१०. उडती तबकडी आणि अफलातून टोळी
डॉ.
जयंत नारळीकर
परिचय :
पूर्ण नाव – जयंत विष्णू नारळीकर
जन्मस्थळ – 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे
झाला.
हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे
खगोलशास्त्रज्ञ आहेत.ते
विज्ञानकथाकार
कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांची ‘अंतराळातील भस्मासूर ‘खगोलशास्त्राचे
विश्व‘ ‘प्रेषित‘ ‘यक्षाची देणगी‘ ‘आकाशाशी
जडले नाते‘ इत्यादी पुस्तके
प्रकाशित आहेत.
भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र व विश्वविना या तीन विषयावर विपुल
स्फुट लेखन व
ग्रंथलेखन त्यांनी केले आहे. पद्मभूषण
पुरस्काराने ते सन्मानित आहेत.
“टाइम
मशीनची किमया‘ या कथासंग्रहातून. ही कथा संक्षिप्त रूपात
घेतलेली आहे.
धाडसी पिंट्या व त्याच्या
सहकाऱ्यांनी मिळून उडत्या तबकडीसंबंधी
घेततेला शोध हा
रोमांचक अनुभव प्रस्तुत
विज्ञानकथेत दिसून येतो.
(मूल्य: चौकसबुध्दी, वैज्ञानिक दृष्टीकोन)
शब्दार्थ :
■गढी – लहान किल्ला
■भेदरण – भीतीने घाबरणे
■बेशुद्ध – शुद्धबुद्धरहित जड
■गोत्यात – संकटात
■ अपरिचित – अनोळखी
■जबानी – तोंडी हकिकत
■ ऑर्डर – हुकूम
■रिपोर्ट-अहवाल,बातमी
■ छडा लावणे – तपास,शोध घेणे
■पथ्यावर पडणे -फायदेशीर होणे
■ आज्ञा करणे – हुकूम करणे
■पाळत ठेवणे – पहारा ठेवणे
■भंडावून सोडणे – अतिशय त्रास देणे
■डाव रचणे – युक्ती आखणे,बेत
■खो घालणे – सुरळीत चाललेल्या कामात विघ्न आणणे
■ हुडहुडी भरणे – कापरे भरणे.
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो
पर्याय निवडून लिहा.
(अ) ‘उडती तबकडी आणि अफलातून टोळी‘ ही कथा कोणत्या कथासंग्रहातून
घेतलेली आहे.
(अ) टाईम मशीनची किमया
(ब) प्रेषित
(क) यक्षाची देणगी
(ड) अंतराळातील भस्मासूर
उत्तर – (अ)
टाईम मशीनची किमया
(आ) गढीचे मालक
कोणत्या शहरात राहत होते ?
(अ) पुणे
(ब) कोल्हापूर
(क) मुंबई
(ड) गारगोटी
उत्तर – (क)
मुंबई
(इ) पिंट्याच्या
खांद्यावर कोणी थाप मारली ?
(अ) सुंदर
(ब) बाजीराव
(क) मन्यामामा
(ड) लली
उत्तर – (क)
मन्यामामा
प्र. 2 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे
लिहा.
1. गारगोटी पासून किती मैलावर गढी आहे?
उत्तर –
गारगोटी पासून दोन मैलावर एक मोडकळीस आलेली गढी आहे.
2. मन्यामामा
गारगोटीला का आला होता?
उत्तर – मन्यामामा गुप्त पोलिसात उच्च जागेवर असल्यामुळे
उडत्या तबकडीच्या शोधाकरिता सरकारी हुकुमानुसार चौकशी करण्यासाठी आला होता.
3.
पिंट्याने आपल्या सहकार्यांना वेशीजवळ किती वाजता बोलाविले?
उत्तर- पिंट्याने आपल्या सहकाऱ्यांना रात्रीच्या निजानी
नंतर घरून हळूच बाहेर रात्री अकरा वाजता गावच्या वेशीजवळ यायला सांगितले.
4. हवालदाराने भाला कोठे पुरून ठेवला होता?
उत्तर – हवालदार आणि तो भाला त्यांच्या घरच्या मागच्या
वाड्याच्या झाडाखाली पुरून ठेवला होता.
5. बाजीरावाने ॲम्बॅसिर्ड्सवर कशाचे चित्र काढले होते?
उत्तर- बाजीरावने अॅम्बॉसिर्डसवर मागचा बंपर वर पिंट्याच्या
टोळीच्या रॉकेटच्या खुणेचे चित्र स्वतःचे डोके चालवून वापरून काढलेले होते.
प्र. 3 खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा
1. दामू गाडीवानाने उडत्या तबकडी विषयी काय
सांगितले?
