STATE SYLLABUS
CLASS – 10
MARATHI MEDIUM
SUBJECT – SOCIAL STUDIES
PART – 2
HISTORY
प्रकरण 18
18. FREEDON MOVEMENTS
स्वातंत्र्याची चळवळ
IMP SHORT NOTES
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना (1885):
❇️ए. ओ. हयूमने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली.
❇️काँग्रेसचा उद्देश राजकीय जागृती आणि राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे होता.
2. मवाळ आणि जहाल गट:
❇️मवाळ: संविधानात्मक मार्गाने ब्रिटिश सरकारकडे मागण्या मांडण्यावर विश्वास ठेवणारे नेते (एम. जी. रानडे, दादाभाई नौरोजी).
❇️जहाल: हिंसक मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त करण्याची विचारसरणी मांडणारे नेते (बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय).
3. बंगालची फाळणी (1905):
❇️लॉर्ड कर्नझने बंगालची प्रशासकीय फाळणी केली,ज्याचा उद्देश हिंदू-मुस्लिम समाजांत फूट पाडणे होता.
या फाळणीला संपूर्ण देशातून विरोध झाला.
4. स्वदेशी चळवळ:
❇️बंगालच्या फाळणीच्या विरोधात विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याची चळवळ सुरू झाली.
5. गांधीयुग (1920-1947):
❇️महात्मा गांधींनी अहिंसा, सत्याग्रह, आणि स्वदेशीचा वापर करून ब्रिटिश सत्तेला विरोध केला.
असहकार, सविनय कायदेभंग आणि खेड्यातील विकासकार्य गांधीजींच्या नेतृत्वाखालील मुख्य आंदोलन होती.
6. जालियनवाला बाग हत्याकांड (1919):
❇️जनरल डायरने शांततापूर्ण जमावावर गोळीबार करून 379 लोकांचा जीव घेतला,ज्यामुळे संपूर्ण देशभरात संताप उसळला.
7. जयप्रकाश नारायण: काँग्रेसच्या समाजवादी शाखेचे प्रमुख नेते,त्यांनी क्रांतिकारी चळवळींना प्रोत्साहन दिले.
8. चले जाव चळवळ (भारत छोड़ो):
❇️ चले जाव चळवळ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक आणि निर्णायक चळवळ होती. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या ‘ग्वाल्हेर टँक मैदानाव’ महात्मा गांधींनी ‘भारत छोडो’ची घोषणा केली. या चळवळीचे उद्दिष्ट एकच होते—इंग्रजांनी भारत सोडावा आणि स्वातंत्र्य प्रदान करावे. या चळवळीमुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सर्वसामान्य लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला.
चळवळीची पार्श्वभूमी
❇️ दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतातील जनतेला विश्वासात न घेता ब्रिटिशांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय नेत्यांमध्ये संताप वाढला.
❇️ काँग्रेसचे मंत्रिमंडळ राजीनामे देऊन युद्धाच्या विरोधात गेले होते, तर मुस्लिम लीगने स्वातंत्र्यदिनी ‘विमुक्ती दिवस’ साजरा केला.
❇️ ब्रिटिश सरकारच्या एकतर्फी धोरणांविरोधात असंतोष वाढला, आणि भारतीयांना स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार झाला.
चले जाव चळवळीतील योगदान आणि नेतृत्व
❇️ महात्मा गांधी: त्यांनी भारतीयांना ‘करा किंवा मरा’ (Do or Die) चे आवाहन केले.
❇️सुभाषचंद्र बोस: त्यांनी विदेशात भारतीय सैनिकांना एकत्र करून ‘आझाद हिंद फौज’ स्थापन केली. त्यांनी ‘दिल्ली चलो’ अशी घोषणा केली आणि ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ असे आवाहन केले.
❇️ जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल: देशभरातील कार्यकर्त्यांनी या चळवळीत सक्रिय भाग घेतला.
❇️ महिला आणि विद्यार्थी: अरुणा आसफ अली आणि उषा मेहता यांसारख्या महिलांनी भूमिगत हालचालींचे नेतृत्व केले.
चले जाव चळवळीतील प्रमुख घटनाक्रम
❇️ 8 ऑगस्ट 1942 रोजी भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झाले.
