6th SCIENCE Question Answers 10.Fun of Magnet चुंबकाची गंमत

• मॅझेटाईट एक नैसर्गिक चुंबक आहे.

• चुंबक लोखंड, निकेल, कोबाल्ट अशा पदार्थांना आकर्षित करतो. अशा पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात.

• जे पदार्थ चुंबकाकडून आकर्षिले जात नाहीत. त्यांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात.

• प्रत्येक चुंबकाला दोन धृव असतात उत्तर धृव व दक्षिण ध्रुव.

• अधांतरी टांगलेला चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर राहतो.

• दोन चुंबकांच्या सजातीय धृवात अपसरण व विजातीय धृवात आकर्षण घडून येते.

इयत्ता – सहावी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

10. Fun of Magnet

1. मोकळ्या जागा भरा.

i) चुंबकपट्टी आणि नालाकृती चुंबक हे कृत्रिम चुंबकांच्या विविध प्रकारापैकी दोन प्रकार आहेत.

ii) चुंबकाकडून आकर्षिल्या जाणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात.

iii) कागद हा चुंबकीय पदार्थ नाही.

iv) पूर्वीच्या काळी खलाशी दिशा शोधण्यास चुंबकाचा तुकडा अंधातरी टांगता ठेवत असत.

v) चुंबकाला नेहमी दोन धृव असतात.

2. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा.

i) वृत्तचिती आकाराच्या चुंबकाला फक्त एक ध्रुव असतो.
उत्तर: चूक

ii) कृत्रिम चुंबकाचा शोध ग्रिसमध्ये लावला गेला.
उत्तर: बरोबर

iii) चुंबकांच्या सजातीय धृवात अपसरण होते.
उत्तर: बरोबर

iv) चुंबक लोखंडी चुऱ्याच्या जवळ आणला असता जास्तीत चूरा चुंबकाच्या म ध्यभागी चिकटतो.
उत्तर: चूक

v) चुंबकपट्टी अधांतरी टांगली असता नेहमी उत्तर – दक्षिण दिशेत स्थिर होते.
उत्तर: बरोबर

vi) कोणत्याही ठिकाणच्या पूर्व – पश्चिम दिशा शोधण्यास होकायंत्राचा उपयोग होऊ शकतो.
उत्तर: चूक

vii) रबर एक चुंबकीय पदार्थ आहे.
उत्तर: चूक

3. पेन्सिल शार्पनर जरी प्लास्टिकपासून बनलेला असला तरी तो चुंबकाच्या दोन्ही धृवाकडून आकर्षिला जातो. तर त्याचा काही भाग तयार करण्यास कोणता पदार्थ वापरलेला असतो त्याचे नाव सांगा.
उत्तर:
पेन्सिल शार्पनर प्लास्टिकपासून बनलेला असला तरी, धार करणारे पाते (ब्लेड) लोखंडाचे असते, त्यामुळे तो चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडून आकर्षित होतो.

4. एका चुंबकाचा एक ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या एका धृवाजवळ आणण्याच्या वेगवेगळ्या स्थिती कॉलम 1 मध्ये दाखविलेल्या आहेत. कॉलम 2 मध्ये प्रत्येक स्थितीचा परिणाम दाखविलेला आहे.

image 20

उत्तर:
        कॉलम 1                           कॉलम 2

     उत्तर -उत्तर                              – अपसरण

     उत्तर – दक्षिण                         – आकर्षण

      दक्षिण – उत्तर                        – आकर्षण

       दक्षिण – दक्षिण                    – अपसरण

5. चुंबकाचे कोणतेही दोन गुणधर्म लिहा.
उत्तर:

1) प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतात- उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव.
2) अधांतरी टांगलेला चुंबक नेहमी उत्तर-दक्षिण दिशेत स्थिर राहतो.
3) दोन चुंबकाच्या सजातीय ध्रुवात अपसरण आणि विजातीय ध्रुवात आकर्षण होते.
4) चुंबक चुंबकीय पदार्थांना स्वतःकडे आकर्षित करतो.

6. चुंबकपट्टीचे धृव कोठे स्थिरावलेले असतात ?
उत्तर: चुंबकपट्टीचे ध्रुव चुंबकपट्टीच्या दोन्ही टोकांकडे स्थिरावलेले असतात.

7. एका चुंबकपट्टीवर धृवांची ओळख (त्याचे चिन्ह) केलेली नाही. तर त्या चुंबकपट्टीच उत्तर ध्रुव कसा ओळखाल?

उत्तर:
पद्धत 1:

तुम्हाला जिथे राहायला आवडते तिथे दिशांचा माहिती असतो. उदाहरणार्थ, शाळेचा मुख्य प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे हे तुम्हाला माहित असते. यावरून अन्य दिशा शोधता येतात. अशा ठिकाणी चुंबकपट्टी दोऱ्याला लटकवा. ती चुंबकपट्टी दक्षिण-उत्तर स्थिर होईल. उत्तर दिशेकडे स्थिर झालेले टोक उत्तर ध्रुव आहे. त्यावर मार्कर पेनने दिशा चिन्हांकित करा.

