सोमवार दिनांक 13 -06-2022 रोजी कर्नाटक विधान परिषदेच्या खालील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक घोषित झाली आहे.
मतदार संघ | जिल्हा |
कर्नाटक वायव्य पदवीधर मतदारसंघ | विजापूर बागलकोटे आणि बेळगावी जिल्हा |
कर्नाटक दक्षिण पदवीधर मतदार संघ | म्हैसूर चामराजनगर मंड्या आणि हसन जिल्हा |
कर्नाटक वायव्य शिक्षक मतदार संघ | विजापूर बागलकोट आणि बेळगाव जिल्हा |
कर्नाटक पश्चिम शिक्षक मतदार संघ | धारवाड,हावेरी,गदग आणि उत्तर कन्नड जिल्हा. |
वरील मतदारसंघातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा महाविद्यालये,अनुदानित आणि विनाअनुदानित शैक्षणिक संस्था, इतर सर्व शैक्षणिक संस्था, राज्य आणि केंद्र सरकारची कार्यालये,राष्ट्रीयकृत आणि इतर बँका,केंद्र आणि राज्य सरकारचे कारखाने,उर्वरित औद्योगिक संस्था आणि सहकारी क्षेत्रातील संस्था,व्यावसायिक संस्था, औद्योगिक आस्थापना आणि इतर आस्थापनांमध्ये कायमस्वरूपी किंवा दैनंदिन रोजंदारी करणाऱ्या पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांना सोमवार दि. 13.06.2022 रोजी कर्नाटक विधान परिषदेच्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी मतदान करण्यास अनुकूलतेसाठी विशेष प्रासंगिक रजा मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
GOVT. CIRCULAR