❇️ प्रमुख नेते तुरुंगात टाकण्यात आले, तरीही आंदोलन संपूर्ण देशभर पसरले.
❇️ मुंबई, पुणे, कानपूर आणि बंगालमध्ये आंदोलनाचे तीव्र रूप दिसले.
❇️ तरुण कार्यकर्त्यांनी रेल्वेमार्ग, तारांचे खांब उखडून प्रशासनावर दबाव आणला.
चले जाव चळवळीचा प्रभाव आणि महत्त्व
❇️ या चळवळीमुळे ब्रिटिश सत्तेचा पाया हादरला, कारण जनतेने सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला.
❇️ ब्रिटिश सरकारला हे कळून चुकले की आता भारतात सत्ता राखणे कठीण होणार आहे.
❇️ दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनला आर्थिक आणि राजकीय अडचणींमुळे भारत सोडणे भाग पडले, आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.
9. शेतकरी चळवळ: चंपारण्य, खेडा व इतर भागातील शेतकरी चळवळी गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरु झाल्या.
10. किसान सभा: स्वातंत्र्य चळवळीमधील शेतकऱ्यांच्या सहभागासाठी किसान सभेची स्थापना.
11. कामगार चळवळ: 1827 मधे कलकत्ता येथे कामगारांनी आपल्या हक्कांसाठी संघटना सुरु केल्या.
12. आदिवासी चळवळ: ‘संताल आदिवासी चळवळ’ ही प्रमुख आदिवासी चळवळ, ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढली.
13. सुभाषचंद्र बोस: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते, आय.एन.ए.चे नेतृत्व.
11. बी.आर. आंबेडकर: भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक व आर्थिक स्वतंत्रतेवर भर दिला.
स्वाध्याय
I. रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा:
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 या साली झाली.
2. आर्थिक निःसारणच्या सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी मांडला.
3. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ अशी घोषणा बाळ गंगाधर टिळक नी केली.
4. अली बंधूंनी खिलाफत ही चळवळ सुरू केली.
5. मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या राष्ट्राच्या प्रस्ताव मांडला.
6. सा.श.1929 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षपद जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले.
7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तीने ‘महाड’ आणि काळारामदेऊळ प्रवेशासाठी चळवळ केली.
8. कॅप्टन लक्ष्मी सहगल यांनी भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या झाशी या रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.
9. दांडी या ठिकाणी गांधीजीनी मिठाचा सत्याग्रह केला.
10. 1942 या साली चले जाव (भारत छोडो) चळवळ झाली.
II. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा:
11. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक.
अ) महात्मा गांधी
ब) ए.ओ. हयूम
क) बाळ गंगाधर टिळक
ड) गोपाल कृष्णा गोखले
उत्तर – ब) ए.ओ. हयूम
12. ‘मराठा’ या वृत्तपत्राचे प्रकाशक –
अ) जवाहरलाल नेहरू
ब) रास बिहारी बोत्त
क) बाळ गंगाधर टिळक
ड) व्हि. डी. सावरकर
उत्तर – क) बाळ गंगाधर टिळक
13. स्वराज पार्टीची स्थापना….या साली झाली.
अ) 1924
ब) 1923
ड) 1906
क) 1929
उत्तर – अ) 1924
14. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हरिपुर मधील सभेचे अध्यक्ष हे होते.
अ) सरदार वल्लभभाई पटेल
ब) डॉ. बी. आर. आंबेडकर
क) लाल लजपत राय
ड) सुभाषचंद्र बोस
उत्तर – ड) सुभाषचंद्र बोस
15. भारताचे पोलादी पुरुष……… हे होते.
अ) भगत सिंग
ब) चंद्रशेखर अजाद
क) अबुल कलाम आझाद
ड) सरदार वल्लभभाई पटेल
उत्तर – ड) सरदार वल्लभभाई पटेल
III. खालील प्रश्नांची समूहात चर्चा करून उत्तरे लिहा:
16. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी भारतात कोणत्या संघटना होत्या?
उत्तर – भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वी भारतात पुणे सार्वजनिक सभा, इंडियन असोसिएशन, हिंदू मेळा,इस्ट इंडिया असोसिएशन या संघटना होत्या.
