11. पाहुणचार
कवी – ग.ल.ठोकळ
कवी परिचय –
पूर्ण नाव – गजानन लक्षमण ठोकळ (1909-1984) सुरुवातीला काही वर्षे शिक्षक म्हणून काम पाहिले.नंतर श्री लेखन वाचन भांडार सुरू केले.त्यांचे लेखन वैविध्यपूर्ण आहे.त्यांचे लेखन कार्य पुढीलप्रमाणे –
कथासंग्रह – कडूसाखर, गोंदण, ठोकळ गोष्टी
नाटक – कशासाठी पोटासाठी
कादंबरी – गावगुंड, टेंभा, ठिणगी
काव्यसंग्रह – मीठभाकर, सुगी खेड्यातील लोकांचे जीवन साधेसुधे असते.गरीब शेतकऱ्याकडे आलेल्यांचा पाहुणचार तो किती प्रेमाने याचे वर्णन या कवितेत आढळते.ही कविता ‘सुगी‘ या काव्यसंग्रहातून निवडली आहे.
कविता
या बसा पाव्हणं असं राम राम घ्या
कोनच्या तुम्ही गावांच? गाठुडं तिठ राहु द्या |
घोंगडी टाकली इठं, बसा तीवर
अनमान करू नको आता हे समजा अपलं घर
वाटुळ चालता जनू लई भागला
हे पगा काढलंय पाणी आंघूळ कराया चला
आटपा बिगीनं जरा, ताट वाळलं
पाव्हनं, चला या आता, हे पगा पिढं टाकल
वाढली पगा ज्वारिची जाड भाकरी
निचितीनं जेवा आता, जायचं ना शेतावरी
लई सुगरण मपली बरं कारभारिण
किती अपरूक झालं हाय हे कांद्याचं बेसन!
लसणीची चटणी उजून पगा वाढली
ती मधून तोंडी लावा, लागती तिखट चांगली!
चापून आता होउ द्या, करू नका कमी
मीठ भाकरी गरीबाची घ्या गोड करोनी तुम्ही
‘जायचं‘ काय म्हणता? झोप घ्या जरा
जाताल उद्यां का घाई? छे बेत नव्हं हा बरा !
शेवटी निघालांत ना? जपूनीच जा.
गरिबाची ओळख ठेवा. या बरं राम राम घ्या!
शब्दार्थ आणि टीपा :
पाव्हणं – पाहणे
गाठुडं – गाठोडे
अनमान – हयगय
भागला – दमला
आंघुळ- आंघोळ (स्नान)
कोनच्या – कोणत्या
इठ – इथे
वाढुल – पुष्कळ
पगा – पहा
बिगीन – लवकर
पिढं – पाट
सुगरण – उत्तम स्वयंपाक करणारी
कारभारीण- पत्नी
बेसन – झुणका
मीठ भाकरी – गरीबाचं साधं जेवण
रामराम घ्या – नमस्कार
उजुन – अजून
निचितीन – शांत चित्ताने
मपली – माझी
अपरूक – चवदार
चापून – भरपूर खावून
बेत – विचार
जाताल – जाल
प्र1. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1. कारभाऱ्याने पाहुण्याला बसायला काय दिले?
उत्तर -कारभाऱ्यांनी पाहुण्याला बसायला घोंगडी दिली.
2. कारभाऱ्याने पाहुण्याला अंघोळ लवकर उरकण्यास का सांगितले?
उत्तर -कारण कारभाराने पाहुण्यांसाठी ताट केले होते म्हणून लवकर आंघोळ ओळखण्यास सांगितले.
3. जेवणात कोणकोणते पदार्थ होते?
उत्तर -जेवणात ज्वारीची भाकरी, कांद्याचे बेसन,लसणीची चटणी हे पदार्थ होते.
4.कारभाऱ्याने सुगरण कोणाला म्हटले आहे.
उत्तर -कारभाऱ्याने सुगरण आपल्या पत्नीला म्हटले आहे.
5.कोणता पदार्थ अपरूक झाला होता?
उत्तर – कांद्याचं बेसन हा पदार्थ अपरुक झाला होता.
6.कोणता पदार्थ तिखट झाला होता?
उत्तर – लसणीची चटणी हा पदार्थ तिखट झाला होता.
प्रश्न 2रा -खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा.
1.घरी आलेल्या पाहुण्याचा प्रवासात झालेला त्रास कमी व्हावा म्हणून घरच्या कारभाऱ्यांने काय केले?
उत्तर – घरी आलेल्या पाहुण्याचा प्रवासात झालेला त्रास कमी व्हावा म्हणून घरच्या कारभाराने पाहुण्याला गरम पाण्याची अंघोळ करायला दिले.
2. पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था कशा तऱ्हेने केली?
उत्तर – पाहुण्याला बसायला पाट दिला जेवणात ज्वारीची जाड भाकरी,कांद्याचं बेसन,लसणाची चटणी हे पदार्थ केले होते अशा प्रकारे पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था केली.
3.आपल्या कारभारणीचा मोठेपणा कारभारी कसा व्यक्त करतो?
उत्तर – कारभारी कारभारणीला सुगरण म्हणून तसेच तो अपरूक स्वयंपाक करतेस असे म्हणून कारभारणीचा मोठेपणा व्यक्त करतो.
खालील प्रश्नांची उत्तरे चार ते पाच वाक्यात लिहा.
1.घरी आलेल्या पाहुण्याचा आदर सत्कार कारभारी कशा तऱ्हेने करतो?
उत्तर – कारभारी पाहुण्याला बसायला घोंगडी टाकतो.त्याचा थकवा,प्रवास झालेला त्रास कमी होऊ दे म्हणून तो त्याला अंघोळ करण्यास सांगतो.त्यानंतर जेवणात भाकरी,कांद्याची बेसन,लसणीची चटणी असे पदार्थ वाढतो.जेवण झाल्यावर विश्रांती घेण्यास सांगतो.अशा तऱ्हेने कारभारी पाहुण्यांचा आदर सत्कार करतो.
2.पाहुण्याला आणखी राहण्याचा आग्रह शेतकऱ्याने कसा केला आहे?
उत्तर – कारभारी पाहुण्याला म्हणतो जाणार आहात तर उद्या जा.एवढी घाई कशाला करता? आणि जायचा विचार करू नका.आणखीन थोडे दिवस राहा मग जा.असे म्हणून शेतकऱ्याने पाहुण्याला आणखी राहण्याचा आग्रह केला.
प्रश्न 4 खालील ओळींचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
1.हे पघा काढले पाणी अंघोळ कराया चला.
संदर्भ- वरील ओळी ‘पाहुणचार’ या कवितेतील असून ही कविता गजानन लक्ष्मण ठोकर यांनी लिहिली आहे.
स्पष्टीकरण -जेव्हा पाहुणा दमून येतो तेव्हा कारभारी म्हणतो अंघोळीसाठी पाणी काढले आंघोळ करा चला असे सांगतो.
2.लसणीची चटणी अजून पहा वाढली.
संदर्भ – वरील ओळी ‘पाहुणचार’ या कवितेतील असून ही कविता गजानन लक्ष्मण ठोकर यांनी लिहिली आहे.
स्पष्टीकरण – जेव्हा पाहुणा जेवत असतो त्यावेळी कारभारी म्हणतो लसणीची चटणी अजून थोडीशी वाढली असे सांगतो.
प्र. 5 खालील प्रश्नाचे उत्तर सात-आठ वाक्यात लिहा. या कवितेचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा.
या कवितेतील एका शेतकऱ्याच्या घरी एक पाहुणा येतोकारभारी त्याला बसायला घोंगडी देतो. पाहुणा दमून आल्याने त्याला अंघोळ करण्यास सांगतो.नंतर त्याला जेवणाचे ताट देतो.जेवताना जेवणात ज्वारीची भाकरी,कांद्याचं बेसन,लसणीची चटणी असे चवदार पदार्थ असतात,नंतर त्याला विश्रांती घेण्यास सांगतो व पाहुणा जात असताना जाणार आहात तर उद्या जा.एवढी घाई कशाला करता? आणि जायचा विचार करू नका.आणखीन थोडे दिवस राहा.मग जा असे म्हणून राहण्याचा आग्रह करतो व जाताना सांगतो या गरिबाची ओळख ठेवा म्हणजे कोणताही पाहुणा असू दे त्याचा आदर सत्काराने पाहुणचार करावा असा बोध या कवितेतून होतो.
प्र6. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. वाटुळ चालला जणू लई भागला.
2. पाव्हणं चला या आता हे पगा पिढं टाकलं.
3. लई सुगरण मपली बरं कारभारीण
4. लसणीची चटणी उजुन पगा वाढली.
5. मीठ भाकर गरीबाची घ्या गोड करूनी
6. गरीबाची ओळख ठेवा या बरं रामराम घ्या
7. निचितीन जेवा आता शेतावरी
भाषा अभ्यास
1.पाठात दिल्याप्रमाणे जोडशब्द पूर्ण करा.
Ø मीठ – भाकरी
Ø ज्वारीची – भाकरी
Ø कांद्याचं – बेसन
Ø लसणीची – चटण
2.खालील वाक्यप्रचारांचा
अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
१.पाहुणचार करणे – आदरातिथ्य करणे
घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार करणे हि आपली भारतीय संस्कृती आहे.
२.अनमान करणे – हयगय करणे
पाहुण्यांना अनुमान करायला द्यायचे नाही
3.समानार्थी शब्द लिहा.
1.पाहुणचार – आदरातिथ्य
2.गाव – खेडे , ग्राम
3.पाहुणा – अतिथी
4.तोंड – वदन,मुख
5.अंघोळ – स्नान
6.झोप – निद्रा
7.अपरुक – चवदार
4. विरुद्धार्थी शब्द लिहा.
1.ओळख × अनोळखी
2.गरीब × श्रीमंत
3.गोड × कडू
4.आता × नंतर
5.कमी × जास्त
6.शेवट × पहिला
प्रश्न 5 खालील शब्द प्रमाण मराठीत लिहा.
1.बेसन – झुणका
2.लई – जास्त
3.पगा – पहा
4.उजून – अजून
5.आंघुळ – अंघोळ