9th SS 1.WESTERN RELIGIONS

 9वी समाज विज्ञान 

प्रकरण 1 – पाश्चात्य धर्म 

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

 

1.यहुदी (ज्यू ) धर्माचा संस्थापक – अब्राहम 

2. पारसी धर्माचा संस्थापक – झरस्तृष्ट 

3. येशु ख्रिस्ताचे जन्मस्थान  – जेरुसलेम जवळील बेथलहेम 

4. येशु ख्रिस्ताची क्रुसारोहण झालेली टेकडी – गोलगाथा 

5. रोममध्ये ख्रिश्चन धर्माला राज्यधर्म म्हणून मान्यता प्राप्त करून दिलेला सम्राट – कॉन्स्टंटाइन 

6. मोहम्मदचे जन्म ठिकाण –मक्का 

7. इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ – कुराण 

8. मोहम्मदाचे वारसदार प्रेषित खलिफ होय.

 

II. पुढील प्रश्नांची उत्तरे मित्राबरोबर चर्चा करून लिहा.

9. यहुदी (ज्यू) धर्माची शिकवणुकीची यादी तयार करा ?

उत्तर – एकाच ईश्वरावर श्रद्धा ठेवणे,प्रेषिताने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणे,समुदायांनी प्रेषिताने सांगितलेल्या निर्दिष्ट विधी विषयांचे पालन करणे या यहुदी धर्माच्या शिकवणी आहेत.

 

10. पारसी धर्माची शिकवण लिहा ?

उत्तर –पारसी धर्माची शिकवण खालील प्रमाणे – चांगल्याचा दृष्टांवर नेहमीच विजय होतो. मानवाने चांगुलपणाची कास धरली पाहिजे. आहुर मेझदा हा त्यांचा देव आहे. उपवास, ब्रह्मचर्य, निर्मळ अंतकरण हे पारसी धर्मातील आचरण आहे.

11. येशु ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल लिहा ?

उत्तर – त्याचा जन्म बेथलेहेममध्ये जोसेफ आणि मेरी यांच्या गरीब कुटुंबात झाला.त्यांच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसे माहिती नाही.येशूने सुरुवातीला धार्मिक तत्वज्ञान शिकविण्यास सुरुवात केली.नंतर उपदेश करू लागला. दिनदुबळ्यांचा आणि रोग पीडितांचा कैवारी म्हणून प्रसिध्द झाला.येशूंनी प्रेम, सेवा आणि बंधुत्वाचा पुरस्कार केला.

12. येशु ख्रिस्ताच्या शिकवणुकीची यादी तयार करा ?

उत्तर –येशू ख्रिस्ताच्या शिकवणींमध्ये देवाला आपला पिता मानले आहे.वैश्विक बंधुत्वाचा पुरस्कार करणे,वाईट धार्मिक प्रथा टाळणे,पापांसाठी पश्चात्ताप करणे आणि क्षमा मागणे यांचा समावेश आहे.

13. ख्रिश्चन धर्माचा प्रसार कसा झाला ?

उत्तर –येशूच्या कृसारोहणानंतर त्याच्या शिष्यांचा प्रयत्नांनंतर ख्रिश्चन धर्माचा प्रसार झाला.येशूच्या शिष्यांना छळ आणि हौतात्म्याचा सामना करावा लागला.सम्राट कॉन्स्टंटाईनने ख्रिश्चन धर्माचा राज्य धर्म म्हणून स्वीकार केला.

14. प्रेषित मोहम्मदाच्या जीवनाबद्दल थोडक्यात लिहा ?

उत्तर –मोहम्मद पैगंबर यांचा जन्म सा.श.570 मध्ये मक्का येथे  झाला.अब्दुल्ला आणि अमिना हे त्यांचे मातापिता होय.मोहम्मद हा देवाचा प्रेषित आहे असे देवदूतानी भाकित केले होते. त्यांनी आपले आयुष्य देवाची शिकवण देण्यात व्यथित केले.त्याने कधीही स्वतःला देव म्हटले नाही.

विरोधामुळे त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी स्थलांतर केले

15. हिजरा म्हणजे काय?

उत्तर –मोहम्मद आणि त्याचे अनुयायी सा.श. 622 मध्ये मक्केहून ते मदिनाला आले.त्यांच्या या प्रवासाला ‘ हिजरा’ असे म्हणतात.

16. इस्लामचे नियम कोणते?

उत्तर –प्रत्येक इस्लाम अनुयायाने पाळावयाचे आचरण्याचे नितीनियम पुढील प्रमाणे.

1. आल्ला हा एकच देव असून मोहम्मद हा एकच प्रेषित आहे -कालिमा

2. दररोज काबाकडे तोंड करून पाचवेळा प्रार्थना- नमाज

3. रमजान महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास- रोजा

4. आपल्या कमाईतील एक चर्तुतांश भाग गरिबांना दान करणे – जकात.

5. आयुष्यात एकदातरी मक्केला भेट देणे- हाज

या पांच तत्वाना इस्लामचे स्तंभ समजले जाते.

 

Share with your best friend :)