KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 7
MARATHI MEDIUM
SUBJECT – MARATHI
PART – 2
मराठी
कविता 24
वीर स्त्री रायबागन
अ. एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. रायबागनचे खरे नाव काय?
उत्तर:तुळसाबाई देशमुख हे रायबागनचे खरे नाव होते.
2. तिला रायबागन हा किताब कोणी दिला?
उत्तर: तुळसाबाईला रायबागन हा किताब औरंगजेबाने दिला.
3. शिवाजी महाराजांवर कोणत्या मोगल सरदाराने आक्रमण केले?
उत्तर: कहारतलबखान या मोगल सरदाराने शिवाजी महाराजांवर आक्रमण केले.
4. शिवाजी राजांनी खानाच्या सैन्याला कोठे गाठले?
उत्तर: शिवाजी राजांनी खानाच्या सैन्याला उंबरखिंडीत गाठले.
आ. दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. उंबरखिंडीचे वर्णन करा.
उत्तर: उंबरखिंडीचा परिसर हिरव्यागार जंगलाने वेढलेला होता. डोंगराचे भयंकर कडे पाहून भीती वाटत होती. एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी होती.
2. रायबागनचा पोशाख कसा होता?
उत्तर: रायबागनने डोक्यावर सोनेरी पागोटे बांधले होते, त्यावर रत्नजडित चांद होता. अंगात भरजरी अंगरखा, कमरेला तलवार आणि चोळणा घातले होते. हा पोशाख वीरांना शोभेल असा होता.
3. वकिलाने कोणता निरोप सांगितला?
उत्तर: खानसाहेबांना त्यांची चूक उमगली आहे आणि त्यांनी शिवाजी राजांकडे क्षमा मागितली आहे. त्यांनी त्यांना जीवदान देण्याची विनंती केली आहे.असा वकिलाने निरोप सांगितला.
4. शिवाजी राजांनी रायबागनबद्दल कोणते उद्गार काढले?
उत्तर: शिवाजी महाराज म्हणाले, तुमच्यासारख्या सेनापतींची तलवार आम्ही घेऊ शकत नाही. तुम्हाला औरंगजेबाने रायबागनचा किताब दिला आहे, तो योग्यच आहे.
5. या पाठातून शिवाजी महाराजांचे कोणते गुण दिसून येतात?
उत्तर: शिवाजी महाराजांच्या या कथेत वीरांचा आदर, स्त्रीचा सन्मान, शत्रूला माफ करण्याची क्षमता आणि लोकांचे कौतुक करण्याचे गुण दिसून येतात.
इ. खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली, ते लिहा.
1. “आपण कसं ओळखलत महाराज?”
उत्तर: हे वाक्य रायबागनने शिवाजी महाराजांना म्हटले आहे.
2. “तुम्ही तरी आम्हाला हिंमत शिकवू नका, माझी हिंमत खुद आलमगीर बादशहानासुद्धा ठाऊक आहे.”
उत्तर: हे वाक्य रायबागनने कहारतलबखानाला म्हटले आहे.
3. “तुमच्यासारख्या वीर स्त्रीचं दर्शन झालं,आम्ही धन्य झालो.”
उत्तर: हे वाक्य शिवाजी महाराजांनी रायबागनला म्हटले आहे.
4. “त्यांना सांगा, शरण आलेल्या शत्रूला आम्ही कधीच धक्का लावत नाही.”
उत्तर: हे वाक्य शिवाजी महाराजांनी खानाच्या वकीलाला म्हटले आहे.
ई. वाकप्रचारांचा अर्थ आणि उपयोग सांगून वाक्यात वापरा.
1. बेत करणे – निश्चय करणे
आम्ही पुढील महिन्यात सहलीला जाण्याचा बेत केला आहे.
2. भारावून जाणे – प्रभावित होणे
संगीताच्या कार्यक्रमाने सगळे भारावून गेले.
3. कुर्निसान करणे – मुजरा करणे
शिवाजी महाराज दरबारात आल्यावर सर्वांनी त्यांना कुर्निसात केला.
4. धारण करणे – जवळ असणे
माझ्या वडिलांनी आपल्या डोक्यावर टोपी धारण केली.
5. माघारी वळणे – परत फिरणे
रस्त्यात पाण्याचा पूर आल्यामुळे आम्हाला माघारी वळावे लागले.
6. धडकी भरणे – खूप भीती वाटणे
अचानक आकाशात विजा चमकल्या आणि आम्हाला धडकी भरली.
उ. समानार्थी शब्द लिहा.
1. धाडस – साहस
2. कठीण – अवघड
3. धन्य – कृतार्थ
4. लढाई – युद्ध
5. बातमी – वार्ता
6. फौज – सैन्य
7. घोडा – अश्व
8. शत्रू – दुष्मन
ऊ. रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरा.
1. नौ ब _ : नौबत
2. कि ता _ : किताब
3. _ डा : कडा
4. पोशा _ : पोशाख
5. वी _ : वीर
ए. चटकदार अक्षरांची मिसळ व योग्य शब्द लिहा.
1. नराबागय – रायबागन
2. डबरउंखि – उंबरखिंड
3. डहगलो – लोहगड
4. नईराव – वनराई
5. रतलवा – तलवार
6. दडळघो – घोडदळ
7. रदिदाल – दिलदार
8. जेरंबगऔ – औरंगजेब
9. पसेतीना – सेनापती
10. खाअंरग – अंगरखा