इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
12.अरण्ये : आपली जीवनरेषा
आपण काय शिकलात?
• जंगलापासून आपणाला अनेक उत्पादने मिळतात.
• जंगले हा विविध वनस्पती, प्राणी आणि जीवजंतू यांचा समावेश असणारा एक घटक आहे.
• जंगलातील उंच झाडांचा सर्वात वरील स्तर याला शिखर म्हणतात, त्याखाली झाडे-झुडपे असलेला मधील स्तर आणि लहान रोपे व गवत असलेला सर्वात खालील स्तर असतो.
• हे विविध स्तर प्राणी, पक्षी आणि कीटक यांना अन्न व निवारा देतात.
• जंगलातील विविध घटक परस्परावर अवलंबून असतात.
• जंगले वाढतात व त्यांच्यात बदल होत असतात आणि पुनर्जीवित होत असतात.
• जंगलामध्ये माती, हवा, पाणी आणि सर्व सजीव यांच्यात परस्पर क्रिया होत असतात.
जंगले मातीची धूप थांबवितात.
• माती जंगलांची वाढ करण्यास आणि पुनरुत्पादन करण्यास सहाय्य करते.
• जंगल क्षेत्रात राहण्याऱ्या समुदयाला जंगल जीवनावश्यक साहित्य पुरविते तसेच जीवनाला आधार देते.
• जंगलामुळे हवामान, जलचक्र आणि हवेची गुणवता यावर परिणाम होतो.
स्वाध्याय प्रश्नोत्तरे
1. जंगलात राहणारे प्राणी, जंगलवृद्धी व पुनर्वाढीसाठी कसे सहाय्यक ठरतात याचे विवरण करा.
उत्तरः जंगलातील प्राणी वनस्पतींच्या बिया विविध ठिकाणी विखरून त्याच्या वाढीस मदत करतात. कीटक, फुलपाखरे आणि मधमाशा परागीभवन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. प्राण्यांच्या विष्ठेमुळे माती सुपीक होते आणि झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे हे प्राणी जंगलाच्या पुनरुत्पादनास आणि वृद्धीला हातभार लावतात.
2. जंगले महापूर कशा प्रकारे रोखतात ?
उत्तरः जंगले पावसाचे पाणी थेट जमिनीवर पडण्यापासून रोखतात. झाडांच्या पानांवर पडलेले पाणी हळूहळू खाली झिरपत जाते, त्यामुळे माती वाहून जाण्याचा धोका कमी होतो. झाडांची मुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत करतात आणि भूजल पातळी वाढवतात. त्यामुळे पूर नियंत्रणात राहतो.
3. विघटक पदार्थ म्हणजे काय? दोन नावे सांगा. जंगलात याचे कार्य कोणते ?
उत्तरः मृत वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष कुजवणाऱ्या सूक्ष्मजीवांना विघटक म्हणतात. उदाहरणे – बुरशी, जिवाणू. हे विघटक जैविक पदार्थांचे विघटन करून त्यातील पोषक घटक मातीमध्ये मिसळतात, त्यामुळे माती सुपीक होते आणि नवीन झाडे वाढतात.
4. वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड यांचा समतोल राखण्यास जंगले कशी सहाय्यक ठरतात हे स्पष्ट करा.
उत्तरः वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून ऑक्सिजन सोडतात. हा ऑक्सिजन प्राण्यांच्या श्वसनासाठी उपयोगी ठरतो. प्राणी श्वसनाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात, जो वनस्पतींना आवश्यक असतो. अशा प्रकारे जंगल हवेतील वायूंच्या संतुलनास मदत करते.
5. जंगलामध्ये काहीही वाया जात नाही. स्पष्ट करा.
उत्तरः जंगलातील मृत झाडे, गळलेली पाने आणि मृत प्राणी यांचे विघटन नैसर्गिक प्रक्रियेद्वारे होते. हे घटक गिधाडे, कावळे, कीटक आणि सूक्ष्मजीवांद्वारे विघटित होऊन मातीला पोषक घटक मिळतात. यामुळे पोषणचक्र अखंड सुरू राहते आणि जंगलातील कोणतीही गोष्ट वाया जात नाही.
6. जंगलातून मिळणारी पाच महत्त्वाची उत्पादने सांगा.
उत्तरः जंगलांमधून मिळणारी उत्पादने –
- मध
- मेण
- डिंक
- औषधी वनस्पती
- लाकूड
7. मोकळ्या जागा भरा.
(a) कीटक, फुलपाखरे, मधमाशा आणि पक्षी सपुष्प वनस्पतींच्या परागीभवनामध्ये मदत करतात.
(b) जंगले हवा आणि पाणी यांचे शुद्धीकरण करतात.
(c) जंगलात गवती वनस्पती खालीलस्तर तयार करतात.
(d) कुजणारी पाने आणि प्राण्यांची विष्ठा जंगलात मातीला समृद्ध करतात.
8. आम्ही आपल्यापासून दूर असलेल्या जंगलाची स्थिती आणि जंगलासंबंधी काळजी करण्याची आवश्यकता का आहे?
उत्तरः जंगले अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहेत –
- ती हवामानातील समतोल राखतात.
- अनेक प्राण्यांना अधिवास मिळतो.
- पूर आणि मृदाधूप रोखतात.
- भूजलपातळी वाढवण्यास मदत करतात.
- महत्त्वपूर्ण नैसर्गिक संसाधने जसे की मध, डिंक, औषधी वनस्पती आणि लाकूड मिळतात.
त्यामुळे आपल्यापासून दूर असलेल्या जंगलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.
9. चित्र 17.15 मध्ये चित्रकार भागांना नावे देण्यास आणि नावदर्शक बाण करण्यास विसरला आहे. खालील नावे योग्य त्या ठिकाणी बाण दर्शवून लिहा.
ढग, पाऊस, वातावरण, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, वनस्पती, प्राणी, माती, मूळे, भूजल पातळी

10. जंगलात विविध प्राणी आणि वनस्पती असण्याची गरज काय ?
उत्तरः जंगलातील सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. झाडे आणि गवत प्राण्यांना अन्न आणि आश्रय देतात. परागीभवन आणि बिया प्रसार करण्यासाठी प्राणी वनस्पतींना मदत करतात. झाडे प्राण्यांसाठी ऑक्सिजन तयार करतात, तर प्राणी कार्बन डायऑक्साईड देतात, जो वनस्पतींसाठी आवश्यक असतो. प्राण्यांच्या विष्ठेमुळे आणि मृत शरीराच्या विघटनामुळे माती पोषणयुक्त राहते. त्यामुळे जंगलात विविध प्राणी आणि वनस्पती असणे आवश्यक आहे.
11. खालीलपैकी कोणते जंगलाचे उत्पादन नाही.
(i) डिंक
(ii) प्लायवूड
(iii) लाख
(iv) रॉकेल
उत्तरः (iv) रॉकेल
12. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते ?
(i) जंगले मातीची धूप थांबवतात.
(ii) जंगलातील वनस्पती आणि प्राणी परस्परावलंबी नाहीत.
(iii) जंगलांचा हवामान व जलचक्रावर प्रभाव पडतो.
(iv) माती जंगलाच्या वाढीस व पुनरुज्जीवनास मदत करते.
उत्तरः (ii) जंगलातील वनस्पती आणि प्राणी परस्परावलंबी नाहीत.
13. सूक्ष्म जीवाणूद्वारा मृत वनस्पतीवर क्रिया झाल्याने हे तयार होते-
(a) माती
(b) अळंबी
(c) बुरशी
(d) लाकूड
उत्तरः (c) बुरशी