शब्दार्थ :
■ मुकिया – मुका,ज्याला बोलता येत नाही असा
■ चाखावया – दिधली खायला दिली
■ बोली – वाणी,शब्द
■ पर – दुसरा
■ दारा- पत्नी,बायको
■ द्रव्य – धन,पैसा
■ पराव्याकारणे- दुसऱ्याच्या कल्याणासाठी
■ संतोष – समाधान
■ विहित – आहे त्यात
■ संतांचिया संगे – संतांच्या सहवासात
■ अनुरागे – प्रेमाने
■ समबुद्धी – समतेची बुद्धी
■ अहंता – अहंकार,मीपणा
■ऊपाधी -विशेषण,पदवी
■ मिथ्याकल्पना – खोट्या कल्पना
■ ताटी – दरवाजा,दार
■ जननी – आई
■ पाषाण – दगड
स्वाध्याय :
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून
लिहा.
(अ) संत
गोरा कुंभार यांचा जन्म या गावी झाला.
(अ) लातूर
(ब) कळंबा
(क) तेर
(ड) उस्मानाबाद
उत्तर – (क) तेर
(आ)
सर्व संत गोरोबांना असे म्हणत.
(अ) गोरा काका
(ब) गोरोबा काका
(क) संत गोरबा
(ड) गोरा माऊली
उत्तर – (ब) गोरोबा काका
(इ) संत
गोरा कुंभारांनी आयुष्यभर या योगाचे आचरण केले.
(अ) ज्ञानयोग
(ब) राजयोग
(क) निष्काम कर्मयोग
(ड) संन्यास
उत्तर – (क) निष्काम कर्मयोग
(ई) तेराव्या शतकातील तेजस्वी व स्पष्टवक्ती
संत कवयित्री कोण ?
(अ) जनाबाई
(ब) वेणाबाई
(क) बहिणाबाई
(ड) संत मुक्ताबाई
उत्तर – (ड) संत मुक्ताबाई
(उ) ‘ताटीचे अभंग‘ यांनी लिहिले.
(अ) ज्ञानदेव
(ब) संत सोपानदेव
(क) संत मुक्ताबाई
(ड) संत जनाबाई
उत्तर – (क) संत मुक्ताबाई
(ऊ) नामदेवांचे गुरु हे होते
(अ) निवृत्तीनाथ
(ब) संत गोरोबा
(क) विसोबा खेचर
(ड) संत मुक्ताबाई
उत्तर – (क) विसोबा खेचर
(ए)
ताटी याचा अर्थ
(अ) दार
(ब) खिडकी
(क) ताट
(ड) भिंत
उत्तर – (अ) दार
(ऐ) ‘जननी‘चा समानार्थी शब्द
(अ) भार्या
(ब) भगिनी
(क) माऊली
(ड) पिता
उत्तर – (क) माऊली
प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
(अ) संत गोरा कुंभारांनी साखरेचे उदाहरण का दिले आहे?
उत्तर – कारण साखर तोंडात टाकल्यानंतर तोंड गोड होते व आपण गोडच बोलतो तशी भक्ती ही गोडच असते आनंद देणारी असते.
(आ) ‘ताटीचे अभंग‘ याचा अर्थ सांगा.
उत्तर – ज्ञानेश्वरांनी निराश होऊन स्वतःला खोलीत कोंडून घेतले व दरवाजा लावून घेतला तो उघडावा म्हणून जे अभंग लिहिले त्याला ताटीचे अभंग म्हणतात.
(इ) संत मुक्ताबाईनी संतांचे कोणते लक्षण सांगितले आहे?
उत्तर – संत मुक्ताबाई नी संत दया क्षमा असलेले लोक नसलेले विरक्त आणि पृथ्वीवर अथवा परलोकात सुखी-समाधानी असतात हे लक्षण सांगितले आहे.
(ई) संत मुक्ताबाईच्या मते विरक्त कोणाला म्हणावे?
उत्तर – ज्यांच्या अंगी दया क्षमा आहे आणि ज्यांनी लोभ आणि अहंकार सोडला आहे त्यांना विरक्त म्हणावे.
(उ) संत मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना कोणती विनंती केली आहे?
उत्तर – संत मुक्ताबाई नी ज्ञानेश्वरांना यांच्या तोंडी शुद्ध ज्ञान आहे त्यांनी समाजातील खोट्या कल्पनाना दूर सावरून ताटी उघडून सर्वांस समोर येऊन उभे रहावे अशी विनंती केली.
(ऊ) संत नामदेव कोणाला लोटांगण घालावे असे म्हणतात?
उत्तर – संतांचा समुदाय जेथे असेल त्यांना लोटांगण घालावे असे म्हणतात.
(ए)
परमेश्वराचे नाव कसे घ्यावे?
उत्तर – सदासर्वकाळ संतांच्या संगतीत राहूनच परमेश्वराचे नाव घ्यावे.
(ऐ) मनात कोणता भाव दृढ धरावा?
उत्तर – परमेश्वर सदासर्वकाळ आपल्या बरोबरच असतो असा भाव मनात दृढ धरावा.
प्र. 3 (रा) खालील
प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) भक्तीचा आनंद शब्दातून व्यक्त करता येत नाही तेव्हा भक्ताची स्थिती कशी असते ?
उत्तर – भक्तीचा आनंद शब्दातून व्यक्त करता येत नाही तेव्हा भक्ताची स्थिती साखरेच्या करण्यासारखी गोड असते.कारण साखरेचे कण जागताना त्यांचा प्रत्येक भाग आपल्यातील गोडवाच व्यक्त करतो भक्तीचेही तसेच आहे.
(आ) संत मुक्ताबाईंनी संताच्या सद्गुणांचे वर्णन कसे केले आहे. ते लिहा.
उत्तर – संतांनी आपल्या अंगी वैराग्यशील ता बनवलेली असतेत्यामुळेच त्यांच्या मनात दया शमा लोभ मोह अहंकार उरत नाही ते सर्वांपासून दूर राहू शकतात या पृथ्वीवर किंवा स्वर्गात ही त्यांच्या तोंडातून शुद्ध ज्ञानाचाच भाग ऐकण्यास मिळतो.खोट्या कल्पना त्यांनी मागे सारलेल्या असतात असे संतांच्या सद्गुणाचे वर्णन केले आहे.
प्र.4 (था) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(अ) जग हे करणे शहाणे बापा ।।
संदर्भ–: वरील ओळ ‘संत गोरा कुंभार’ यांच्या अभंगातील असून त्यांचे मूल्य भक्ती आहे.
स्पष्टीकरण – जीवन मुक्ती हवी असेल तर अशी भक्ती हवी जी जगाला शिकून शहाणी करेल आणि लोकांना भक्ती शिकवेल असे संत गोरा कुंभार
म्हणतात.
(आ) मिथ्या कल्पना मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।
संदर्भ – वरील ओळी संत मुक्ताबाई यांच्या ‘ताटीचे अभंग’ यामधील असून यांचे मूल्य वैराग्य शीलता आहे.
स्पष्टीकरण– खोट्या कल्पनांचा त्याग करून जे सत्य भाषण करतात.त्यांनाच संत म्हणणे योग्य ठरेल. तुम्ही तसेच आहात म्हणूनच ताटी उघडून जनतेसमोर या व संत स्वरूप दाखवून द्या असे संत मुक्ताबाई वरील ओळीतून ज्ञानेश्वरांना विनवणी करत आहेत.
(इ)
सर्वकाळ प्रीति संतांचीया संगे । गावें अनुरागें हरी-नाम ।।
संदर्भ – वरील ओळ संत नामदेव यांच्या अभंगातील असून या अभंगाचे मूल्य सदाचार आहे.
स्पष्टीकरण– रोजच्या प्रापंचिक जीवनात व व्यवहारात माणसाने उत्तम आचार वागणूक आणि विचाराने वागावे.या गोष्टी संतांच्या सहवासात राहिल्याने सहज अंगी येतात त्यांचे आचरण करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.असे वरील ओळीतून सांगितले आहे.
प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे
लिहा.
(अ) संत मुक्ताबाईनी ताटीचे अभंग कोणत्या प्रसंगी लिहिले आहेत?
उत्तर – जेव्हा ज्ञानेश्वर समाजातील त्यांना झालेला विरोध पाहून निराश होऊन दार लावून बसले होते.त्यांनी मौनव्रत धारण केले होते.बराच वेळ बाहेर न आल्यामुळे त्यांच्या मनातील वैराग्य घालवण्यासाठी मुक्ताबाई त्यांची समजूत काढत होती.त्याप्रसंगी मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले आहेत.
(आ) संत गोरा कुंभारांनी मुक्या माणसाचे उदाहरण का दिले आहे?
उत्तर – परमेश्वराची भक्ती ही अव्यक्त असते.आपली भक्ती इतरांना सांगता येत नाही.ते सांगताना गोरा कुंभारानी मुक्या व्यक्तीला साखर चाखायला दिल्यावर त्यांच्या गोडीचे वर्णन त्याला शब्दातून करता येत नाही. त्याचप्रमाणे परमेश्वराची भक्ती गोडी कशी आहे हे शब्दातून व्यक्त करता येत नाही म्हणून मुक्या माणसांचे उदाहरण दिले आहे.
प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(अ) ‘मुकिया साखर चाखावया दिधली।‘ या संत गोरा कुंभांराच्या अभंगाचा भावार्थ लिहा.
उत्तर – गोरा कुंभार म्हणतात एखाद्या मुक्या माणसाला साखर खावयास देऊन ती कशी लागते असे विचारल्यास त्याला बोलता येत नसल्याने तो त्याचे वर्णन शब्दात करू शकत नाही.पण त्या साखरेचा गोडवा त्याला कळतो.त्या गोडव्याचा भाव त्यांच्या चेहर्यावर दिसून येईल.भक्तीचेही तसेच आहे.परमेश्वराशी एकरूप झालेल्या भक्ताला जो आनंद होतो.तो त्याला शब्दातून व्यक्त करता येत नाही असे या अभंगातून संत गोरा कुंभार यांनी सांगितले आहे.
(आ) संत
नामदेवांच्या मते माणसाने प्रापंचिक जीवनात कसे वागावे?
उत्तर – संत नामदेव मानवाला आपल्या प्रापंचिक जीवनात वागताना दुसऱ्याच्या पत्नीला आई समान मानून मान देण्यास सांगतात.जीवन जगताना पैसा हेच सर्वस्व मानतात.त्यांचा उपयोग दुसऱ्याकरिता करून त्यांची दुःखे नष्ट करावी.आपण या पृथ्वीतलावर अमर नसून परलोकात मृत्युनंतर जायचे असल्याने सदासर्वकाळ हरी नामाचा जप करीत व सर्वाभूती समान बुद्धी ठेवून प्रपंचात रहावे.संत समुदाय दिसले तेथे जाऊन साष्टांग दंडवत घालावा.आपल्या जिवाची चिंता करीत न बसता मानवाने वरीलप्रमाणे वागणेच सर्वांच्याच हिताचे असते.असे म्हटले आहे.
भाषाभ्यास
(अ) समानार्थी शब्द लिहा
अहंता= अहंकार
इहलोक= पृथ्वी लोक
जननी=-माता
दया =करुणा
दरवाजा= दार
द्रव्य =पैसे
दारा= बायको
प्रीती =प्रेम
समुदाय= जमाव
बोली= वाणी,वाचा
(आ)
विरुद्धार्थी शब्द लिहा
मुका × बोलका
दया× क्रुरता
शांती ×अशांती
मिथ्या× खरे
संतोष ×असंतोष
अनुराग × राग
सुखी × दु:खी
शहाणा × मूर्ख
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करा..
Thanks