SAHAVI 2. VEER RANI CHENNAMMA (सहावी 2. वीर राणी चन्नम्मा)


VIDYA%20PRAVESH.www.smartguruji.in%20(2)


 नवीन शब्दार्थ

उमदा – देखणा
रक्षक – रक्षण करणारा
मांड – घट्टबैठक
शरण – हार पत्करणे
तरबेज- प्रवीण
कलेक्टर – उच्च अधिकारी
गुप्तहेर – नकळत बातम्या काढणारा
वर्षाव – वृष्टी
सूड – मनातला राग
चिरस्मरणीय – सतत आठवणीत राहणारे


अभ्यास
अ.खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. राणी चन्नम्माचा जन्म केव्हा व कोठे झाला ?
उत्तर – राणी चन्नम्माचा जन्म इ.स.1778 साली बेळगावी जिल्ह्यातील काकती येथे देसायांच्या घरी झाला.
2.
चन्नम्मा कोणकोणत्या विद्येत निपुण होती?
उत्तर -चन्नम्मा घोड्यावर बसणे,पोहणे,भाला फेकणे, दांडपट्टा फिरवणे या कलेत तरबेज होती.
3.
राजा मल्लसर्जाचे निधन केव्हा झाले?
उत्तर – इ.स. 1816मध्ये राजा मल्लसर्जाचे निधन झाले.
4.
धारवाडचा कलेक्टर कोण होता?
उत्तर -थॅकरे हा धारवाडचा कलेक्टर होता.
5.
राणीने थॅकरेच्या पत्राला उत्तर का पाठविले नाही?
उत्तर -कारण की तुमच्या खजिन्यावर त्याची दृष्टी होती.मोठे सैन्य घेऊन तो कित्तूरजवळ ठाण मांडून बसला होता.हे राणी चन्नम्माला पटले नाही म्हणून त्याकडे च्या पत्राला तिने उत्तर पाठविले नाही.
6.
राणी चन्नम्माचा अंगरक्षक होता?
उत्तर – सय्यद बाळासाहेब हा राणी चन्नम्माचा अंगरक्षक होता.
7.
गुरूसिद्धप्पास कोणती शिक्षा दिली?
उत्तर -गुरूसिद्धप्पास फाशीची शिक्षा दिली.
8.
राणीने आपले शेवटचे दिवस कसे घालविले?
उत्तर -राणीने आपले शेवटचे दिवस एकांतात घालविले.




आ. अर्थ सांगून वाक्यात उपयोग कर.
1. हित जोपासणे – काळजी घेणे
छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम रयतेचे हित जोपासले.
2.
ठाण मांडणे – एका जागी बसून राहणे कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडले.
3.
तोंड देणे – सामना करणे
सतीशने येणाऱ्या संकटांना तोंड दिले.
4.
चेव चढ़णे – जोर चढणे
राणीच्या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव चढला.
5.
माघार घेणे – हार पत्करणे
इंग्रजांनी युद्धात माघार घेतली.
6.
ऊर भरून येणे – भावना दाटून येणे
राणी चन्नम्माचा पुतळा पाहिला की ऊर अभिमानाने भरून येतो.




इ. रिकाम्या जागी योग्य शब्द भर.
1. चन्नम्मा सुंदर आणि गुणसंपन्न होती.
2.
थॅकरेच्या पत्राला राणीने उत्तर पाठविले नाही.
3.
मल्लसर्जाने आपल्या उत्तम गुणांनी कित्तूरच्या प्रजेचे प्रेम मिळविले.
4.
राणीच्या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव व स्फूर्ती आली.
5.
चन्नम्माला बैलहोंगल येथे कैदेत ठेवले.


ई. योग्य जोड्या जुळवा.
         अ                                  
1.
संगोळी रायण्णा             सरदार

 


2.
चन्नम्मा    राणी

3.
थॅकरे                            कलेक्टर

4.
सय्यद बाळासाहेब       अंगरक्षक

5.
मल्लसर्ज                      राजा
 



 

उ. विरुद्धार्थी शब्द लिहा.


1. प्रिय r अप्रिय

2.
सुप्रसिद्ध r  कुप्रसिद्ध

3.
विस्मरण r  स्मरण


4.
स्तुती r  निंदा

ऊ.कोणी, कोणास म्हटले ते सांगा.


1. “कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यास तयार रहा.

उत्तर – वरील वाक्य वीर राणी चन्नम्माया पाठातील असून युद्धाच्या वेळी राणी चन्नम्माने आपल्या सैनिकांना उद्देशून म्हटले आहे.

ए. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1. राजा
मल्लसर्ज प्रजेला कसा प्रिय वाटत असे
?

उत्तर – राजा मल्लसर्जाने आपल्या उत्तम गुणांनी किती वर्षा प्रजेचे प्रेम मिळवले होते त्याने लोकांच्या हितासाठी  तळी कालवे विहिरी रस्ते बांधले होते म्हणून तो प्रजेला प्रिय वाटत असे.
 

2.
थॅकरेचा मुख्य हेतु काय होता ?

उत्तर – थॅकरे इंग्रज सरकारच्यावतीने संस्थांच्या राज्यकारभारावर लक्ष ठेवत असे.कित्तूरचा खजिना आपल्या  ताब्यात घेणे हा त्याचा मुख्य हेतू होता. म्हणून तो मोठे सैनिक घेऊन कित्तूरजवळ ठाण मांडून बसला होता.

3.
सैन्याला लढण्याची स्फूर्ती राणी कशी देत होती ?

उत्तर – लढाईला तोंड फुटले.राणी चन्नम्मा किल्ल्याच्या तटावर उभे राहून हुकूम देत होती व राणीच्या या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव आणि स्फूर्ती येत होती.




4.
राणीचे साहस कोणत्या प्रसंगातून
दिसून येते
?

उत्तर – राजा मल्लसर्जाचे निधन झाले असतानाही न डगमगता थॅकरेबरोबर लढाईची तयारी केली.सभा घेऊन प्रजेला आणि सैनिकांना लढाईस तयार राहण्याच्या सूचना दिल्या.लढाई सुरू असताना किल्ल्याच्या तटावर उभे राहून हुकूम दिले. राणीच्या या करारी बाण्यामुळे सैन्याला चेव चढला.  या सर्व प्रसंगातून राणीचे साहस दिसून येते.

5.
राणी व सैन्यास कोणकोणती शिक्षा झाली?

उत्तर – इंग्रजांनी राणीसह तिचा व इतर लोकांना कैद केले.सेनापती गुरुसिद्धप्पास फाशीची शिक्षा  झाली.राणी व तिच्या परिवारास कैद करून बैलहोंगल येथे वर्षासन देऊन नजरकैदेत ठेवण्यात आले.तेथून सुटण्यास राणीला मदत करणाऱ्या सेनापती रायण्णाला नंदगड येथे फाशी देण्यात आली.
 
Share with your best friend :)