KTBS KARNATAKA
STATE SYLLABUS
CLASS – 7
MARATHI MEDIUM
SUBJECT – MARATHI
PART – 2
मराठी
कविता 22
भलरी
कवितेचा अर्थ :
शेतात सुगीच्या काळात, म्हणजे पिके कापताना किंवा पिकांची रास करताना जी गाणी गातात, त्यांना भलरी म्हणतात.
शेतकरी आपल्या सहकाऱ्यांना सांगतो की, भलरीचे गीत गा. शेतातल्या पिकांनी जणू चांदीसारखा रस पाझरला आहे. डोंगर चांदीसारखे दिसत आहेत, कारण शेतांमध्ये भरपूर पीक आले आहे आणि त्यावर चमकणारे कणसे दिसत आहेत. त्यामुळे शेतात आनंदाचे संगीत जणू घुमत आहे. गड्यांनो, भलरीचे गीत गा. ||1||
शेतातील पिकांमध्ये शीतल वारा सळसळत, झुळझुळत वाहत आहे. हा वारा आपल्या मनासारखा, स्वच्छंदीपणे वाहत आहे. गड्यांनो, भलरीचे गीत गा. ||2||
शेताजवळ वाहणारा पाण्याचा ओढा जणू वेडा होऊन गाणी गात आहे. त्यातून वाहणारे खळखळ पाणी लावणीसारखे गात आहे असे वाटत आहे.
जोंधळ्याच्या कणसामुळे जोंधळ्याच्या धाट्या वाकल्या आहेत, आणि ते डोलत आहेत. हे पीक खूप अनमोल आहे, त्यामुळे त्याचे कौतुक करून त्यासाठी आम्ही मातीमध्ये घाम गाळू.
आम्ही आमची मेहनत दाखवून या मोत्यासारख्या पिकांची रास करू. शेतात कष्टाने मिळवलेले धान्य आम्ही बसून आनंदाने खाऊ.
स्वाध्याय
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. डोंगर कसा दिसत आहे?
उत्तर : डोंगर रुपेरी दिसत आहे.
2. घाम कोठे गाळू या असे कवी म्हणतो?
उत्तर : घाम मातीमध्ये (शेतात) गाळू असे कवी म्हणतो.
3. ‘ईजिक खाऊ आनंदानं बसून मग काळीत’ या ओळीचा अर्थ काय?
उत्तर : आम्ही कष्टाने पिकवलेले धान्य याच शेतात बसून खाऊ असा अर्थ आहे. शेतकरी शेतात काम करताना शेतातच जेवण करतो, हे ओळीतून सांगितले आहे.
4. वारा कसा गात आहे?
उत्तर : वारा स्वच्छंदीपणे गात आहे.
5. भलरीची गीते केव्हा म्हटली जातात?
उत्तर : भलरीची गीते सुगीच्या काळात म्हटली जातात.
6. ही कविता कोणी लिहिली आहे?
उत्तर : ही कविता शंकर केशव कानेटकर (गिरीश) यांनी लिहिली आहे.
आ. जोड्या जुळवा.
उत्तर –
1. घुमू लागलं आनंदाचं – शेतातून संगीत
2. ईजिक खाऊ आनंदानं – बसून मग काळीत
3. स्वच्छंदानं गात चालला – आपुल्याच लहरीत
4. गाऊन त्येला घाम जरासा – गाळू या मातीत
5. भलरी घाला चला – गड्यांनो भलरीचं गा गीत
इ. कवितेत आलेले लयबद्ध शब्द लिहा.
1. सळसळणारा – शीतल वारा
2. देई डोल – ह्यो बिनमोल
3. म्हराटबाणा – मोतीदाणा
ई. ग्रामीण भाषेतील शब्द आणि त्यांचे सध्याच्या भाषेत अर्थ.
1. भलरी – सुगी
2. ह्यो – हे
3. समदं – सगळे
4. येड्यावानी – वेड्यासारखा
5. जुन्दळा – जोंधळा
6. लवून – वाकून
7. त्येला – त्याला
8. लहिरीत – लहरीत
जी या अक्षराने शेवट होणारे दोन अक्षरी शब्द लिहून पूर्ण करा.
1. आईची आई – आजी
2. भाकरीबरोबर खातात ती – भाजी
3. फसवणारा – पाजी
4. होऊन गेलेला – माजी
5. कबूल होणे – राजी
6. उंची कमी असलेला – खुजी
7. मुस्लिम पंडित अथवा न्यायाधीश – काजी
8. कांदा, मिरची घालून तेलात तळलेली – भुर्जी