9th SCIENCE 1. APLYA SABHOVATALCHE DRAVYA ( 1.आपल्या सभोवतालचे द्रव्य)




 




 

1. आपल्या
सभोवतालचे द्रव्य

 

द्रव्य -:

द्रव्य हे लहान लहान कण एकत्र येऊन तयार होते.

द्रव्याला निश्चित वस्तुमान आहे.

द्रव्याला निश्चित आकारमान आहे.

जो पदार्थ जागा व्यापतो व जाला निश्चित वस्तुमान असते त्यास द्रव्य असे म्हणतात” द्रव्याच्या पाच अवस्था

1.  घन

2.      द्रव

3.      वायु

4.      प्लाझ्मा

5.      BEC

द्रव्य पदार्थ विसरण क्रिया पार पाडतात.कणांची सतत हालचाल होत असते.काही द्रव्या दरम्यान मोकळी जागा असते.द्रव्य कणांमध्ये आकर्षण जोर असतो.

घन अवस्था  – 

1. यांना निश्चित आकार व आकारमान असतो.

2.      आकर्षणिय जोर अधिक असतो.

3.      गतिजन्य ऊर्जा कमी असते.

4.      न प्रसरण पावत नाहीत.

5.      घन पदार्थ कठीण असतात.

6.      काही घन पदार्थ लवचिक असतात.

7.      घन पदार्थावर जोर दिला असता आकारमानात बदल होत नाहीत म्हणून
ते असंपिडय असतात.

8.      काही घनपदार्थ जोर दिल्यास आकार बदलतात व पुन्हा मूळ
स्वरूपात येतात त्यास स्थिती स्थापक गुणधर्म असे म्हणतात.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा

1. खालीलपैकी द्रव्य पदार्थ कोणते?

उत्तर – खुर्ची,हवा,गंध,बदाम,थंडी शीतपेय,सुगंध हे द्रव्य पदार्थ आहेत.

2.खालील निरीक्षणाची कारणे द्या?

      गरमा गरम स्वादिष्ट अन्नाचा वास अनेक मीटर अंतरावरुन तुमच्यापर्यंत पोहोचतो.पण थंडगार अन्नाचा वास घ्यायला तुम्हाला त्याच्याजवळ जावे लागते.

उत्तर – कारण गरम पदार्थांमध्ये उष्णता जास्त असते आणि गरम पदार्थांमध्ये विसरण क्रिया जलद घडते.म्हणून गरमा गरम स्वादिष्ट अन्नाचा वास अनेक मीटर अंतरावरून आमच्यापर्यंत पोहोचतो तसेच थंड पदार्थांमध्ये उष्णता नसते म्हणून थंडगार अन्नाचा वास घ्यायला आम्हाला त्याच्या जवळ जावे लागते.

३.पोहण्याच्या तलावात पाणबुड्या सूर मारून पाणी कापते तेथे पाण्याचा कोणता गुणधर्म दिसून येतो?

उत्तर – येथे पाण्याचा प्रवाहित गुणधर्म दिसून येतो

४.द्रव्य कणाची वैशिष्टे सांगा?

उत्तर – द्रव्याला निश्चित वस्तुमान आहे.

          द्रव्याला निश्चित आकारमान आहे.

द्रव्य पदार्थ विसरण क्रिया पार पाडतात.

द्रव्य कणांमध्ये आकर्षणिय जोर असतो.




 

द्रव अवस्था –

 1.द्रवाला आकार नसतो पण आकारमान असते.

2.रेणूमधील आकर्षणिय जोर घना पेक्षा कमी व वायू पेक्षा अधिक असतो.

3.गतिजन्य ऊर्जा ही घटना पेक्षा अधिक व वायू पेक्षा कमी असते.

4.द्रव प्रवाहित हा गुणधर्म दर्शवितात.

5.द्रव हे कमी संपीड्य आहेत

उदा.पाणी, दूध, तेल शीतपेय

वायु अवस्था

1.वायूला निश्चित आकार व आकारमान नसते.

2.रेणू मधील आकर्षणिय जोर सर्वात कमी असतो.

3.गतिजन्य ऊर्जा सर्वात अधिक असते.

4.वायू सर्वात जास्त सपीड्य असतात.

उदा. :-ऑक्सिजन,कार्बन डायऑक्साइड,नायट्रोजन,मिथेन

प्रश्ने -:

1.पदार्थांच्या आकारमानाचे प्रति एकेक वस्तुमान म्हणजे घनता
होय.खालील पदार्थ घनतेच्या चढत्या क्रमांकात लिहा.

उत्तर –  हवा धुराड्यातून बाहेर पडणारा धूर,पाणी,मध,कापूस,खडू आणि लोखंड.

टिपा लिहा

1.ताठरपणा –  घन द्रव व वायू

2.संपीडयता – वायु द्रव व घन

3.प्रवाहितपणा – द्रव वायू घन

4.सिलेंडरमध्ये वायू भरणे – वायू

5.आकार –  घन

6.गतिजन्य ऊर्जा –  वायू,द्रव,घन

7.घनता – घन,द्रव,वायू




 

कारणे द्या

1. वायु साठविणाऱ्या भांड्यात वायू पूर्णपणे भरून जातो.

उत्तर –  वायू साठविणाऱ्या भांड्यात वायू पूर्णपणे भरून जातो.कारण वायूमध्ये संपीड्यशील हा गुणधर्म आहे.तसेच त्यांच्यामध्ये गतिजन्य ऊर्जा अधिक आहे म्हणून……..

2. साठविण्याच्या भांड्याच्या भिंतीवर वायू दाब निर्माण करतो.

उत्तर –  कारण वायू संपीड्य असतात.त्यामुळे ते दाब निर्माण करतात.

3.लाकडी टेबलला स्थायू म्हणतात.

उत्तर – लाकडी टेबल ला स्थायु म्हणतात.कारण लाकडी टेबलला आकार व आकारमान हे दोन्ही असतात.

४.आपण हवेत सहजपणे हात फिरवतो हीच क्रिया लाकडाच्या ओडक्यात करण्यात कराटे तज्ञांची आवश्यकता भासते.

उत्तर –  आपण हवेत सहजपणे हात फिरवितो.कारण हवा ही वायू अवस्था आहे.त्यामुळे वायूमध्ये रेणू अतिशय विरळ असतात.पण क्रिया लाकडाच्या ओंडक्याला करण्यास कराटे तज्ज्ञांची आवश्यकता आहे.कारण लाकडाचे रेणू अतिशय जवळ जवळ असतात.

५.सामान्यपणे स्थायूच्या तुलनेत द्रवाची घनता कमी असते तरीसुद्धा पाण्यावर बर्फ तरंगताना दिसून येतो असे का?

उत्तर –  कारण बर्फाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असे म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो

 

अवस्थांतर -अवस्था रूपांतरित करणे.

पदार्थांचे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला अवस्थांतर असे म्हणतात.

एकत्रीकरण –   घन पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे द्रव रूपात रूपांतर होते यालाच एकत्रीकरण असे म्हणतात.

बाष्पीभवन –  द्रव पदार्थाला उष्णता दिली असता त्याचे वायू रुपात रुपांतर होते यालाच बाष्पीभवन असे म्हणतात.

संघनन वायु पदार्थातून उष्णता काढून घेतली असता त्याचे द्रवरूपात रूपांतर होते यालाच संघनन प्रक्रिया असे म्हणतात.

दृढिभवन द्रव पदार्थातून उष्णता काढून घेतली असता त्याचे घन पदार्थात रूपांतर होऊ नये म्हणजे दृढिभवन  होणे.

संप्लवण घनपदार्थांची रूपांतर द्रव अवस्थेत न होता थेट वायुरूपात होते त्या क्रियेला संप्लवण असे म्हणतात.

उदा. कापूर नॅथॉलिनया गोळ्या डांबर गोळी.




