचा स्थर वाहून जातो.
⇒️मानवाने मातीत अधिक रसायने वापरल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते.
⇒️जंगलतोड केल्यामुळे
⇒️टाकाऊ पदार्थांचे ज्वलन केल्याने
उपाययोजना
⇒️ज्या ठिकाणी जंगल तोड झाली आहे तेथे मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे
⇒️शेतात सेंद्रिय खताचा वापर करणे
⇒️टाकाऊ पदार्थांची योग्य ती विल्हेवाट लावणे वृक्षारोपण करणे
⇒️रिकाम्या जागी गवताची कुरणे वाढविणे
⇒️शेतातील मातीमध्ये गढूळ खत सारखे सेंद्रिय खत वापरणे .
मातीची झीज म्हणजे काय
सुपीक जमीन नापीक होते मातीमधून उपयुक्त घटक नष्ट होतात आणि शेतामध्ये दुसरे पदार्थ घातल्याने जमिनीच्या सुपीकतेवर अनिष्ट परिणाम होतात तसेच त्या जमिनीवरील जैव विविधता नष्ट होते त्याला मातीची झीज असे म्हणतात.
सजीवांना पाण्याची गरज का असते ?
उत्तर – सजीवांना पिण्यासाठी दैनंदिन कार्यासाठी शेतीसाठी वीज निर्मितीसाठी औद्योगिक कारणासाठी
तुम्ही ज्या गावांमध्ये राहता तेथे उपलब्ध असणाऱ्या गोड्या पाण्याचे स्तोत्र?
उत्तर – नदी,विहीर,तलाव
तुम्हाला एखाद्या कृतीची माहिती आहे का की जिच्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते ?
उत्तर – शेतामध्ये रसायनांचा हाती वापर केल्याने गटारीचे पाणी नद्यांना सोडल्याने घरामध्ये वापरलेली स्वच्छते
जैवभूरासायनिक चक्रे
1.
जलचक्र
पर्यावरणात जयाशयातील
पाण्याचे बाष्पीभवन होऊन नंतर ते पावसाच्या रूपात रूपांतर होते नंतर ते नदी समुद्रांना
वाहून जाते यालाच जलचक्र म्हणतात.
नायट्रोजनचे चक्र–
1.ओमिनीफिकेशन –सजीवांच्या मृत शरीरापासून अमोनिया तयार होण्याच्या क्रियेला ओमनीफिकेशन म्हणतात याला
क्रियेला अमोनिया कारक जीवाणू मदत करतो
2.नायट्रीफिकेशन – अमोनियाचे रूपांतर नैट्राईट व नैट्रेटस मध्ये होण्याच्या क्रियेला नैट्रीफिकेशन म्हणतात या
क्रियेला नायट्रोबॅक्टर हा जीवाणू मदत करतो
3.डिनायट्रीफिकेशन – नैट्रेटस व नेट्राईट पासून मुक्त नैट्रोजन ( N2 ) तयार होण्याच्या क्रियेला डिनेट्री फिकेशन म्हणतात या
क्रियेला सुडोमोनास हा जीवाणू मदत करतो
कार्बनचे चक्र
ग्रीन हाऊस परिणाम–
पृथ्वीच्या वातावरणात काही वायूचे प्रमाण वाढले जाते.त्यामुळे उष्णता बाहेर जाऊ शकत नाही जगाच्या सरासरी तापमान वाढ होते या परिणामाला
ग्रीन हाऊस परिणाम असे म्हणतात
कारणीभूत वायू
CO2,मिथेन,ओझोन,NO2 .
ओझोन– ऑक्सिजनच्या तीन अनूपासून तयार होणाऱ्या त्रिआण्णिक रेणू म्हणजे ओझोन होय .
⇒️O2 + [ 0 ] => O3
⇒️ओझोन वायू विषारी असतो.
⇒️ओझोन सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांना आडवितो.
⇒️ओझोन घातक उत्सर्जनाने शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवर
⇒️सजीवांचे संरक्षण होते .
⇒️ओझोन थर नष्ट होण्याची कारणे.
⇒️CFC वायुमुळे एरोसोल्सचा अतिवापर केल्याने उदा.परफ्युम
⇒️स्प्रे सुगंधी द्रव्य इत्यादी कारखान्यातून बाहेर पडणारा क्लोरीन वायू
⇒️शीत उपकरणे एसी कुलर यासारख्या उपकरणांना तयार करणाऱ्या कारखान्यातून CFC वायू ओझोनचा थर नष्ट करतो .
