7th SS Textbook Solution 2.Medieval Europe 7वी समाज विज्ञान 2.मध्ययुगीन युरोप

7वी समाज विज्ञान 

प्रकरण 2 – मध्ययुगीन युरोप


7th SS Textbook Solution 2.Medieval Europe 7वी समाज विज्ञान 2.मध्ययुगीन युरोप


इयत्ता – सातवी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 
 
विषय – स्वाध्याय 

प्रकरण 2 – मध्ययुगीन युरोप


1. एका शब्दात अथवा वाक्यात उत्तर लिहा.

1. पुनरुज्जीवनाची सुरूवात कोठे झाली ?

उत्तर – पुनरुज्जीवनाची सुरुवात इटलीमध्ये झाली.

2. पुनरुज्जीवनाची दोन वैशिष्ट्ये कोणती ? 

उत्तर – मानवतावाद आणि वैचारिकता ही पुनरुज्जीवनाची दोन वैशिष्ट्ये होती.

3. छपाई यंत्राने पुनरुज्जीवनाला कशी प्रेरणा दिली ?

उत्तर – छपाई यंत्राने पुस्तके आणि हस्तलिखित सहजरीत्या उपलब्ध झाली. त्यामुळे ज्ञानाच्या प्रसारक्षेत्रात क्रांती आणि बदल झाले व पुनरुज्जीवनाला प्रेरणा मिळाली

4. कॉन्स्टंटीनोपल आधुनिक नाव काय आहे? 

उत्तर – इस्तंबूल हे कॉन्स्टंटीनोपलचे आधुनिक नाव आहे.

5. पुनरुज्जीवन काळातील तीन प्रसिद्ध साहित्यिक कोण ?

उत्तर – विल्यम शेक्सपियर,दांटे,पेट्रार्क हे पुनरुज्जीवन काळातील प्रसिद्ध साहित्यिक होते.

6. डेकमेरन हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर – डेकमेरन हे पुस्तक बोक्याशिओ यांनी लिहिले.

7. विल्यम शेक्सपियर कोण होते ?

उत्तर – विल्यम शेक्सपियर हे सुप्रसिद्ध इंग्रजी नाटककार होते.

8. सेंट पिटर चर्च कोठे आहे?

उत्तर – सेंट पीटर चर्च रोममध्ये आहे.9. पुनरुज्जीवन काळातील प्रख्यात चित्रकार कोण ?

उत्तर-लिओनार्दो-द-विंची हे पुनरुज्जीवन काळातील प्रख्यात चित्रकार होते.

10. पुनरुज्जीवन काळातील दोन प्रसिद्ध शास्त्रज्ञ कोणते ?

उत्तर – कोपर्निकस,केपलर,गॅलिलिओ हे पुनरुज्जीवन काळातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते.

11. पापमुक्तीचे पत्र म्हणजे काय ?

उत्तर – माणूस पाप मुक्त होऊन स्वर्गाला जातो या अंधश्रद्धेच्या नावाने रूम मधील सेंट पीटर चर्चने दिलेल्या पत्राला पाप मुक्ती पत्र असे म्हणत.

12. मार्टिन ल्यूथर कोण होता ?

उत्तर मार्टिन ल्युथर हे जर्मनीतील धार्मिक सुधारणा चळवळीचे नेते होते.

13. प्रोटेस्टंट म्हणजे कोण ?

उत्तर – मार्टिन ल्युथरच्या अनुयायांना प्रोटेस्टंट असे म्हणत.

14. प्रतिसुधारणा म्हणजे काय ?

उत्तर – कॅथोलिक चर्चेच्या अंतर्गत सुधारण्यासाठी केलेल्या सर्व प्रयत्नांना प्रतिसुधारणा असे म्हणतात.

15. जिजस संघाची स्थापना कोणी केली?

उत्तर – इग्नेशियस लायोला यांनी जीजस संघाची स्थापना केली.

16. मार्कोपोलो कोण होता?

उत्तर – मार्कोपोलो हा आशियाई देशांना भेट दिलेला प्रवासी होता.17. आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वादळाचे भूशिर (केप ऑफ स्टॉर्म) असे कोणी संबोधले?

उत्तर – पोर्तुगीज खलाशी बार्थोलोमियो डायस यांनी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वादळाचे भूशिर (केप ऑफ स्टॉर्म) असे संबोधले.

18. कोलंबसने अमेरिकेतील रहिवाशांना काय नाव दिले?

उत्तर – कोलंबसने अमेरिकेतील रहिवाशांना इंडीयन असे नाव दिले.

19. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज कोणते?

उत्तर – व्हीक्टोरिया हे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज आहे.

20. ‘हेन्री द नेव्हिगेटर’ असे कोणाला संबोधले गेले?

उत्तर – पोर्तुगीज राजकुमार हेन्री यांना ‘हेन्री द नेव्हिगेटर’ असे संबोधले गेले.
Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *