इयत्ता – आठवी
विषय – मराठी
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
15. भाषा बांधव्य
डॉ. संध्या देशपांडे
परिचय :
प्रा.डॉ.संध्या देशपांडे ह्या बेळगाव मधील आर.पी.डी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.दिग्दर्शन, अभिनय, लेखन यामध्ये त्यानी भरपूर काम केलेले आहे. कादंबरी, नाटक, काव्य आणि अनुवाद इत्यादी साहित्य प्रकार त्यानी हाताळाले आहेत.
आजन्मा, आक्रित, अकल्पित, वॉज आय सँग या एकांकिका, अश्वदा ही कादंबरी ‘अंतस्थ‘ हे नाटक, ‘आजन्मा मदन‘ हे दीर्घकाव्य तसेच स्वरगंगा, हे चारित्र ही त्यांची साहित्यसंपदा आहे. वस्त्रद यांच्या मानवतावादी बसवण्णा व बसवेश्वरांच्या वचनांचा त्यांनी अनुवाद केला असून चंद्रशेखर कम्मार यांच्या ‘सिरीसंपिगे‘ या नाटकाचा त्यानी ‘चाफा‘ हा अनुवाद केला आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
मूल्य – भाषाबंधुता
शब्दार्थ व टीपा
अनुबंध -संबंध
पूर्वापार -पूर्वीपासून
ख्याती असणे-प्रसिद्धी असणे
स्वाक्षरी -सही
सर्वश्रूत – सर्वानी ऐकलेले
टीपा
1) शं.बा. जोशी- लेखक, समीक्षक, कानडी व मराठी दोन्ही भाषांचे जाणकार bere
2) रं. शा. लोकापूर- कानडी लेखक, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, ज्ञानेश्वरीच्या कानडी अनुवादाचे कर्ते.
3) गळगनाथ- मूळ नाव वेंकटेश तिरको कुलकर्णी. ह.ना. आपट्यांच्या अनेक कादंबऱ्यांचा अनुवाद त्यांनी कानडी मधून केला. ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिक्षक. टिळकांच्या केसरी चे चहाते, सद्बोधचंद्रिके.नावाचे मासिक ते चालवत.
4) चि. त्र्यं. खानोलकर- मराठीतील गाजलेले कवी, नाटकाकार, कादंबरीकार, आरती प्रभूया नावाने काव्यलेखन.
5) दत्तोवामन पोतदार- सुप्रसिद्ध इतिहास संशोधक उत्तम वक्ते. महामहोपाध्याय ही त्यांना महाराष्ट्राने दिलेली मानाची उपाधी होती.
प्र 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. शं. बा. जोशी मराठी व कानडी या भाषाना काय म्हणतात ?
उत्तर – शं. बा. जोशी मराठी व कानडी या भाषाना जुळी भावंडे म्हणतात.
2. महाराष्ट्रावर कानडीचा प्रभाव पडण्याचे मुख्य कारण
कोणते ?
उत्तर – महाराष्ट्रावर कानडीचा प्रभाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ कन्नड राजघराण्यांचा महाराष्ट्रावर असलेला अंमल होय.
3. गुढी पाडवा हा दिवस कर्नाटकात कोणत्या नावाने साजरा होतो?
उत्तर – गुढी पाडवा हा दिवस कर्नाटकात युगादी पाड्डे या नावाने साजरा होतो.
4. संक्रांतीला कर्नाटकात काय म्हणतात ?
उत्तर – संक्रांतीला कर्नाटकात संक्रमण हब्ब म्हणातात.
5. द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा कोणती होती?
उत्तर – द.रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी होती.
6. कन्नड व मराठीचे कोणते संत समकालीन होते?
उत्तर – कन्नडमधील पुरंदरदास व मराठीतील संत एकनाथ हे संत समकालीन होते.
7. पु. ल. देशपांडे यांच्या कोणत्या नाटकाचा बेंगलोर येथे प्रयोग झाला?
उत्तर – पु. ल. देशापांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा बेंगलोर येथे प्रयोग झाला.
8. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार विध्यार्थ्याना कोणता संदेश देत?
उत्तर – महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार विध्यार्थ्याना बहुभाषिक व्हा असा संदेश देत.
