6th SS Textbook Solution 1.1 Bengaluru Devision 1.1 बेंगळुरू विभाग

6वी समाज विज्ञान 

प्रकरण 3 – आपले गौरवशाली राज्य कर्नाटक

आपल्या राज्यात प्रशासकीय सुविधेसाठी चार महसूल विभागांची रचना केलेली आहे. ते असे आहेत:

  • बेंगळूरू विभाग (9 जिल्हे)
  • मैसुरु विभाग (8 जिल्हे)
  • बेळगावी विभाग (7 जिल्हे)
  • कलबुर्गी विभाग (7 जिल्हे) एकूण एकतीस जिल्हे.

1.बेंगळूरू शहर
2.बेंगळूरु ग्रामीण
3.कोलार
4.चिक्कबळ्ळापूर
5.रामनगर
6.तुमकूरु
7.चित्रदुर्ग
8.दावणगिरी
9.शिवमोग्गा.

1. बेंगळूरु विभागात नऊ जिल्हे आहेत.

2. बेंगळूरू विभागातील सर्वात जास्त पाऊस पडणारा जिल्हा शिवमोग्गा

3. बन्नेरूघट्ट हे राष्ट्रीय उद्यान बेंगळुरू शहर जिल्ह्यात आहे.

4. तुतीची पाने ही रेशीम उद्योगासाठी कच्चा माल ठरतात.

5. प्रसिद्ध लोककला म्यूझियम ‘जानपद लोक’ याची स्थापना डॉ.एच.एल.नागेगौडा यांनी केली.

6. बेंगळूरू शहरात प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव करग

7. मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री के.सी.रेड्डी

8. रामनगर जिल्ह्यातील पक्षीधामामध्ये गिधाड पक्षांचे रक्षण केले जाते.
 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1) प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली तीन राजघराणे कोणती? 

उत्तर – होयसळ,विजयनगर, गंग , वडेयर ही प्राचीनकाळी कर्नाटकात राज्य केलेली राजघराणी होय.

2) या विभागात राज्य केलेल्या दोन पाळेगारांची नावे लिहा.

उत्तर – केळदी, चित्रदूर्ग,यलहंका हे बेंगळुरू विभागात राज्य केलेले पाळेगार होते. 

3) नैसर्गिक स्रोत म्हणजे काय ? उदाहरणे द्या.

उत्तर – नैसर्गिकरित्या मिळणाऱ्या विविध बाबींना नैसर्गिक स्रोत असे म्हणतात. उदा. नद्या, अरण्ये, दऱ्या, धबधबे, खनिजे, जंगली प्राणी इत्यादी.

4) बेंगळूरू विभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासण्याची कारणे कोणती ?

उत्तर – प्रदूषण,अरण्यनाश,शहरीकरण इत्यादी कारणामुळे आपल्या अनेक नद्या ओसाड पडत आहेत. भू अतिक्रमणामुळे अनेक जलाशय नाश्ता होत आहेत या कारणांमुळे बेंगळूरू विभागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे.

5) बेंगळूरू विभागातील दोन धबधब्यांची नावे लिहा.

उत्तर -बेंगळूरू विभागातील दोन धबधब्यांची नावे खालीलप्रमाणे –

1.जोग धबधबा 

2.मुत्यालमडू

6) बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखराचे नाव लिहा.

उत्तर – हालूरामेश्वर हे बेंगळूरू विभागातील अती उंच पर्वत शिखराचे नाव होय.

7) बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधामांची नावे सुचवा.

उत्तर – बेंगळूरू विभागातील दोन पक्षीधामांची नावे – 

गुडवी पक्षीधाम-शिवमोग्गा जिल्हा 

कग्गलडू पक्षीधाम – तुमकुर जिल्हा 

मंडगद्दे पक्षीधाम – शिवमोग्गा जिल्हा

8) बेंगळूरू विभागातील कोणत्या ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहेत?

उत्तर – बेंगळूरू विभागातील  ठिकाणी तयार कपड्यांचे केंद्र निर्माण केलेले आहेत.

9) बेंगळूरू विभागातील प्रमुख आहार पिके कोणती?

उत्तर – नाचणा, मका , जोंधळा ,भात, वाटाणा, हरभरा इत्यादी ही बेंगळुरू विभागातील प्रमुख पिके होय.

10) बेंगळूरू विभागातील ज्ञानपीठ प्रशस्ती मिळविलेल्या तीन साहित्यिकांची नावे लिहा.

उत्तर – कुवेंपू,मास्ती वेंकटेश अय्यंगार व यू. आर. अनंतमूर्ती 

सरावासाठी अधिक प्रश्न व उत्तरे 

उत्तर -प्रसिद्ध लोककला म्यूझियम ‘जानपद लोक’ याची स्थापना एच.एल. नागेगोडा यांनी केली.

उत्तर – करग हा बेंगळूरू शहरात प्रत्येक वर्षी साजरा होणारा प्रसिद्ध उत्सव होय.

उत्तर -भारतरत्न प्रशस्ती मिळविलेल्या बेंगळूरू विभागातील दोघांची नावे – 

1.सर एम्. विश्वेश्वरय्या 

2. सी.एम. आर.राव 

उत्तर – के.सी. रेड्डी हे मैसुरू राज्याचे पहिले मुख्यमंत्री होय.

उत्तर – कर्नाटक एकीकरण घडवून आणनाऱ्या दोन नेत्यांची नावे –

1. केंगल हनुमंतय्या

2. एस. निजलिंगप्पा

उत्तर – रामनगर जिल्ह्यातील पक्षीधामामध्ये गिधाड या पक्षाचे रक्षण केले जाते. 

उत्तर – तुतीची पाने ही रेशीम उद्योगासाठी कच्चा माल ठरतात.

उत्तर – भद्रावती येथील पोलाद व लोखंडाच्या कारखान्यांची स्थापना 1923 साली करण्यात आली.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *