इयत्ता 6 ते 10 च्या प्रथम भाषा कन्नड, द्वितीय भाषा कन्नड पाठ्यपुस्तकांचे आणि इयत्ता 6 ते 10 च्या समाज विज्ञान पाठ्यपुस्तकांचे पुनरावलोकन
शासनाच्या आदेशानुसार विषय तज्ञांनी 2023-24 सालातील पाठ्यपुस्तके इयत्ता 6 ते 10 च्या प्रथम भाषा कन्नड, द्वितीय भाषा कन्नड पाठ्यपुस्तकांचे आणि इयत्ता 6 ते 10 च्या समाज विज्ञान पाठ्यपुस्तकांचे पुनरावलोकन केले आहे आणि काही सुधारणा सुचवल्या आहेत.(परिशिष्ट-1 आणि परिशिष्ट -2 जोडलेले आहेत.)
ते दुरुस्ती स्वरुपात तयार करून राज्य सरकार अभ्यासक्रम शाळांना देण्यात यावे.कर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाकडून सॉफ्टकॉपी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
2023-24 या वर्षासाठी कन्नड भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात प्रस्तावित बदल
परिशिष्ट-1
कन्नड प्रथम भाषा पाठ्यपुस्तकांतील बदल शेवटी दिलेल्या PDF मध्ये उपलब्ध आहेत..
परिशिष्ट-2
समाज विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात 2023-24 या वर्षासाठी सुचवलेले बदल
आमचे गौरवशाली राज्य-कर्नाटक प्रकरणाच्या पृष्ठ क्रमांक 33 वर,कलबुर्गी विभागाचा अध्ययनांश शिकवताना, “केंद्र सरकारने या विभागातील जिल्ह्यांना राज्यघटनेच्या कलम 371 (J) अंतर्गत विशेष दर्जा प्रदान केला आहे.” या वाक्याचा समावेश करावा.
6वी समाज विज्ञान भाग -1
“वेदकालीन संस्कृती” हा नवीन पाठ समाविष्ट केला गेला आहे.
6वी समाज विज्ञान भाग -1
“नवीन धर्मांचा उदय” हा नवीन पाठ समाविष्ट केला गेला आहे.
6वी समाज विज्ञान भाग -2
‘मूलभूत हक्क आणि कर्तव्य’ या प्रकरणासोबत ‘मानवी हक्क’ हा नवीन पाठ्यांश समाविष्ट केला गेला आहे.
7वी समाज विज्ञान भाग -1
“जगातील महत्त्वाच्या घटना” या पाठात जिथे जिथे त्याला ‘ रीलिजन’ म्हटले आहे त्याऐवजी ‘धर्म’ असा बदल करण्यात आला आहे.
7वी समाज विज्ञान भाग -1
“म्हैसूर आणि इतर प्रांत” या प्रकरणामध्ये प्रमुख परजा वडेयर,आयुक्तांचे प्रशासन,दहावे चामराज वडेयर,चौथे कृष्णराज वोडेयार,सर.एम.विश्वेश्वराय आणि सर मिर्झा इस्माईल हे विषय नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.
7वी समाज विज्ञान भाग -2
“सामाजिक आणि धार्मिक सुधारणा” या प्रकरणामध्ये महिला समाजसुधारक हा पाठ्यांश समाविष्ट करण्यात आला आहे.
7वी समाज विज्ञान भाग -2
“स्वातंत्र्य संग्राम” या प्रकरणासह एक अध्याय जोडण्यात आला आहे.महिला स्वातंत्र्यसैनिकांवरील
पाठ्यांश समाविष्ट करण्यात आला आहे.
10वी समाज विज्ञान भाग -1
“भारतासमोरील आव्हाने आणि उपाययोजना” या प्रकरणातील प्रादेशिकता या उपशीर्षकाखाली “भाषाभिमान देखिल प्रांतीयवादास खतपाणी घालून राष्ट्रीय एकात्मतेला मारक ठरतो.अलीकडे आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागात प्रादेशिकतेच्या विरोधात संघर्ष होऊ शकतो याचा विचार करावा.
देशाच्या इतर भागांमध्ये सुरू असलेल्या प्रांतीयवाद/प्रादेशिक संघर्षामुळेही देशाच्या विकासाला आळा बसण्याची शक्यता आहे.अशा संकुचित प्रांतीयवादाला आळा घालण्यासाठी भारतीय घटनेने अनेक उपाय योजलेले आहेत.” हे वाक्य वगळण्यात आले आहे.
कर्नाटक पाठ्यपुस्तक मंडळाची पाठ्यपुस्तके एका क्लिक वर