• विद्युत घट हे एक विद्युतचे स्रोत आहे.
• एका विद्युत घटाला दोन अग्र असतात,एकाला धनाग्र (+) व दुसऱ्याला ऋणाग्र (-) म्हणतात.
• विद्युत बल्बमध्ये तंतूमय तार असते.ती दोन विद्युत अग्रांना जोडलेली असते.
• विद्युत बल्बमधून जेव्हा विद्युत प्रवाह वाहतो तेव्हा बल्ब पेटतो.
• एका बंधिस्थ विद्युत मंडलात विद्युत घटातील विद्युत प्रवाह एका अग्राकडून दुसऱ्या अग्राकडे वाहतो.
• स्विच हे एक साधे साधन असून विद्युत मंडलातील विद्युत प्रवाह बंद करण्यास किंवा मंडल पूर्ण करण्यास त्याचा उपयोग होतो.
• जे पदार्थ विद्युतच्या वहनाला आपल्यातून जाऊ देतात त्यांना विद्युत वाहक पदार्थ म्हणतात.
• जे पदार्थ विद्युतच्या वहनाला आपल्यातून पूर्णपणे जाऊ देत नाहीत त्यांना विद्युत रोधक पदार्थ म्हणतात.
इयत्ता – सहावी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
9. विद्युत आणि विद्युत मंडल
9. Electricity and Electricity Board
स्वाध्याय
1. रिकाम्या जागा भरा.
a) विद्युत मंडल बंद करणाऱ्या साधनाला विद्युत स्विच म्हणतात.
b) एका विद्युत घटाला दोन अग्रे असतात.
2: खालील विधाने बरोबर की चूक हे सांगा.
a) धातूच्या माध्यमातून विद्युत प्रवाह वाहू शकतो.
उत्तर: बरोबर
b) विद्युत मंडल तयार करण्यासाठी धातूच्या तारांऐवजी सुतळी वापरू शकतो.
उत्तर: चूक
c) थर्मोकोलमधून विद्युत प्रवाह वाहू शकतो.
उत्तर: चूक
3.चित्र 9.13 मध्ये दर्शविलेल्या रचनेमध्ये विद्युत बल्ब का पेटत नाही. स्पष्टीकरण द्या.
चित्र 9.13
उत्तर: चित्रातील बल्ब विद्युत मंडल अपूर्ण असल्यामुळे पेटत नाही. बल्ब पेटण्यासाठी मंडल पूर्ण असणे गरजेचे आहे. येथे ऋणाग्र बल्बला जोडला आहे, पण धनाग्राला जोडलेली तार मध्येच तुटलेली आहे आणि स्क्रू ड्रायव्हर जोडलेला आहे. स्क्रू ड्रायव्हरची समोरील बाजू धातूची असल्याने वीज वाहते, परंतु प्लास्टिकची मुठ विद्युत रोधक असल्यामुळे मंडल पूर्ण होत नाही. तार थेट धातूवर जोडल्यास मंडल पूर्ण होऊन बल्ब पेटेल.
4. चित्र 9.14 मध्ये दिसत असलेला अपूर्ण भाग पूर्ण करा आणि बल्ब पेटण्यास तारांची स्वतंत्र टोके कशा प्रकारे जोडली पाहिजेत ते सांगा.
चित्र 9.14
उत्तर: चित्रामध्ये तारांची दोन टोके दाखविली आहेत, त्यातील एक टोक घटाच्या ऋणाग्राला आणि दुसरे टोक बल्बला जोडावे.
5. विद्युत स्विच वापरण्याचे कारण काय असते? विद्युत वापरून कार्य करणाऱ्या काही लहान सहान कामासाठी उपयोगी पडणाऱ्या साधनामध्येच स्विच वापरलेले असते अशा सांधनांची नावे सांगा.
उत्तर: गरजेप्रमाणे विद्युत मंडल चालू-बंद करण्यासाठी स्विच वापरला जातो. स्विच न वापरल्यास उपकरण सतत चालू राहू शकते. अनेक साधनांत स्विच वापरले जातात, जसे खेळण्यातील मोटार, बॅटरी लाइट, इस्त्री, टेबल फॅन, टी.व्ही., रेडिओ, म्युझिक सिस्टिम, ब्लूटूथ स्पीकर इत्यादी.
6. चित्र 9.14 मध्ये सेफटी पीनच्या जागी जर रबर जोडला तर बल्ब प्रकाशमान होईल का?
उत्तर: सेफ्टी पीनऐवजी रबर जोडल्यास बल्ब पेटणार नाही, कारण रबर विद्युत वाहक नाही.
7. चित्र 9.15 मध्ये दाखविलेल्या विद्युत मंडलातील बल्ब प्रकाशमान होईल का?
चित्र 9.15
उत्तर: चित्रातील मंडलात सलग तार नसून दोरा वापरला आहे. दोरा विद्युत वाहक नसल्यामुळे बल्ब प्रकाशमान होणार नाही.
8. एखाद्या वस्तुवर विद्युत वाहक परीक्षक (conduction tester) चा उपयोग करुन विद्युत बल्ब पेटतो की नाही हे शोधता येते. तर ती वस्तू विद्युत वाहक असेल की विद्युत रोधक? स्पष्टीकरण द्या.
उत्तर : परीक्षक वापरल्यावर बल्ब पेटत असेल, तर ती वस्तू विद्युत वाहक आहे.कारण वीज वाहून बल्बला पोहोचवते.
9. तुमच्या घरामधील विद्युत स्विच दुरुस्त करताना वायरमन रबरचे हातमोजे का वापरतो हे स्पष्ट करा.
उत्तर: रबर विद्युत रोधक आहे. त्यामुळे रबरचे हातमोजे वापरल्यास वायरमनला शॉक बसत नाही.
10. वायरमन दुरुस्ती कामासाठी वापरत असलेले स्क्रूड्रायव्हर आणि पक्कड यांच्या मुठीवर प्लास्टिक किंवा रबरचे आवरण का असते?कारण स्पष्ट करा.
उत्तर: धातू विद्युत वाहक असल्याने स्क्रू ड्रायव्हर व पक्कड धातूचे असतात.मात्र प्लास्टिक व रबर विद्युत रोधक आहेत म्हणून मुठीला आवरण असते.