इयत्ता – आठवी
विषय – मराठी
पाठ – 13
माझी मुक्ताई
कवयित्री – बहिणाबाई
चौधरी
कवयित्री परिचय –
बहिणाबाई चौधरी ( 1880 – 1951 ) या एक अशिक्षित कवयित्री असून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक अनुभव कवितेतून व्यक्त केले आहेत. त्यांच्या
कवितेत खानदेशी व वऱ्हाडी भाषेचा वापर झाला आहे. ‘बहिणाबाईंची गाणी’ हा
कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.
शब्दार्थ आणि टीपा :
वर्साचं – वर्षाचं
टाकी देयेल – टाकून दिलेल्या
योगी – योग विद्येचा अभ्यास केलेला
हिरीदाचा – हृदयाचा
उभा केला – साकार केला
गह्यरल – गहिवरले
ताटी – दार
हिनई – हिणवीत
ठाव – ठिकाण
उबगले – कंटाळले
कयवयली – कळवळली
भरिसन – भरून
असंगाशी संग – वाईट माणसाशी संबंध
दडले – लपले
टीप :
1) चांगदेव – योग साधना केलेला ज्ञानी पुरुष. त्यांना स्वतःबद्दल गर्व होता. ज्ञानदेवाना
भेटण्यासाठी वाघावर बसून आला होता. पण मुक्ताईच्या ज्ञान प्रभावित होऊन त्याने
तिला गुरु मानले.
2) ताटीचे अभंग – ज्ञानेश्वर रागावून दार बंद करून स्लावतः कोंडून घेऊन बसले. त्यावेळी त्यांची समजूत
काढून दार उघडण्यासाठी मुक्ताईने केलेले अभंग.
स्वाध्याय
प्र1. खालील प्रश्नांची
प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1) मुक्ताई ही कोण होती?
उत्तर – मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण होती.
2) मुक्ताईला गुरू कोणी मानले ?
उत्तर – मुक्ताईला चांगदेव यांनी गुरू मानले.
3) मुक्ताईचे वय किती होते?
उत्तर – मुक्ताई चे वय दहा वर्षे होते.
4) ज्ञानदेव घरात का दडले?
उत्तर – ज्ञानदेव मान-अपमान आला कंटाळून घरात दडले.
प्र 2. खालील प्रश्नांची
प्रत्येकी दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1.ज्ञानेश्वर भाग्यवंत आहेत असे बहिणाबाई का म्हणते ?
उत्तर – ज्ञानेश्वर भाग्यवंत आहेत कारण त्यांना ज्ञानी,योग्य,गर्व नसलेली भाग्यवंत मुक्ताई बहिण मिळाली.
2) मुक्ताईच्या अभंगाचा
ज्ञानदेवावर कोणता परिणाम झाला ?
उत्तर – मुक्ताईच्या अभंगांचा ज्ञानदेवांनी वर झालेला परिणाम ज्ञानदेवांची
सहनशीलता वाढली.मन शुद्ध झाले व परिणाम नाहीसा झाला.
प्र 3. खालील प्रश्नाचे चार-पाच
वाक्यात उत्तर लिहा.
1) मुक्ताईबद्दल बहिणाबाईनी कोणते गौरवोद्गार काढले आहेत?
उत्तर – मुक्ताई बद्दल बहिणाबाईंनी काढलेले गौरवोद्गार ती दहा वर्षाची तरी पण
उपजत ज्ञानामुळे ज्ञानदेवांची गुरू झाले.मुक्ताईने ज्ञानदेवांची समजूत काढण्यासाठी मुक्ताईने केलेल्या अभंगाची स्तुती
केली.
प्र 4. – खालील प्रश्नाचे उत्तर
सात-आठ वाक्यात लिहा.
1) मुक्ताईने ज्ञानदेवांची समजूत कशी काढली?
उत्तर – मुक्ताईने आपल्या भावाची समजूत काढण्यासाठी स्वतः हुन ताटीचे अभंग
ज्ञानेश्वरांसमोर मांडले आणि त्यातील प्रत्येक गोष्ट ज्ञानदेवांना पटले मुक्ताईचे
बोलणे सुद्धा पटले व ज्ञानेश्वरांच्या मनातला राग नाहीसा झाला.याप्रकारे मुक्ताईने
ज्ञानदेवाची समजूत काढली.
प्र 5. रिकाम्या जागी योग्य
शब्द भरा.
1) माझी मुक्ताई मुक्ताई दहा वर्साच
लेकरू.
2) उबगले ग्यानदेव घडे असंगाशी
संग
3) ताटीचे अभंग चा हिरीदाचा
ठाव घेतात.
4) मुक्ताईचा ज्ञानेश्वर
हा भाग्यवंत भाऊ होय.
प्र6. संदर्भासह स्पष्टीकरण
करा.
1) चांगदेव योगीयान तिले मानल रे गुरु
संदर्भ – वरील वाक्य ‘माझी मुक्ताई’ या कवितेतील असून ही कविता बहिणाबाई चौधरी
यांनी लिहिली आहे.
स्पष्टीकरण – कारण मुक्ताई दहा वर्षांची असली तरी तिच्या ज्ञानामुळे ती
चांगदेवांची गुरु झाली आहे.
2) त्याची मुक्ताई बहीण.
संदर्भ – वरील वाक्य ‘माझी मुक्ताई’ या कवितेतील असून ही कविता बहिणाबाई चौधरी
यांनी लिहिली आहे.
स्पष्टीकरण – मुक्ताई ही ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आहे ती ज्ञानी स्त्री आहे
म्हणून ज्ञानदेवाला भाग्यवंत भाऊ म्हटले आहे.
भाषाभ्यास :
पुढील शब्दांचा
वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
1) असंगाशी संग – अयोग्य माणसांशी संग
असंगाशी संग केल्याने आपले नुकसान होऊन शकते.
2) कळवळणे – तळमळणे
तो पडल्यावर वेदनेने कळवळत होता.
3) तोंड न पाहणे – नाराजी
व्यक्त करणे
सुयोगने प्रशांत चे तोंड न पाहण्याचे ठरवले.