०४.तुम्ही हवामानाचे अहवाल टीव्हीवर आणि वर्तमानपत्रांमध्ये पाहिले आहेत त्यावरून आपण हवामानाचा अंदाज कसा
उत्तर – टीव्ही वर्तमानपत्रे यामधून हवामानाचा अंदाज करतो.उदा.वाढलेले तापमान धुक्याचे प्रमाण पावसाचा अंदाज वाऱ्याचा वेग
वाऱ्याची दिशा आणि चक्रीय वादळाची माहिती कळते.
तापमान उंच व निच्च हे तापमापकाच्या सहाय्याने व आधुनिक
यंत्राच्या सहाय्याने मोजले जाते. वायूंची गती मोजणारे ॲनिमोमीटर सारखी उपकरणे उपलब्ध असतात.पावसाचे प्रमाण मोजणारे
परिणाम असते भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोग्राफ असतो.
01.जलचक्रामध्ये पाणी कोणकोणत्या रूपामध्ये आढळते?
उत्तर
– घन द्रव आणि वायू
०२.अशा दोन संयुगांची नावे सांगा की जी ऑक्सिजन व नायट्रोजनच्या संयोगाने बदललेले असून ती जैविक दृष्टीने महत्त्वाचे आहेत
उत्तर – डी एन ए (DNA) आणि आर एन ए(RNA)
03.मानवाची अशी कोणतेही तीन कृत्य सांगा की ज्याच्यामुळे हवेमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड चे प्रमाण वाढले आहे?
उत्तर – वाहनांचा अतिवापर केल्याने कारखानदारीची वाढ झाल्याने इंधनांचे ज्वलन
01.वातावरणाची जीवनासाठी आवश्यकता का आहे?
पृथ्वीचे दिवसात तापमान स्थिर राखण्याचे तसेच वर्षभर देखील तापमान जवळजवळ स्थिर ठेवण्याचे कार्य वातावरण करते.तसेच रात्रीच्या वेळी
अंतरिक्षामध्ये मध्ये जाणाऱ्या उष्णतेचा वेग कमी करण्याचे काम वातावरण करते.तसेच पृथ्वीवर वातावरण नसते तर सजीव जगू शकले नसते.म्हणून वातावरणाची जीवनासाठी आवश्यकता आहे .
02.जीवनासाठी पाण्याची आवश्यकता का आहे?
सर्व सजीवांना पाण्याची आवश्यकता आहे.कारण सजीवांच्या पेशी मधील सर्व क्रियांसाठी पाण्याचे माध्यम आवश्यक असते.शरीरातील पदार्थ एका
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.सजीवांना पिण्यासाठी शेतीसाठी तसेच दैनंदिन कार्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे.तसेच जलचर प्राण्यांना जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे.
03.मातीवर सजीवांचे जीवन कसे अवलंबून असते?
सजीवांच्या जीवनामध्ये मातीही खूप महत्त्वाचे आहे कारण माती नसेल तर वनस्पती उगवणार नाहीत.वनस्पतीच नसतील तर अन्न निर्मिती होणार नाही.त्यामुळे सजीव जगू शकणार नाहीत.तसेच माती पाणी शोषून घेते.त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते म्हणून माती ही
सजीवांच्या जीवनात खूप महत्त्वाची आहे.
05.हवा पाणी व जलाशयाचा प्रदूषणाचा स्तर मानवाच्या
कृतीमुळे वाढतो तुम्हाला असे वाटते का जर आपण या सर्व कृती एका विशिष्ट व मर्यादित
जागेत केल्या तर प्रदूषण कमी होईल ?
हवा
वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून सर्वजनिक वाहनांचा वापर करणे.टाकाऊ वस्तूचे जलन कमी करणे कारखान्याची संख्या कमी करणे
पाणी
शेतात रसायनांचा ती वापर कमी करणे सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे.
जलाशय
कारखान्यातील गरम पाणी जलाशयात सोडण्याआधी त्याची तीव्रता कमी करावी गटारीचे पाणी जलाशयांना सोडणे थांबविणे
हवा माती व जलाशयांच्या यांच्या दर्जावर जंगलाचा कसा परिणाम होतो यावर टिपा लिहा.
उत्तर – हवा – जंगलामुळे हवा शुद्ध राहते
माती – झाडामुळे जमिनीची धूप थांबते मातीचे संरक्षण होते
जलाशय – ⇒झाडांमुळे जंगलामुळे जलचक्र व्यवस्थित राहते