17. मवाळांनी ब्रिटीशांसमोर कोणकोणत्या मागण्या केल्या?
उत्तर – मवाळांनी ब्रिटीशांसमोर उद्योगधंद्यांची वाढ करणे,संरक्षण खात्यावरील खर्च कमी करणे,शिक्षण क्षेत्रात विकास साधणे इत्यादी अनेक मागण्या केल्या.
18. आर्थिक निःसारणाच्या सिद्धांताचे विश्लेषण करा.
उत्तर – दादाभाई नौरोजी यांनी इंग्रज काळातील भारताच्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी आर्थिक निःसारण (Drain theory) हा सिद्धांत मांडला.यानुसार इंग्रजांनी भारतातील साधन संपत्ती इंग्लंडला नेल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आणि देशाचा विकास मंदावला.
उदा. इंग्रजांनी भारतात स्वस्त माल आयात केला आणि भारतातील महागडा माल इंग्लंडला निर्यात केला. यामुळे भारतात व्यापारी तूट वाढली.
19. स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांची नावे लिहा.
उत्तर – श्यामकृष्ण वर्मा,व्ही.डी.सावरकर,भगतसिंग,चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस,राजगुरू, बटुकेश्वर दत्त,अरविंदो घोष आणि खुदीराम बोस इत्यादी स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख क्रांतीकारक होते.
20. स्वातंत्र्य लढ्यातील बाळगंगाधर टिळकांची भूमिका स्पष्ट करा.
उत्तर – बाळगंगाधर टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि टो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना केली.त्यांनी ब्रिटिश शासनाच्या विरोधात संघर्ष करताना ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रातून जनतेला जागृत केले.गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाचे आयोजन करून लोकांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला.लोकांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी लिखाण केले.टिळकांनी तुरुंगामध्ये गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.
21. बंगालची फाळणी रद्द करण्याची कारणे कोणती?
उत्तर – लॉर्ड कर्झनने प्रशासकीय कारणांसाठी बंगालची फाळणी केली.पण लोकांचा तीव्र विरोध आणि आंदोलने स्वदेशी चळवळीचा प्रभाव,हिंदू-मुस्लिम ऐक्य या कारणांमुळे बंगालची फाळणी रद्द करण्यात आली.
22. चौरी-चौरा घटनेचे वर्णन करा.
उत्तर – 1922 मध्ये चौरी-चौराची घटना घडली.उत्तर प्रदेशातील चौरी-चौरा येथे हजारोंच्या संख्येने लोकांनी भाग घेऊन पोलीस ठाण्याला आग लावली.यामध्ये 22 पोलीस अधिकारी जिवंत जाळले गेले.या हिंसेमुळे गांधीजी दु:खी झाले व त्यांनी असहकार चळवळ मागे घेतली.
23. मिठाच्या सत्याग्रहाचे वर्णन करा.
उत्तर – 1930 मध्ये गांधीजीनी आपल्या अनुयायांसह साबरमती आश्रम ते दांडीपर्यंत मीठ तयार करण्यासाठी पायी प्रवास केला.महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा कायदा तोडून ब्रिटिश राजवटीला विरोध केला.ही घटना इतिहासात ‘दांडी यात्रा’ म्हणून प्रसिद्ध आहे.
24. भारत छोडो (चले जाव) आंदोलनाच्या अपयशाची कारणे कोणती?
उत्तर – कॉंग्रेसने 8 ऑगस्ट 1942 रोजी चलेजाव चळवळ सुरु केली.पण खालील काही कारणांमुळे ही चळवळ अपयशी ठरली.
– गांधीजी,नेहरू,राजेंद्र प्रसाद इत्यादी प्रमुख नेत्यांना इंग्रजांनी अटक केल्यामुळे नेतृत्वाचा अभाव निर्माण झाला.
– इंग्रजांची दडपशाही
– मुस्लिम लीग आणि काही संस्थांनी चलेजाव चळवळीला विरोध केला.
25. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जहाल नेत्यांची नावे लिहा.
