6th SCIENCE Question Answers The air around us 11. आपल्या सभोवतालची हवा

• हवा सगळीकडे आहे. आपण तिला पाहू शकत नाही पण आम्ही तिचे अस्तित्व अनुभवू शकतो.

• वाहत्या हवेला वारा (पवन) म्हणतात.

• हवा जागा व्यापते.

• पाणी आणि मातीमध्ये सुध्दा हवेचे अस्तित्व असते.

• हवा ही ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नैट्रोजन, पाण्याचे बाष्प आणि इतर वायुंचे मिश्रण आहे.तसेच धुळीचे कणसुध्दा यामध्ये असतात.

• ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो आणि सर्व सजीवांना श्वसनास आवश्यक आहे.

• पृथ्वीवरील हवेचे आवरण म्हणजेच वातावरण.

• पृथ्वीवरील जीवन जगण्यास वातावरणाची आवश्यकता आहे.

• पाण्यातील प्राणी पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर श्वसन क्रियेसाठी करतात.

• हवेतील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच्या देवाण-घेवाणमुळे प्राणी व वनस्पती पृथ्वीवर राहू शकतात.

इयत्ता – सहावी

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

स्वाध्याय 

11. The air around us

1- हवेतील घटक कोणते?
उत्तर-
हवा अनेक घटकांच्या मिश्रणाने तयार झालेली आहे. त्यातील मुख्य घटक म्हणजे नैट्रोजन 78.11%, ऑक्सिजन 20.95%, आणि कार्बन डायऑक्साईड 0.03% प्रमाणात आढळतात. याशिवाय, हवेमध्ये इतर वायू, पाण्याचे बाष्प, धूळाचे कण इ. घटक कमी प्रमाणात असतात. या सर्व घटकांनी मिळून हवा बनते.

2. वातावरणामध्ये श्वसन क्रियेसाठी कोणत्या वायूची आवश्यकता आहे?
उत्तर-
वातावरणात श्वसनासाठी ऑक्सिजन वायू आवश्यक आहे.

3. वस्तूंच्या ज्वलनास हवा मदत करते हे तुम्ही कसे सिध्द कराल?

उत्तर- दोन समान लांबीच्या मेणबत्त्या टेबलावर ठेवा आणि दोन्ही पेटवा. त्यानंतर एका मेणबत्तीसाठी उलटा काचाचा पेला घाला. ज्या मेणबत्तीवर पेला आहे, ती मेणबत्ती लवकर विझेल. काचेच्या पेल्यात ज्वलनासाठी आवश्यक वायू मर्यादित असल्यामुळे, ती मेणबत्ती थोड्या वेळातच विझते. यावरून वस्तूंच्या ज्वलनास हवा महत्त्वाची आहे हे सिद्ध होते.

4. पाण्यामध्ये हवा विरघळलेली आहे हे तुम्ही कसे दाखवू शकाल?
उत्तर-
एका काचाच्या किंवा चंचूपात्रात थोडे पाणी घाला आणि त्याला स्टँडवर ठेवून सावकाश उष्णता द्या. पाणी उकळण्यापूर्वी पात्राच्या आतील भागाचे निरीक्षण करा. तुम्हाला पात्राच्या पृष्ठभागावर छोटे बुडबुडे दिसतील, जे पाण्यात विरघळलेल्या वायूचे आहेत. यावरून पाण्यात हवा विरघळलेली असल्याचे स्पष्ट होते. मासे व पाण्यातील अन्य जलचर जीव श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या वायूचा उपयोग करतात. पाण्यात हवा नसली, तर या जीवांना जगणे शक्य नाही.

5. कापसाचा बोळा पाण्यात बुडविला असता तो बारीक का होतो ?
उत्तर-
कापसाच्या बोळ्यात हवा भरलेली असते. हवेच्या उपस्थितीत कापसाचा बोळा हलका आणि मोठा दिसतो. पण जेव्हा तो पाण्यात भिजतो, तेव्हा कापसाचे धागे ओले होतात आणि रिकाम्या जागेतली हवा बाहेर निघते, त्यामुळे कापसाचा बोळा बारीक होतो.

6. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात.

7. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी हवेतील घटकाचा वापर करतात तो घटक कार्बन डायऑक्साईड (CO₂).

8. हवेचे अस्तित्व दर्शविणाऱ्या पाच कृर्तीची यादी करा.

उत्तर:
1. हवा आपल्याला श्वसनासाठी मदत करते.

2. हवा ज्वलनास मदत करते; हवा नसेल तर दिवे किंवा चुली पेटू शकत नाहीत.

3. हवा वेगाने वाहते तेव्हा त्याला वारा म्हणतात. वाऱ्याचा उपयोग विद्युत निर्माण करण्यासाठी आणि धान्यातून कचरा वेगळा करण्यासाठी केला जातो.

4. हवेमुळे आपल्याला ध्वनी ऐकू येतो.

5. सायकलच्या चाकात हवा भरलेली असते, त्यामुळे आपण सायकल सहजपणे चालवू शकतो. हवा कमी असेल तर सायकल चालवणे कठीण जाते.

6. हवेमुळे कपडे वाळतात.

9. वातावरणातील हवेची देवाण-घेवाण करण्यासाठी प्राणी आणि वनस्पती परस्परांना कसे मदत करतात?
उत्तर –
वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेदरम्यान हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. ते ऑक्सिजनही शोषतात,पण ते जितका ऑक्सिजन घेतात, त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन हवेत सोडतात. त्यामुळे वनस्पती ऑक्सिजनची निर्मिती करतात असे म्हणता येते. सर्व प्राण्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. हवेत कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यास ती हवा प्राण्यांसाठी धोकादायक असते. पण वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. प्राणी हवेतील ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. या प्रकारे प्राणी आणि वनस्पती हवेची देवाण-घेवाण करतात.

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *