अ. नवीन शब्दांचे
अर्थ.
मुक्तकंठाने- मोकळ्या मनाने,
निरसन करणे -निवारणे
कठीण -कडक
कणखर -कठिण
मोहरा -पूर्वीची सोन्याची नाणी,
छिन्नी -दगडाला आकार द्यायचे साधन
आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. कलेच्या रुपानेसमाजाची सेवा कोण करतो ?
उत्तर – कलेच्या रुपाने समाजाची सेवा मूर्तिकार करतो.
2. राजा मूर्तिकाराकडे काय घेऊन गेला होता?
उत्तर -राजा मूर्तिकाराकडे एक शंका घेऊन गेला होता.
3. मूर्तिकार कशाप्रकारच्या मूर्ती तयार करत होता?
उत्तर -मूर्तिकार आकर्षक व उठून दिसणाऱ्या मूर्ती तयार करत होता.
4. पहिल्या मूर्तीची किंमत किती मोहरा होती?
उत्तर -पहिल्या मूर्तीची किंमत शंभर मोहरा होती.
5. तीन मूर्तीना कोणता दगड वापरला होता?
उत्तर -तीन मूर्तीना एकच दगड वापरला होता.
6. दुसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य कोणते होते?
उत्तर-एका कानातून घातलेला दोरा मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडतो.म्हणजे अशी व्यक्ती, ऐकलेल पटदिशी दुसऱ्याला बोलून मोकळी होते हे दुसऱ्या
मूर्तीचे वैशिष्ट्य होते.
7.सर्वश्रेष्ठ मूर्ती कोणती ?
उत्तर – तिसरी मूर्ती ही सर्वश्रेष्ठ मूर्ती होती.
8.मूर्तीतील फरक कोणाच्या स्वभावाला लागू पडतात?
उत्तर -मूर्तीतील फरक माणसाच्या स्वभावाला लागू पडतात.
इ.खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिही.
1.मूर्ती बनवणे हे काम कठिण का असते?
उत्तर -कणखर आणि टणक दगड घेऊन त्या दगडातील नको असलेला भाग छिन्नीने काढून टाकणे व त्यापासून आकर्षक मूर्ती बनवणे खूप अवघड असते. एवढे सोपे नाही.दगडावर एक जरी छिन्नीचा घाव जादाचा पडला की दगड फुटू शकतो दगड फुटू शकतो.मूर्ती बनवणे हे काम कठिण असते असे म्हटले जाते.
2.मूर्तिकार मूर्ती तयार करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवतो?
उत्तर – कणखर आणि टणक दगड घेऊन त्या दगडातील नको असलेला भाग छिन्नीने काढून टाकणे व त्यापासून आकर्षक मूर्ती बनवणे एवढीच गोष्ट मूर्तिकार लक्षात ठेवतो.
3.मूर्तिकाराने तयार केलेल्या मूर्तीची किंमत किती किती होती?
उत्तर -मूर्तिकाराने तयार केलेल्या पहिल्या मूर्तीची किंमत शंभर मोहरा,दुसऱ्या मूर्तीची किंमत एकसहस्त्र मोहरा, आणि तिसऱ्या मूर्तीची दशसहस्त्र मोहरा होती.
4.पहिल्या मूर्तीमध्ये कोणता मनुष्यगुण दडलेला होता?.
उत्तर – म्हणजेच ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे‘ याप्रमाणे मनुष्य एका कानाने ऐकून लगेच दूसऱ्या कानाने सोडून देतो.हा मनुष्यगुण पहिल्या मूर्तीमध्ये दडलेला होता.
5. दुसऱ्या मूर्तीचे वैशिष्ट्य कोणते?
उत्तर -एका कानातून घातलेला दोरा मूर्तीच्या तोंडातून बाहेर पडतो.म्हणजे अशी व्यक्ती, ऐकलेल पटदिशी दुसऱ्याला बोलून मोकळी होते.हे दुसऱ्या
मूर्तीचे वैशिष्ट्य होते.
6. तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ का होती?
उत्तर – तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेला दोरा सरळ जाऊन मूर्तीच्या डोक्यात गोळा होतो.तो कुठूनही बाहेर पडत नाही.म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती ऐकून मिळविलेले ज्ञान आपल्या मेंदूत साठवून ठेवतो.जेंव्हा गरज पडेल तेव्हाच त्या ज्ञानाचा वापर करतो.हा मनुष्यगुण दडल्यामुळे तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ होती.
ई.खालील ‘अ‘ ‘ब‘ ‘क‘ गटातील जोड्या जुळवा.
अ | ब | क |
1.पहिली मूर्ती | एक शतक मोहरा | नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. |
2.दुसरी मूर्ती | एक सहस्त्र मोहरा | पटदिशी बोलून मोकळे होणे. |
3.तिसरी मूर्ती | दशसहस्त्र मोहरा | ज्ञान ग्रहण करणे. |
उ.समानार्थी शब्द शोधून लिही.
1.अतिशय – खूप
2.नृप – राजा
3.मनोहर – सुंदर
4.तारीफ – प्रशंसा
5.परीक्षा -कसोटी
ऊ.खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या उलट अर्थाचे शब्द मोकळ्या जागेत भरुन
वाक्य पूर्ण कर.
1. मूर्तिकार
कष्टाळू होता. तो कामचोर नव्हता.
4. मूर्तीसाठी
मृदू दगड चालत नाहीत. त्यासाठी कठीण दगड योग्य असतात.
5. राजा भ्याड
नव्हता. तो धाडसी होता.
6. राजाने
मूर्तिकाराची प्रशंसा केली.निंदा केली नाही.
7. प्रधान
हा स्वार्थी नव्हता.तो निस्वार्थी होता.
ए.खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करुन लिहा.
1. वेळ –
पहाटेची वेळ अभ्यासासाठी चांगली असते
2. सुंदर
– माझ्याकडे खूप सुंदर मूर्ती आहे.
3. कठीण –
कठीण दगडापासून मूर्तिकार सुंदर मूर्ती बनवतो.
– तिसरी मूर्ती सर्वश्रेष्ठ होती.
Yudistera
It’s so useful for me and my friends who is studying in 5th std
Thank You