उत्तर – बाल गंगाधर टिळक
– बिपिन चंद्र पाल
– लाला लजपत राय
– अरविंदो घोष
– खुदीराम बोस
26. दुसऱ्या गोलमेज परिषदेचे परिणाम कोणते?
उत्तर –
27. स्वातंत्र्य चळवळीतील सुभाष चंद्र बोस यांच्या योगदानाबद्दल लिहा.
उत्तर – सुभाषचंद्र बोस हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वपूर्ण नेते होते. त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्यांच्या योगदानामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा मिळाली.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न: सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी, जपान आणि इतर देशांमध्ये जाऊन भारतीयांना एकत्र करून आझाद हिंद फौज स्थापन केली.
- आझाद हिंद फौज: आझाद हिंद फौज ही सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेली एक सशस्त्र सेना होती.या सैन्याने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत केली.
- ‘दिल्ली चलो’चा नारा: सुभाषचंद्र बोस यांनी ‘दिल्ली चलो’ हा नारा दिला. या नाऱ्यामुळे भारतीयांमध्ये उत्साह निर्माण झाला.
- भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत: सुभाषचंद्र बोस यांन ‘जय हिंद’ आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ या घोषणा देऊन भारतीयांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली.
सुभाषचंद्र बोस यांचे योगदान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला अविस्मरणीय ठरले.त्यांच्यामुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यात मोठी भूमिका होती.
28. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासीयांच्या बंडाचे वर्णन करा.
उत्तर – ईस्ट इंडिया कंपनीच्या कर आणि जंगल कायद्यांना विरोध म्हणून आदिवासी चळवळी सुरू झाल्या. ‘संताल बंड’ आणि ‘मुंडा चळवळ’ या प्रमुख आदिवासी चळवळी आहेत. कर्नाटकातील ‘हलगलीच्या शिकाऱ्यांचे बंड’ ही प्रसिद्ध आहे. ‘संताल आदिवासी चळवळ’ ही भारतातील जुनी चळवळ मानली जाते.ब्रिटिशानी आणलेल्या जमीनदारी पद्धतीला विरोध करण्यासाठी ही चळवळ करण्यात आली होती.संतप्त आदिवासींनी जमीनदार, सावकार, आणि इंग्रज अधिकारी यांच्याविरोधात गुप्त सभा घेऊन बंड पुकारले.
सरावासाठी प्रश्न
1. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?
उत्तर – 1885 साली.
2. मवाळ नेत्यांपैकी कोणता नेता प्रसिद्ध आहे?
उत्तर – दादाभाई नौरोजी.
3. जहाल नेत्यांपैकी एक नेता कोण होता?
उत्तर – बाळ गंगाधर टिळक.
4. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – 1905 साली.
5. बंगालच्या फाळणीचा उद्देश काय होता?
उत्तर – हिंदू-मुस्लिम समाजांत फूट पाडणे.
6. स्वदेशी चळवळ कोणत्या घटनेच्या विरोधात सुरू झाली?
उत्तर – बंगालच्या फाळणीच्या विरोधात.
7. महात्मा गांधींनी कोणते तत्व स्वातंत्र्य चळवळीसाठी वापरले?
उत्तर – सत्याग्रह.
8. गांधीजींच्या नेतृत्वाखाली कोणते आंदोलन सुरू झाले?
उत्तर – असहकार आंदोलन.
9. जालियनवाला बाग हत्याकांडात किती लोकांचा मृत्यू झाला?
उत्तर – 379 लोकांचा.
10. गांधीजींनी वकीली पदवी कोणत्या देशात घेतली?
उत्तर – इंग्लंडमध्ये.
11. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले?
उत्तर – 1919 साली.
12. स्वदेशी चळवळीत विदेशी वस्तूंवर काय घातले गेले?
उत्तर – बहिष्कार.
13. गांधीजींनी कोणत्या देशात सत्याग्रहाची सुरुवात केली?
उत्तर – दक्षिण आफ्रिकेत.
14. लोकमान्य टिळक कोणत्या वृत्तपत्रातून लिखाण करायचे?
उत्तर – केसरी.
15. रौलट अॅक्ट कोणत्या वर्षी लागू झाला?
उत्तर – 1919 साली.