4th EVS 14.Traffic Rules वाहतुकीचे नियम

PART – 2

वाहतुकीचे नियम

प्रश्नांची उत्तरे –

Page No. 16

1. पादचाऱ्यांनी कोठून रस्ता ओलांडावा ?

उत्तर – पादचाऱ्यांनी झेब्रा पट्ट्यावरून रस्ता ओलांडावा.

2. सिग्नल दिव्यांचे रंग सांगा.

उत्तर – सिग्नल दिव्यांचे रंग: लाल, पिवळा, आणि हिरवा.

3. सिग्नल दिव्यांचा एक उपयोग लिहा.

उत्तर – सिग्नल दिव्यांचा उपयोग वाहनांना थांबण्याची, तयारीत राहण्याची आणि जाण्याची सूचना देण्यासाठी होतो.

4. तुम्ही शाळेला येत असताना रस्त्यावर सिग्नल दिवे लागतात का ?

उत्तर – हो, शाळेला जाताना रस्त्यावर सिग्नल दिवे लागतात.

5. रस्ता ओलांडताना तुम्ही कोणकोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात? का?

उत्तर – रस्ता ओलांडताना झेब्रा पट्टी वापरावी, सिग्नल बघावा, आणि वाहनं थांबली आहेत का ते पाहून पुढे जावे. हे अपघात टाळण्यासाठी आवश्यक आहे.

कांही सांकेतिक खुणा आणि त्यांचे अर्थ पुढील पानावर दिले आहेत.रेषा मारून त्यांच्या जोड्या जुळवा.

image 6

वाहतूक नियमांचे पालन केल्याने होणारे दोन फायदे कोणते?

1. अपघात कमी होतात.

2. प्रवास सुरक्षित राहतो.

पादचाऱ्यांनी पाळावयाचे वाहतूकीचे नियम येथे दिलेले आहेत. जर ते बरोबर असतील तर (✔) अशी खुण करा आणि चूक असतील तर (×) अशी करा व बरोबर करुन लिहा.

image 11
image 10

तुमच्या परिसरात खालील प्रकारचे सिग्नलचे फलक कोठे आढळतात? दिलेल्या जागेत लिहा. खाली एक उदाहरण दिलेले आहे त्याचे निरीक्षण करा.

image 12

उत्तर –

image 13

घर आणि शाळा येथे होणाऱ्या काही लहान अपघाताबद्दल आपणाला माहिती आहेच. उदाहरणार्थ, विद्युत उपकरणे, गॅस शेगडी, चाकू, ब्लेड आणि कोयता किंवा विळा वापरतांना आपण जर काळजी घेतली नाही तर धोका होऊ शकतो.

image 15

उत्तर –

अ नं.अपघातजन्य प्रसंग सावधगिरी
1गॅस शेगडी वापरात नसतानागॅस बंद ठेवणे
2चाकू किंवा ब्लेड वापरतानाहळुवारपणे वापरणे
3विद्युत उपकरणे वापरतानाहात कोरडे ठेवणे
4पंखा किंवा मोटर चालू असतानासुरक्षित अंतर ठेवणे
5रस्त्यावर खेळणेखेळासाठी सुरक्षित जागा निवडणे

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now