उत्तर – दामू
गाडीवानाने सांगितले की,तो अंधार पडत असताना गाडीतून येत होता तर त्याला डोक्यावर
आकाशात प्रकाश दिसला.त्याने पाहिले तर एक गोल गोल चमकदार काहीतरी वर उडत होते आणि
तो गढीकडे गेले. दामू भेदरलाच पण त्याचे बैलदेखील उधळले.त्यांना आवरून शांत करेपर्यंत
ती चकती अदृश्य झाली होती.
2. पिंट्या
आणि मना मामा त्यांच्यात कोणता ठराव झाला होता?
उत्तर – गुप्त पोलिसात अधिकारी असलेला पिंट्याचा मन्या
मामा उडती तबकडी कुठे गेली याचे रहस्य उकलायला आला होता.त्याने मन्यालाही तुझी
टोळी त्याच कामात गुंतली असेल नाही का? असे विचारताच मन्याने “होय,आम्ही पण त्यात
लक्ष घालतोय असे म्हटले.मामा,पिंट्या व त्यांच्या टोळीने परस्परांना मदत करून
माहिती पुरवण्याचा ठराव केला.
3.
रामसिंघानीने सुभानराव व दामूला कोणत्या सूचना दिल्या होत्या?
उत्तर – रामसिंघानीने सुभानरावला व दामूला स्वतःचे डोके
न चालविण्यास व त्यांनी जसे पढविले तसेच पोलिसांना व इतरांना सांगण्यास बजावले.
त्यांनी त्यासाठी ठरल्याप्रमाणे दामूला ठरवलेले हजार रुपये ही देऊ केले व
बाकीच्यांनीही पोलिसांना जे सांगितले तेच सांगण्यास बजावले व भाला पोलिसांना
सापडणार नाही अशा ठिकाणी लपवून ठेवण्यास सुभानरावला सांगितले.
प्र. 4 संदर्भासह स्पष्टीकरण करा.
1. “तेच तर आपल्या पथ्यावर पडणार आहे.”
संदर्भ – वरील
विधान ‘उडती तबकडी आणि अफलातून टोळी’ या डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैद्न्यानिक
कथेतील आहे.
स्पष्टीकरण – बाजीराव हादरुन म्हणाला,“बापरे!आज तर
अमावास्या आहे. तेव्हा पिंट्याने वरील वाक्य उद्देशून म्हटले आहे.कारण त्यामुळे
तबकडी बाबतचे खरे-खोटे कळणार होते.
2. “पिंट्या
आणि सुंदर कोठे आहेत.”
संदर्भ – उपरोक्त वाक्य ‘उडती तबकडी आणि अफलातून टोळी’
या डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैद्न्यानिक कथेतील आहे.
स्पष्टीकरण – लली आणि चंपी मन्यामामाच्या जीपमधून
उतरल्या तेव्हा बाजीराव पळतच तेथे आला.आधी त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर येईना. त्याचवेळी
ललीनं,पिंट्या आणि सुंदर कुठे आहेत? असं घाबरून विचारले.
3. “आम्हाला
आई-बाबाबरोबर विमानातून कश्मीरला जाऊन यायचंच”
संदर्भ – उपरोक्त वाक्य ‘उडती तबकडी आणि अफलातून टोळी’
या डॉ. जयंत नारळीकर यांच्या वैद्न्यानिक कथेतील आहे.
स्पष्टीकरण – मन्यामामाने पिंट्याला आपल्यावरच्या
अधिकाऱ्याबरोबर बोलून विचारले व सांगितले, ‘सरकारने तुमच्या टोळीला बक्षीस
देण्याचा इरादा दाखवला आहे.’सांगा तुम्हाला काय हवे ते.त्याप्रमाणे मुंबईला फोन
करून सांगेल,तेव्हा सुंदर,चंपी आणि बाजीराव यांनी त्यांना काय पाहिजे ते सांगितले.पिंट्या
म्हणाला,तेव्हा तुला आणि ललीला असे विचारताच त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या आईची
मूर्ती उभी राहिली आणि तो म्हणाला,आम्हाला आई-बाबाबरोबर विमानातून काश्मीरला जाऊन
यायचं.
प्र. 5 खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत
उत्तरे लिहा
1.सुभान
रावांने उडत्या तबकडी विषयी काय सांगितले
उत्तर – सुभानरावाला कोणीतरी सांगितले की,गढीत
स्मगलर आहेत.म्हणून तो गढीपासून पाव मैलावर असताना आकाशातून च चकती काहीतरी येताना
दिसले.त्यातून दोन हिरव्या पोशाख केलेली किंवा हिरवी माणसे उतरून गढीत गेली.सुभानराव
दबकतच त्या यांनाकडे गेला.त्याला दारे नव्हती.मग ते जीव बाहेर कसे आले?गुप्त
दार आहे काय म्हणून तो चाचपडून पाहू लागला.त्याला
जबरदस्त धक्का बसला व तो बेशुद्ध पडला.
शुद्धीवर आला तेव्हा मध्यरात्र झाली होती.गढीच्या
पटांगणात पडला होता.आणि
ते यान नाहीसे झाले.
2. रामसिंघानीने गढीच्या संदर्भात कोणता डाव रचला होता?
उत्तर –
उडती तबकडी वगैरे सगळे प्रकार झूट होते.तो
रामसिघानांनी रचलेला डाव होता.तो
त्या गढीचा मालक होता.मुंबईला
राहात होता.जर
आपल्या गढीजवळ उडती तबकडी उतरली होती हे जग जाहीर झाले तर ह्या जागेला खूप
प्रसिद्धी मिळेल.महत्वाची
जागा म्हणून पाहायला लोक येतील .मग
त्यांच्या सरबराईकरता सरकार ह्या भागात छान रस्ते बांधील.वीज
पुरवठा वाढवेल.तसे
दुकानदारांना व हॉटेलवाल्यांना धंदा मिळून जागेच्या किमती वाढतील आणि आपण मालामाल
होऊ.असा रामसिघानीने डाव रचला
होता.थोडेफार
तसेच घडायलाही लागले होते.
3.गढी चे
वर्णन करा.
उत्तर – गारगोटीपासून
दोन मैलावर एक मोडकळीस आलेली गढी होती.
तिथे कोणी रहात नसेल आणि भुताखेताच्या गोष्टीमुळे तिकडे गावकरी जात नसत.गढीचे
मालक मुंबईचे ते इकडे कधीच फिरकत नसत.अशा या गढीचे रहस्य शोधून काढण्याची कल्पना
पिंट्याच्या डोक्यात शिजत होती.
प्र. 6 खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत
उत्तरे लिहा
1. पिंट्या व त्याच्या सहकाऱ्यांनी याना
संबंधित कोण कोणते निष्कर्ष काढले?
उत्तर – पिंट्या
व त्याच्या सहकाऱ्यांनी यांनासंबंधित त्या यानाच्या पायांना सपाट किंवा विमानासारखी
चाके असली पाहिजेत.यान उतरताना त्यांच्या
तळाशी जाळ झाल्याचे सुभानरावाच्या जबानीत होते.परंतु फोटोमध्ये यांनाखालची वनस्पती
जळलेली दिसत नव्हती.दामूने यान पाहिले तेव्हा नुकताच सूर्यास्त झाला होता आणि
सुभानराव सांगतो की,तो गाडीपाशी गेला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते.सूर्य तर
साडेसातला मावळतो.मग दीड तास ते यान काय करत होते.बाकीच्या गावकऱ्याला किंवा
आम्हाला ते यान कसे दिसले नाही.असे अनेक प्रकारचे निष्कर्ष पिंट्याच्या टोळीने
काढली.
भाषा अभ्यास
अ) खालील वाक्य प्रकारांचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा
1. डोके खाजविणे –विचार
करणे
गावामध्ये तबकडी मधून लोक आल्याचे ऐकून पिंट्या डोके
खाजवू लाग ला.
2.छडा
लावणे – तपास
करणे शोध घेणे
खरोखरच तबकडी तुन माणसे आली काय याचा छडा लावण्याचे
पिंट्या च्या टोळीने ठरविले.
abc
3.आज्ञा
करणे – हुकूम
करणे
सरकारने मन्या मामाला तबकडी बाबतच तपास करण्याची आज्ञा
केली
4.पाळत
ठेवणे – पहारा ठेवणे
गढीमध्ये कोण केव्हा येते आणि जाते यावर पाळत ठेवण्यास
पोलिसांना सांगण्यात आले.
5.डाव रचणे – युक्ती
आखणे,बेत
ठरविणे
खेळाडूनी विरुद्ध संघाच्या जास्तीत जास्त खेळाडूना बाद करण्यासाठी डाव रचला.
6.खो
घालणे – सुरळीत चाललेल्या कामात विघ्न आणणे.
शोध घेण्याचे काम चालू असताना लोकांनी मध्येच खो
घालण्याचा प्रयत्न केला.
7. पथ्यावर पडणे – फायदेशीर
होणे
हवालदाराने दिलेल्या माहितीमुळे शोध घेणे पथ्यावर पडले.
विरुद्धार्थी शब्द लिहा
1.
शांत
X अशांत
2.
रात्र
X दिवस
3.
अंधार
X उजेड
4.
अपरिचित
X परिचित ओळखीचा माहिती असलेला
5.
बरोबर
X चूक