फेब्रुवारी महिन्याच्या उपक्रमांची माहिती
थीम: गणित
- गणिती कोडी उपक्रम: मुलांकडून गणिताशी संबंधित कोडी सोडवून घेणे.
उदाहरण: चढत्या आणि उतरत्या क्रमाने मुलांना 4, 3, 2, 1 असे गट करून उभे करणे. एखाद्या गटाची जागा बदलल्यास उतरता क्रम चढत्या क्रमात बदलतो. - वस्तुमाध्यमांद्वारे अपूर्णांकांची ओळख: जुने वृत्तपत्रे, कार्ड बोर्ड आणि विविध स्थानिक वस्तू वापरून अपूर्णांक समजावून सांगणे.
- वेळेच्या संकल्पनांची ओळख: चित्र किंवा वस्तुमाध्यमांद्वारे 1 तास = 60 मिनिटे, 1 मिनिट = 60 सेकंद, घड्याळावरील 1 अंक 5 मिनिटांचे सूचक इत्यादी समजावून सांगणे.
- संख्या ओळखा आणि उत्तर शोधा: कार्ड बोर्डवर लिहिलेल्या आकड्यांवरून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सोडवणे.
उदाहरण: एक मूल 50 संख्या दाखवते, दुसरे 20, तर तिसरे बेरीजची जागा घेते आणि उत्तर काढते. - गणिती कोडी: गणिताशी संबंधित कोडी मुलांना सोडवण्यासाठी देणे.
गणिती कोडी पाहण्यासाठी येथे स्पर्श करा.
थीम: कला व हस्तकला
(जुलै महिन्यातील उपक्रम थीम: कला व हस्तकला)
- 3 ते 5 मिनिटांत करता येणाऱ्या कला व हस्तकला उपक्रमांची निवड:
- कागद हस्तकला: कागदाच्या होड्या, कॅमेरा, रॉकेट, सजावटी तोरण इत्यादी बनवणे.
- वृत्तपत्र हस्तकला: जुने वृत्तपत्र वापरून टोपी, फोटो फ्रेम तयार करणे.
- पानांचा वापर: विविध प्रकारच्या पानांचा वापर करून प्राणी,पक्षी किंवा सजावटी चित्रे तयार करणे.
- रंगांची ओळख:
- रंगांचे मिश्रण करून नवीन रंग तयार करणे.
उदाहरण: लाल + हिरवा = पिवळा,- हिरवा + निळा = हिरवट निळा
- निळा + लाल = जांभळा
- रंगांचे मिश्रण करून नवीन रंग तयार करणे.
थीम: महासागरांची ओळख
- महासागरांची साधी ओळख:
- महासागर कुठे आहेत?
- ते जमिनीच्या किती क्षेत्रफळ व्यापतात?
- त्यांना नावे कोणत्या पद्धतीने देण्यात आली?
अधिक माहितीसाठी येथे स्पर्श करा – महासागर व त्यांची माहिती
थीम: भाषिक कौशल्य
- कथा तयार करा: एका वाक्याने सुरुवात करून त्यावर इतरांनी वाक्ये जोडत कथा तयार करणे.
- कोडी सोडवा: ओळखीच्या आणि पुस्तकातील मराठी व इंग्रजी कोडी संकलित करून विद्यार्थ्यांपुढे मांडणे.
- आशुभाषण: शिक्षकांनी दिलेल्या विषयांवर भाषणाची तयारी करून मांडणे.
उदाहरण: पर्यावरण दिन, यश, मैत्री, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, झाडे वाचवा.
भाषणाच्या विषयांसाठी येथे स्पर्श करा – - सुभाषित:
- सुभाषिते गोळा करणे आणि वाचन करणे.
- सूचना फलकावर दररोज नवीन सुभाषित लिहिणे.
राष्ट्रीय विज्ञान दिवस:
- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व समजावून सांगणे.
- विज्ञान प्रदर्शन आयोजित करणे.
CLICK HERE TO DOWNLOAD TIME TABLE PDF
CLICK HERE TO DOWNLOAD SACHETAN HANDBOOK