STATE SYLLABUS
CLASS – 4
MARATHI MEDIUM
SUBJECT – SCIENCE
PART – 2
परिसर अध्ययन
प्रकरण- 13
Our Body A Wonderful Machine
आपले शरीर – एक अद्भुत यंत्र
हे तुला माहीत आहे का?
• आपल्या शरीरात सुमारे 206 हाडे आणि 600 पेक्षा जास्त सांधे आहेत.
• तुझी उंची जरी आता तीन फूट असली तरी, तुझी पचनेंद्रिये 20 फूट लांबाची आहेत. ती गुंडाळलेल्या स्थितीत असतात.
• एका मिनिटामध्ये आपल्या हृदयाचे ठोके 70 पडतात आणि एका दिवसात सुमारे एक लाख पडतात.
• फुप्फुसामध्ये तीन लिटर हवा भरु शकते.
• मानवी शरीरात सुमारे 5.5 लिटर रक्त असते.
• रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्त तयार होते. त्यासाठी 4 ते 5 आठवड्यांची गरज असते.
अभ्यास
रेघा मारून जोड्या जुळवा.
अ आ
1. डोळे वास घेण्यासाठी
2. कान चव घेण्यासाठी मदत
3. नाक वस्तू पाहण्यासाठी मदत
4. जीभ गरम, थंड इत्यादी अनुभव घेण्यासाठी मदत
5. त्वचा आवाज ऐकण्यासाठी मदत
उत्तर –
चित्र पहा. हवा शरीराच्या ज्या भागातून आत जाते त्याच भागातून बाहेर येते. त्यामुळे छातीवर असलेल्या हाताला छातीचा आकार जास्त कमी झाल्याची जाणीव होते. चित्रात हवा आत बाहेर जाण्याचा मार्ग आणि अवयव दर्शविले आहेत त्यांची क्रमाने नावे लिही.
1. नाक
2. श्वास नलिका
3. फुप्फुस
तू एका मिनीटात किती वेळा श्वासोच्छवास करतोस ? मोज.
उत्तर – मी एका मिनीटात 12 ते 20 वेळा श्वासोच्छवास करतो.
आता तुझ्या तोंडाच्या भागांची नावे लिही
उत्तर – ओठ , दात , जीभ , गाल , टाळू
अन्न पदार्थांचे चर्वण करण्यास मदत कोण करते ?
उत्तर – अन्न पदार्थांचे चर्वण करण्यास दात मदत करतात.
जीभेचे कार्य कोणते ?
उत्तर – अन्नाची चव घेणे, अन्न गिळण्यास मदत करणे हे आहे.
चित्रात दिलेल्या इंद्रियाचे कार्य दिलेल्या जागेत लिहा.
चित्राचे निरीक्षण कर. त्यातील भागांची नावे खाली लिही.
1) मूत्रपिंड
2) मित्रवाहिनी
3) मूत्राशय
4) युरेथ्रा
खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड बाहेर टाकणारे इंद्रिय कोणते ?
उत्तर – नाक
शरीरातील अशुद्ध घटक घामाच्या रुपात बाहेर टाकणारे इंद्रिय कोणते ?
उत्तर – त्वचा
शरीरातील अशुद्ध घटक द्रवरुपात बाहेर टाकणारे इंद्रिय कोणते ?
उत्तर – मूत्राशय