 

1. खालील तापमानाचे सेल्सियस श्रेणीत रूपांतर करा.
1.   300 K
 –

     300 – 273

     = 27° C
2.    573 K

      373
– 273

      =
100
° C
2.
खालील तापमानाला पाण्याची भौतिक अवस्था कोणती आहे?
a.  250° C

250 + 273

= 573 K

 यामध्ये
वायू ही पाण्याची भौतिक अवस्था आहे.

b. 100
° C

100 + 273

= 373 K

यामध्ये वायूही पाहण्याची भौतिक अवस्था आहे.
3.
वातावरणातील वायूंचे द्रवीकरण करण्याची एक पद्धत सुचवा.
उत्तर – वातावरणातील वायूंचे द्रवीकरण करण्याची एक पद्धत म्हणजे संघनन होय.
4.
कोणत्याही पदार्थाचे अवस्थांतर होत असताना तापमान स्थिर का राहते?
उत्तर – कारण प्रत्येक पदार्थाचा विलयबिंदू आणि उत्कलन बिंदू निश्चित ठरलेला असतो.त्याला कितीही उष्णता दिली असता त्यामध्ये कोणताही बदल होत नाही.म्हणून तापमान स्थिर राहते.




 

प्रश्न :
1.
कोरड्या गरम दिवशी डेझर्ट कूलर इतर दिवसापेक्षा छान थंडावा कां देतो ?
उत्तर – उत्तर : डेझर्ट कूलर हे एक असे उपकरण आहे जे पाण्याचे बाष्पीभवन करून हवा थंड करते. उन्हाळ्याच्या दिवसात हवा गरम असते. डेझर्ट कूलर मध्ये जेव्हा बाहेरील गरम हवा जेव्हा आत येते. तेव्हा ती कुलिंग पॅड वर आदळते ( कुलिंग पॅड म्हणजे ओला कापडी पट्टा ) कुलिंग पॅड मधील पाण्याचे गरम हवेमुळे बाष्पीभवन होते. त्यामुळे आतील हवा थंड होऊन बाहेर पडते.कोरड्या दिवशी किंवा उन्हाळ्यात तापमान जास्त असते म्हणून डेझर्ट कूलर इतर दिवसापेक्षा छान थंडावा देतो.


2.
मडक्यातील पाणी उन्हाळ्यात कसे थंड होते ?
उत्तर – मातीचे मडके सछिद्र असल्यामुळे मडक्यातील पाणी सतत पाझरत असते. उन्हाळ्या मधील जास्त हवेच्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन मडक्यातील पाण्याचे तापमान कमी होते.
3.
आपल्या हाताच्या तळव्यावर थोडे ॲसिटोन किंवा पेट्रोल किंवा परफ्यूम ओतल्यास आपल्याला थंड का वाटते?
उत्तर – आपल्या शरीराचे तापमान 37 अंश सेलसिअस इतके असते या तापमानाला एसीटोन पेट्रोल किंवा परफ्युम यांचे जलद गतीने बाष्पीभवन होते. त्यामुळे हाताच्या तळव्यावरील तापमान काही क्षणांसाठी कमी होते.म्हणून आपल्याला गारवा वाटतो.
4.
कपपेक्षा बशीतून गरम चहा किंवा दूध जलद पीणे का शक्य होते?
उत्तर – कारण कपपेक्षा बशीचे क्षेत्रफळ अधिक असते त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया जलद घडते म्हणून कपपेक्षा बशीतून गरम चहा किंवा दूध लगेच थंड होतात.
5.
उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरावेत?
उत्तर –  सुती कपडे वापरावेत.आपले शरीर घाम निर्माण करते.तो घाम सुती कपडे शोषून घेतात व बाष्पीभवन घडवितात. 
 

प्रश्ने –

1. खालील तापमानांचे सेल्सियस श्रेणीत रूपांतर करा.
a) 293 K
 

 293 – 273

= 20° C

b) 470K
470 – 273

= 197° C
2.
खालील
तापमानांचे श्रेणीत रूपांतर करा

a) 25°c
25 + 273

= 298 K


b) 373°c

373 + 273

= 746 K




 


3.
खालील पदार्थांचे त्यातील कणांत असणाऱ्या एकमेकांशी आकर्षण बलांच्या चढत्या क्रमात मांडणी करा – पाणी, साखर, आक्सिजन.
उत्तर – ऑक्सीजन,पाणी,साखर.
4.
खालील तापमानाला पाणी कोणत्या भौतिक अवस्थेत असते?

a) 25°c – द्रव
b) 0°c –
घन
c) 100°c –
वायू
5.
कारणे द्या.
a)
नॅपथॅलीन च्या गोळ्या (डांबर गोळ्या) कालांतराने मागे काँही न सोडता अदृष्य
होतात.

कारण –नॅपथॅलीन गोळ्या संप्लवन क्रिया पार पाडतात. म्हणजेच त्या घनपदार्थ अवस्थेतून थेट वायू अवस्थेत जातात.येथे विसरण क्रिया स्पष्ट होते.
b)
अत्तराचा सुगंध त्याच्यापासून अनेक मीटर लांब असतानाही येतो.
कारण – अत्तर आतील पानांची हालचाल अतिशय वेगाने होते त्यामुळे काही सेकंदातच अत्तराचा सुगंध आणि एक मीटर लांब जातो.
6. खालील विधानांच्या समर्थनार्थ दोन कारणे द्या.
a)
खोलीच्या तपमानाला पाणी द्रवरूप असते.
कारण –पाण्याच्या अद्वितीय गुणधर्म 4°c ला पाण्याची घनता उच्च असते.म्हणजेच खोलीच्या तापमान 25 अंश सेल्सिअसला पाणी हे द्रव अवस्थेत असते येथे अद्वितीय गुणधर्म स्पष्ट होतो.

b) खोलीच्या तपमानाला लोखंडी कपाट स्थायू असते.
कारण –खोलीचे तापमान 25°c ला लोखंडी कपाट कठीण, ताठपणा,असंपिड्य आहे गुणधर्म दर्शवितो.आकार व आकारमानात बदल होत नाही.म्हणजेच ते स्थायू अवस्थेत असेल.




 


7. 273 K
तापमानाला पाण्यापेक्षा बर्फ अधिक
समर्थपणे थंड करतो.

उत्तर -बाष्पीभवन क्रियेसाठी लागणारी अप्रकट उष्णता बर्फामध्ये अधिक असते म्हणून गार पाण्याऐवजी बर्फ घेतल्यास पदार्थ अधिक थंड होतात.कारण बर्फ पदार्थांमधील अधिक उष्णता शोषून घेतो.
8.
यापैकी जास्त तीव्र भाजण्याच्या जखमा कोणाच्या
a) उकळले पाणी
b)
वाफ

उत्तर – वाफेमुळे जास्त तीव्र भाजण्याच्या जखमा होतात. कारण उकळलेल्या पाण्यापेक्षा वाफेमध्ये अप्रकट उष्णता ऊर्जा तीव्र असते.
9.
अवस्थांतर दर्शविण्याच्या खालील आकृतीत ABCD आणि E याठिकाणी योग्य नामकरण
करा.

Capture

Aएकत्रीकरण
         

Bबाष्पीभवन
                       

Cसंघनन    

Dदृढीभवन          

E आणि F – संप्लवन

बाष्पीभवनाची अप्रकट उष्णता ऊर्जा म्हणजे वातावरणाच्या दाबाला 1 Kg. द्रवाचे त्याच्या उत्कलन बिंदूत वाफेत रूपांतर करण्यासाठी लागणारी उष्णता ऊर्जा होय.

द्रावणांकाला 1 Kg स्थायूचे द्रवात रूपांतर करण्यासाठी लागणाऱ्या उष्णता ऊर्जेच्या राशीला विलयनाची अप्रकट उष्णता असे म्हणतात.




 

 

 

Share with your best friend :)