पद्धत 2: तुमच्याकडे असलेल्या चुंबकपट्टीवर ध्रुवाचे चिन्ह नोंदविलेले नाही, तर दुसरी चुंबकपट्टी मिळवा ज्यावर ध्रुवाची ओळख आहे. त्यानंतर ध्रुवाची ओळख असलेल्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवाचे टोक चिन्हांकित नसलेल्या चुंबकपट्टीच्या एका टोकाजवळ ठेवा. दोन्ही चुंबक एकमेकांकडे आकर्षित होऊन चिकटल्यास, दुसऱ्या चुंबकाचे ते टोक उत्तर ध्रुव आहे.

8. तुम्हाला एक लोखंडीपट्टी दिली असता तिचे रुपांतर चुंबकपट्टीत कसे कराल ?
उत्तर:
लोखंडी पट्टी टेबलावर ठेवा. आता एक चुंबकपट्टी घेऊन तिचा कोणताही एक ध्रुव लोखंडी पट्टीच्या एका टोकावर ठेवा. चुंबकपट्टी न उचलता लोखंडी पट्टीच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत घासा. चुंबक उचला आणि परत लोखंडीपट्टीच्या पहिल्या टोकावर ठेवा. या क्रियेला सुमारे 30 ते 40 वेळा करा. लोखंडी खिळा किंवा टाचणी घेऊन लोखंडी पट्टी चुंबक बनली की नाही याची खात्री करा.

9. दिशा शोधण्यासाठी होकायंत्राचा उपयोग कसा होतो ?
उत्तर:
होकायंत्र म्हणजे वरती काच बसवलेली एक डबी असते. यामध्ये एक चुंबकसूची एका टोकदार वस्तूवर स्वतंत्रपणे फिरू शकते. होकायंत्राच्या आतील तबकडीवर दिशांच्या खुणा दर्शविलेल्या असतात. दिशा ठरविण्याच्या आवश्यक ठिकाणी होकायंत्र ठेवले जाते. होकायंत्रातील चुंबकसूची नेहमी उत्तर-दक्षिण दिशा दर्शवते. चुंबकसूचीचा उत्तर ध्रुव ओळखण्यासाठी सूचीच्या बाजूला वेगळा रंग दिला जातो. चुंबकसूची स्थिर झाल्यावर आतील तबकडीचे उत्तर दिशेशी जुळवून घेतल्यास त्या ठिकाणच्या चारही दिशा समजतात.

10. पाण्याच्या टबमध्ये तंरगणाऱ्या एका खेळण्यातील नावेजवळ एक चुंबक वेगवेगळ दिशेने जवळ आणला गेला. प्रत्येक स्थितीमधील झालेला परिणाम कॉलम 1 मध् आणि त्याचे संभावित कारणे कॉलम 2 मध्ये दिली गेली आहेत. कॉलम 1 मध् दिलेल्या घटकांच्या कॉलम 2 मधील घटकांशी जोड्या जुळवा.

कॉलम 1कॉलम 2
नाव चुंबकाकडे आकर्षित होते.नावेमध्ये चुंबक बसविलेला आहे. त्याचा उत्तर ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आहे.
नाव चुंबकामुळे प्रभावित होत नाही.नावेमध्ये चुंबक बसविलेला आहे. त्याचा दक्षिण ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आहे.
जर चुंबकाचा उत्तरध्रुव नावेच्या समोर आणला तर नाव चुंबकाजवळ येते.नावेच्या लांबट दिशेत एक लहान चुंबक बसविलेला आहे.
जर चुंबकाचा उत्तर ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आणला तर नाव चुंबकापासून दूर जाते.नाव चुंबकीय पदार्थापासून बनलेली आहे.
नाव दिशा न बदलता तरंगते.नाव अचुंबकीय पदार्थापासून बनलेली आहे.

उत्तर –

कॉलम 1कॉलम 2
नाव चुंबकाकडे आकर्षित होते.नाव चुंबकीय पदार्थापासून बनलेली आहे.
नाव चुंबकामुळे प्रभावित होत नाही.नाव अचुंबकीय पदार्थापासून बनलेली आहे.
जर चुंबकाचा उत्तरध्रुव नावेच्या समोर आणला तर नाव चुंबकाजवळ येते.नावेमध्ये चुंबक बसविलेला आहे. त्याचा दक्षिण ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आहे.
जर चुंबकाचा उत्तर ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आणला तर नाव चुंबकापासून दूर जाते.नावेमध्ये चुंबक बसविलेला आहे. त्याचा उत्तर ध्रुव नावेच्या समोरील भागाकडे आहे.
नाव दिशा न बदलता तरंगते.नावेच्या लांबट दिशेत एक लहान चुंबक बसविलेला आहे.

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *