KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 7
MARATHI MEDIUM
SUBJECT – MARATHI
PART – 2
मराठी
पाठ – 23
मनातले चांदणे
लेखक – मधु मंगेश कर्णिक
अ. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. बल्लू कोणत्या शाळेत शिकत होता?
उत्तर : बल्लू म्युनिसिपालिटीच्या शाळेत शिकत होता.
2. बल्लू दररोज सकाळी काय करत असे?
उत्तर : बल्लू दररोज सकाळी वर्तमानपत्र टाकत असे.
3. बल्लू दर रविवारी लेखकाच्या घरी का येत असे?
उत्तर : बल्लू दर रविवारी टी. व्ही. वर दाखवली जाणारी प्राण्यांची मालिका पाहण्यासाठी लेखकाच्या घरी येत असे.
4. लेखक त्याला कोठे घेऊन जाणार होते?
उत्तर : लेखक बल्लूला त्यांच्या कोकणातील गावी घेऊन जाणार होते.
5. बल्लूने लिहिलेल्या लेखाचे शीर्षक काय होते?
उत्तर : बल्लूने लिहिलेल्या लेखाचे शीर्षक ‘मला न भेटलेले अंगणातील चांदणे’ हे होते.
आ. दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
1. बल्लूला खेड्यात का जावेसे वाटत होते?
उत्तर : लेखकाच्या पुस्तकातून बल्लूने कोकणातील खेड्याचे सुंदर वर्णन वाचले होते. तो मुंबईत जन्मलेला असल्याने त्याने डोंगर, नदी, झाडं-वेली यापैकी काहीच पाहिले नव्हते. त्यामुळे त्याला खेड्यात जाण्याची इच्छा झाली.
2. बल्लूला केव्हा आनंद झाला?
उत्तर : बल्लूला प्राण्यांच्या टी.व्ही. मालिकेची खूप आवड होती, परंतु त्याच्या घरी टी.व्ही. नव्हता. लेखकाने त्याला टी.व्ही. पाहण्यासाठी घरी येण्याची परवानगी दिली, त्यावेळी बल्लूला खूप आनंद झाला.
3. बल्लूने लेखकांना तुमच्या बरोबर गावी येणे कधीच शक्य नाही असे का सांगितले?
उत्तर : बल्लू दहावीच्या वर्गात शिकत होता, त्याचे बाबा वारले होते आणि त्याची आई आजारी होती. दिवसा काम आणि रात्री शाळा अशा परिस्थितीत त्याच्या आई आणि भावंडांची जबाबदारी त्याच्यावर होती. म्हणून त्याने लेखकाला गावी येणे शक्य नाही असे सांगितले.
4. बल्लूने लेखात खेड्याचे वर्णन कसे केले होते?
उत्तर : बल्लूने लेखात खेड्याचे वर्णन करताना लिहिले होते – ‘माझं एक चिमुकलं स्वप्न आहे, कोकणात किंवा मुंबईबाहेरच्या खेड्यात आपलं छोटंसं कौलारु घर असावं. अंगणात शुभ्र चांदणे पडावं आणि मी त्याचा आनंद लुटावा.’
इ. रिकाम्या जागा भरा.
1. विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती.
2. संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून लेखकाला बोलाविले होते.
3. बल्लू सहाव्या इयत्तेत शिकत होता.
4. लेखकाने बल्लूला गोष्टींची आणि चित्रांची पुस्तके भेट दिली.
उ. खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली ते लिहा.
1. “धावत का जावं? सावकाश जा.”
उत्तर : हे वाक्य लेखकाने बल्लूला म्हटले आहे.
2. “तुमच्या कौलारू घराच्या अंगणात रात्री पडणारं चांदण मला पाहायचं आहे.”
उत्तर : हे वाक्य बल्लूने लेखकाला म्हटले आहे.
ऋ. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
1. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे – मासिक
2. लेखाला दिलेले नाव – शीर्षक
3. लेख लिहिणारा – लेखक
4. स्पर्धेचे आयोजन करणारा – संयोजक
5. स्पर्धेत दिले जाणारे बक्षीस – पारितोषिक
6. छपरातून येणारा प्रकाश – कवडसा