प्र2. खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
1. आधी पोटोबा मग विठोबा
2. दात आहेत तर चणे नाहीत अन् चणे आहेत तर दात नाहीत.
3. महाराष्ट्रात गुढी उभारण्याची जी पद्धत आहे ती कर्नाटकात नाही.
4. गळगनाथ म्हणजे वेंकटेश तिरको कुलकर्णी.
5. डॉ.शिवराम कारंथ त्यांनी अगदी तरुण वयातच एकच प्याला या गडकर्यांच्या नाटकांचा अनुवाद केला.
6. विनोबा भावे 16 भाषा उत्तम येत असत.
प्र 3. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. या पाठातील दोन्ही भाषेतील समानार्थी म्हणी सांगा.
उत्तर – दोन्ही भाषेत अनेक समानार्थी म्हणी आहेत.
उदा. आधी पोटोबा मग विठोबा (मोदलिगे होट्टेयप्पा आमेले विट्टप्पा)
नाचता येईना अंगण वाकडे (कुनियलिक्के बरलिल्ल अंगळ डोंकु)
दात आहेत तर चणे नाहीत अन् चणे आहेत तर दात नाहीत.(इल्लू इद्दाग कडली इल्ल,कडली इद्दाग इल्लु इल्ल)
2.गुढी पाडवा दोन्ही प्रांतात कसा साजरा केल जातो ?
महाराष्ट्रात गुढीपाडवा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो कर्नाटकातही हाच सण ‘युगादी पाड्डे‘ या नावाने साजरा केला जातो.दोन्ही प्रदेशात कडुनिंबाचे सेवन, पंचांग श्रवण,नवीन वस्त्रे धारण करणे,पक्वान्नाचे भोजन याप्रकारे सण साजरे करण्यात येतात.
3. कुमारव्यासांच्या व्यासभारताचे वर्णन या पाठात कसे आले आहे ?
उत्तर – एकनाथांचा नातू मुक्तेश्वर यांनी श्रेष्ठ कन्नड कवी कुमारव्यासांच्या व्यास भारताचा मराठी अनुवाद केला आहे.लोकभाषेत साहित्य निर्मिती हे दोन्ही भाषेतील संतांचे वैशिष्ट्य महात्मा बसवेश्वर म्हणजे तर महाराष्ट्र कर्नाटक यांच्या अतूट अनुबंधाचा एक सेतूच होय.
प्र4. खालील प्रश्नांची पाचते सहा वाक्यात उत्तरे द्या.
1. सर्वात मोठे बक्षीस मिळाल्याचा आनंद पु. ल. देशपांडे यांना केव्हा झाला?
उत्तर – पु ल देशपांडे यांच्या ‘तुझे आहे तुजपाशी‘ या नाटकाचा बेंगलोरला प्रयोग होता आणि त्याचे अध्यक्ष होते मास्ती व्यंकटेश अय्यंगार.मध्यंतरात पु.लं.चा सत्कार करताना त्यांनी पु.लं.ना मिठी मारली आणि त्यांच्या गालाचा मुका घेतला. पु.लं.ना हे सर्वात मोठी बक्षीस वाटले होते.
2. हरितालीका व गणेशोत्सव दोन्ही प्रांतात कसे साजरे केले जातात ?
उत्तर – महाराष्ट्रातील हरितालिका कर्नाटकात सुवर्ण गौरी म्हणून साजरी होते.महाराष्ट्र कोकण भागात या दिवशी स्त्रिया व्रत ठेवून उपवास करतात.मात्र कर्नाटकात सूप वाण म्हणून देतात.सुग्रास भोजन करतात दोन्ही प्रदेशांत गणेशोत्सव साजरा होतो तसा देशात अन्यत्र कोठेही होत नाही. तुमकुर,तिपटूर,अरसिकेरे येथेही गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती करून त्याची स्थापना केली जाते.
प्र5. जोड्या जुळवा.
1. एकनाथांचा नातू – मुक्तेश्वर
2. मराठी व कानडी – जुळी भावंडे
3. अक्का – थोरली बहीण
4. अण्णा -मोठा भाऊ
5. पुरंदरदास -कन्नडचे भक्तश्रेष्ठ
प्र 6 खालील प्रश्नांची उत्तरे सात ते आठ वाक्यात लिहा.
