8th Science 7. पौगंडावस्थेमध्ये पदार्पण (Reaching the age of Adolescence)

PART – 2

पौगंडावस्थेमध्ये पदार्पण

13. पौगंडावस्थेमध्ये पदार्पण (Reaching the age of Adolescence)

AVvXsEhS l5QhTrUlXy0yfJJN5VeHrlItAaIeLHAoIPqkcZGKxnhMR3ZS42020d0Eo1Cg670n9CuAounkvlvRYfMIhwtwpqMlrb954c96 SA Gia 3HSikCwl2iSADIn0CeMzBLpWqblku4OZzz7hbUbkHfwB2NlDXJo6KjglY8jb8U1bXq4t09xo4TT5I YNg=w392 h400

अभ्यास

1. शरिरातील बदलांना कारणीभूत असणाऱ्या अंतःसर्गी ग्रंथीमधून स्त्रवल्या जाणाऱ्या संप्रेरकांना काय म्हणतात ?
उत्तर – शरीरातील बदलांना कारणीभूत असणाऱ्या अंतःसर्गी ग्रंथीमधून स्त्रवल्या जाणाऱ्या घटकांना संप्रेरके म्हणतात.

2. प्रौगंडावस्थेची व्याख्या सांगा.

उत्तर – ज्या काळामध्ये शरीरामध्ये नैसर्गिक बदल घडतात की ज्यामुळे प्रजनन परिपक्वता येते.त्या काळाला पौगंडावस्था असे म्हणतात.

3.मासिक पाळी म्हणजे काय ? वर्णन करा.

उत्तर- नरामध्ये टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तर मादीमध्ये एस्ट्रोजन नावाचे संप्रेरक स्त्रवले जाते.मादीमध्ये विकसित होणारे फलित अंडे येणार म्हणून गर्भाशयाची भित्ती तयार होते.जर फलन झाले नाही तर गर्भाशयाची जाड झालेली भित्ती तुटून रक्ताबरोबर बाहेर पडते ज्याला मासिक पाळी असे म्हणतात.

4. यौवनामध्ये शरिरामध्ये होणाऱ्या बदलांची यादी करा.


उत्तर : यौवनामध्ये शरीरामध्ये होणाप्या बदलांची यादी खालीलप्रमाणे –

1. शरीराची उंची, वजन वाढते

2. काखेमध्ये व मांडयामधील अवयवांजवळ केस वाढतात.

3.त्वचा वारंवार तेलकट बनते.

4.चेहऱ्यावर पिंपल्स उठतात.

5. स्वभावात लाजाळुपणा किंवा भिडस्तपणा येतो.


5. अंतः सर्गी ग्रंथीचे वर्णन करणारा असा तक्ता तयार करा की ज्याच्यामध्ये दोन रकाने असतील,एका रकान्यात अंतःसर्गी ग्रंथीचे नांव व दुसऱ्या रकान्यात संबंधित ग्रंथीचे कार्य लिहिलेले असावे.

अंतःसर्गी ग्रंथीकार्य
1.पिट्युटरी ग्रंथीपिट्युटरी ग्रंथी मेंदूच्या तळाशी असते.शारीरिक व मानसिक भागांवर नियंत्रण ठेवतात.
2. थायरॉईड ग्रंथीथायराईड ग्रंथी घशामध्ये असते.शरीरातील चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते.
3.अॅड्रीनल ग्रंथीअड्रेनलिन ग्रंथी मूत्रपिंडावर असते.एखाद्या संकटांप्रसंग
सामोरे जाण्यास मदत करते.
4.स्वादु पिंडस्वादुपिंड साखरेवर नियंत्रण ठेवते.

6. लैंगिक संप्रेरके म्हणजे काय? त्यांना तसे का म्हणतात? त्यांची कार्ये सांगा.

उत्तर – जी संप्रेरके लैंगिक अवयवांची वाढ करतात.त्यांना लैंगिक संप्रेरके असे म्हणतात. कारण लैंगिक अवयवांची वाढ करतात.

नर वृषण टेस्टेस्टेरॉन –

                पौगंडावस्थेमध्ये नरामध्ये टेस्टेस्टेरॉन संप्रेरक असते. व मुलांना दाडी, मिश्या येतात व मुलांचा आवाज घोगरा होतो.प्रजननाचे अवयव मोठे होतात.

★ मादी अंडाशय इस्ट्रोजन → पौगंडावस्थेमध्ये मादीमध्ये इस्ट्रोजन संप्रेरक असते.व मुलींमध्ये दर महिन्याला मासिक पाळी सुरु होते.शरीराचा आकार वाढतो.प्रजननाचे अवयव मोठे होतात.

7. अचूक उत्तरे निवडा.
(a) पौंगडावस्थेतील मुलांनी व मुलींनी आपल्या आहाराबद्दल जागरुक असावे कारण
(i) समतोल आहारामुळे मेंदूची वाढ होते.
(ii) त्यांच्या शरिराच्या वेगाने होणाऱ्या वाढीसाठी योग्य आहाराची आवश्यकता असते.
(iii) पौंगडावस्थेत सारखी भूक लागते.
(iv) पौंगडावस्थेत रुची मुकुलांची व्यवस्थित वाढ होते.
उत्तर -(ii) त्यांच्या शरिराच्या वेगाने होणाऱ्या वाढीसाठी योग्य आहाराची आवश्यकता असते.


b) स्त्रियांमध्ये प्रजोत्पादक वयाची सुरवात खालील टप्प्याच्यावेळी होते.
(i) मासीक पाळी सुरु झाल्यावर
(ii) छातीचा आकार वाढू लागल्यावर
(iii) शरिराचे वजन वाढल्यावर
(iv) उंची वाढल्यावर
उत्तर -(i) मासीक पाळी सुरु झाल्यावर