1. कन्नड मराठी संतांमधील समानता या पाठातून कशी व्यक्त झाली आहे?
उत्तर – कन्नड व मराठी संतांमध्ये ही समानता असलेली दिसते.कन्नडचे भक्तश्रेष्ठ पुरंदरदास व मराठीचे संत एकनाथ हे समकालीन होते.समवयस्क होते.एकनाथांचा नातू मुक्तेश्वर यांनी श्रेष्ठ कन्नड कवी कुमारव्यासांच्या व्यासभारताचा मराठी अनुवाद केला आहे.लोक भाषेत साहित्य निर्मिती ही दोन्ही भाषेतील संतांची वैशिष्ट्ये.महात्मा बसवेश्वर म्हणजे तर महाराष्ट्र कर्नाटक यांच्या अतूट अनुबंधाचा एक सेतूच होय.पंढरपूरची वारी म्हणजे परस्पर विचार विनिमयाचे,सहकार भावनेचे उत्तम उदाहरण आहे.‘दासरेंदरे पुरंदरदास‘ म्हणून दास साहित्यात पुरंदर दास यांना ओळखले जाते. तर तुका झालासे कळस अशी तुकाराम महाराजांची ख्याती आहे.विठ्ठल हे दोन्ही लोकांचे आराध्य दैवत होते. गुरुचरित्र लिहिणाऱ्याची भाषा कानडी होती. ‘दत्तोपासना‘ ही या दोन प्रांतांना जोडणारा दुवा आहे.
2.या पाठातील अनुवाद साहित्याची माहिती द्या.
उत्तर – मराठीतील दलित साहित्य व कन्नड मधील बंडाय साहित्याचा अनुबंध ही सर्वश्रुत आहे.गळगनाथ म्हणजे व्यंकटेश तिरको कुलकर्णी यांनी कमलकुमारी या नावाने ‘गड आला पण सिंह गेला‘ या ह.ना.आपटे यांच्या कादंबरीचा अनुवाद केला.त्यांच्या वज्राघात, उष:काल,सूर्योदय, अफझलखान वध या कादंबऱ्या कर्नाटकातील लोकप्रिय होत्या.
3. दोन्ही प्रदेशातील सण उत्सवाचे चित्रण या पाठातून कसे आले आहे ते सांगा
उत्तर- सण आणि उत्सव यातून ही मराठी कानडी भाषिकांचा एक तरल अनुबंध दिसून येतो महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात साजरा केला जातो.कर्नाटकातही हा सण ‘युगादी पाड्डे‘ या नावाने साजरा केला जातो.दोन्ही प्रदेशात कडुनिंबाचे सेवन, पंचांगश्रवण,नवीन वस्त्रे धारण करणे,पक्वान्नांचे भोजन याप्रकारे सण साजरे करण्यात येतात.
प्र7. संदर्भासहीत स्पष्टीकरण करा.
1. कन्नड व मराठी संतांमध्येही समानता असलेली दिसते.
संदर्भ – वरील ओळ डॉ.संध्या देशपांडे लिखित ‘भाषा बांधव्य‘ या पाठातील आहे.
स्पष्टीकरण स्नेहभाव वृद्धिंगत करणारे हे सण आणि उत्सव दोन्ही प्रांतात सारख्याच आनंदाने व उत्साहाने साजरे होतात हे सांगताना लेखिकेने वरील ओळ म्हटली आहे.
2. ज्ञानदेवांच्या मराठीवर जसा कानडीचा प्रभाव आहे तसाच कुमारव्यासांच्या भारतावर मराठीचा प्रभाव
संदर्भ – वरील ओळ डॉ.संध्या देशपांडे लिखित ‘भाषा बांधव्य‘ या पाठातील आहे.
स्पष्टीकरण – गुरुचरित्र लिहिणाऱ्यांची भाषा कानडी होती.दत्तोपासना ही या दोन प्रांतांना जोडणारा दुवा आहे.तेव्हा हे वरील वाक्य लिहिले आहे.
⚜️14. कर्नाटकातील काही शिल्पसुंदर स्थळे
13.माझी मुक्ताई
11.पाहुणचार
इतर पाठ व कविता
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