(c) पौंगडावस्थेतील योग्य आहार खालील प्रमाणे असतो
(i) चिप्स्, नूड्ल्स्, कोक
(ii) चपाती, डाळ, भाज्या
(iii) भात, नूडल्स आणि बर्गर
(iv) भाज्यांचे कट्लेट्स, चिप्स आणि लिंबू सरबत.
उत्तर -(ii) चपाती, डाळ, भाज्या


8. टिपा लिहा.
(a) अॅडॅमचे अॅपल

AVvXsEj2vG0YqtnbrBGmkFD8wqk dl95q2fKU4a1wZ5ZnJzb890cUuZ41ysPx4rc13jibpVakCgAk7vqhGrZVElRQcbFYH6u2sTS5grx3L3g rILoT6b7MWz 31s9LBlqCNwoibTdHrS9gpsSth15OH3e9snfvBtKnOpeazNe4qm80GkzmBTXyGQ045hbADzHQ=s320

जेव्हा मुलांमध्ये स्वरयंत्राची वाढ होत असते तेव्हा घशाच्या पुढे येणाऱ्या भागाला अॅडमचे अॅपल किंवा गळघाटीचे हाड असे म्हणतात.मुलांचा आवाज घोगरा असतो पौगडावस्थेत मुलांच्यामध्ये स्वरयंत्रातील स्नायूंची नियंत्रणा बाहेर वाढ होते, त्यांचा आवाज घोगरा होतो.


(b) दुय्यम लैंगिक लक्षणे

उत्तर – दुय्यम लैंगिक लक्षणे खालील प्रमाणे –

 शरीराची उंची, वजन वाढते.

काखेमध्ये आणि मांड्यामधील अवयवांजवळ केस वाढतात.

त्वचा वारंवार तेलकट बनते

चेहऱ्यावर पिंपल्स उठतात.

स्वभावात लाजाळूपणा किंवा भिडस्तपणा येतो.


(c) न जन्मलेल्या बाळाचे लैंगिक निदान.

उत्तर – गर्भाशयामध्ये जेव्हा गर्भ वाढतो तेव्हा लैंगिक निदाण ओळखता येते. नरपेशीमधील X गुणसुत्रे मादीपेशीतील x गुणसुत्राशी संयोग पावतात.तेव्हा xx’ मुलगी संतती असते. नरपेशीमधील Y गुणसूत्र मादीपेशीतील X शी संयोग पावतो.त्यावेळी XY मुलगा संतती जन्माला येतो.


9. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये मुलांची आणि मुलींची वयानुसार वाढणारी उंची दिली आहे. एकाच आलेखामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या वयानुसार वाढणाऱ्या उंचीचा आलेख काढा या आलेखावरुन तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल ?

AVvXsEiWQkT9AGeB0BFtNGKK BhElr5K Rc

उत्तर – 

AVvXsEgsR9aKmvcKXexibM3LeW1QeefK 0HBnOk8O5DUW qJ L03EisnFZ90g4TMQqqX B 9tEzhnKVc3u6BM3yL6EgGuT5dECYBVI8CgakcFcIrUexVJdVCKJrILC0AEe6ePit6iDhHfYWQvqitOFtwU9Q0PtHvJJHz 5yBt5xqFynEI7gpMWsrgJN0kjHQ w=w400 h364

वरील लेखावरून असा निष्कर्ष निघतो की मुलांच्या व मुलींच्या वयानुसार उंची मध्ये बदल घडतो.X अक्षावर वय वर्ष आणि Y अक्षावर उंची घेतलेली आहे व वय वर्ष असताना

53 सेंटीमीटर उंची समान दर्शवली आहे.वय वर्षे 4 मध्ये मुलींची उंची मुलांपेक्षा कमी आहे.
वय वर्ष 16 मध्ये समान उंची आहे.पुन्हा वय वर्षे 20 मध्ये मुलांची उंची मुलींपेक्षा वाढलेली आहे.

AVvXsEhPuBV1gM3B a0cYVS46 vcAW473QsV1crmambFH9 c2yPdXv9TUl3IFXYBjOAmTwoB9yqSYNQHIf2VwDn6tMVQXo4Zs9FF 3mhjwMP1eYuooILP9rz1OKNB3p7lxDWQQcByG8FJZDiQj1q lJ3 hmqkYBmFQOdLX l19emJb8fedKYKVps61AwDfkqNA=w286 h400

1 मुलांमधील आवाज निर्माण करणारी पेटी – स्वरयंत्र

2 नलिका विरहित ग्रंथी – अनालिका

3 मेंदूला जोडलेले अनालिका प्रपिंड – प्रहिड प्रपिंड

4 अंतःस्तर्गी ग्रंथीतून निर्माण होणारा स्त्राव – संप्रेरक

5 स्वादूपिंडात तयार होणारे संप्रेरक – इन्सुलिन

6. स्त्री संप्रेरक – एस्ट्रोजेन

7 पुरुषामधील संप्रेरक – टेस्टेस्टेरॉन

8 थायरॉक्झीन येथे निर्माण होतो. – थॉयराईड

9 किशोरावस्थेसाठी साठी वापरला जाणारा दुसरा शब्द – पौगंडावस्था

10 रक्त प्रवाहातून संप्रेरके येथे पोहचतात – लक्ष्य इंद्रिय

11 स्वर पेटी –

12 यामुळे किशोरावस्थेत बदल घडून येतात. -प्रपिंड तारुण्य

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *