10th SS 19.INDIA AFTER INDEPENDENCE स्वातंत्र्योत्तर भारत

STATE SYLLABUS

CLASS – 10

MARATHI MEDIUM

SUBJECT – SOCIAL STUDIES

PART – 2

HISTORY

प्रकरण 18

19. INDIA AFTER INDEPENDENCE

स्वातंत्र्योत्तर भारत

महत्त्वाचे मुद्दे आणि नोट्स
1. भारताची फाळणी आणि परिणाम
❇️ 3 जून 1947 रोजी लॉर्ड माउंटबॅटनच्या आदेशानुसार भारत आणि पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्रे झाली.
❇️ विभाजनामुळे मोठ्या प्रमाणात जातीय दंगे आणि निर्वासितांची समस्या निर्माण झाली.

2. निर्वासितांची समस्या
❇️ लाखो लोकांना आपापली गावे सोडून स्थलांतर करावे लागले.
❇️ निर्वासितांना अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले.

3. जातीय दंगे
❇️विभाजनामुळे हिंदू-मुस्लीम शत्रुत्व वाढले.
❇️महात्मा गांधींनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी उपोषण केले.

4. नवीन सरकारची स्थापना
❇️15 ऑगस्ट 1947 रोजी तात्पुरते सरकार स्थापन झाले.
पंतप्रधान: जवाहरलाल नेहरू
❇️ 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले.
❇️ डॉ. राजेंद्र प्रसाद हे पहिले राष्ट्रपती झाले.

5. संस्थानांचे विलिनीकरण
❇️भारतात 562 संस्थाने होती, ज्यांना संघराज्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले.
❇️सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थाने भारतात विलीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

6. गोवा आणि पाँडिचेरीचे विलीनीकरण
पाँडिचेरी: 1954 मध्ये फ्रेंचांनी पाँडिचेरी सोडले; 1963 मध्ये ते केंद्रशासित प्रदेश बनले.
गोवा: 1961 मध्ये भारताने सैन्य कारवाई करून गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केले.

7. भाषावार प्रांतरचना
पोट्टी श्रीरामलू यांच्या उपोषणानंतर 1953 मध्ये आंध्र प्रदेश भाषावार राज्य म्हणून स्थापन झाले.
1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संमत झाला, ज्यामुळे 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश स्थापन झाले.

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा:
1. लॉर्ड माउंटबॅटन हे भारतातील शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते.


2. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते.


3. डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.


4. 1962 साली पांडिचेरी केंद्रशासित बनला.


5. राज्य पुनर्रचना कायदा 1956 या साली अस्तित्वात आला.

II. खालील प्रश्नांची उत्तरे समूह चर्चा करून लिहाः 

6. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर कोणकोणत्या समस्या होत्या?
उत्तर –
 स्वातंत्र्यानंतर भारतासमोरनिर्वासितांची समस्या,जातीय दंगे,सरकारची स्थापना,अन्न आणि शेतीची समस्या,संस्थानांचे विलिनीकरण इत्यादी समस्या होत्या.

7. निर्वासितांच्या समस्या कशा पद्धतीने सोडविल्या? 

उत्तर –   विभाजनामुळे लोकांना आपली घरे व जमीन सोडावी लागली.भारत सरकारने त्यांना अन्न, वस्त्र, आणि निवारा देण्यासाठी शिबिरे उभारली. 

– निर्वासितांना रोजगार आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. 

– हळूहळू या निर्वासितांना समाजात स्थिर करण्याचे प्रयत्न सरकारने केले.

8. पाँडिचेरी फ्रेंचांच्या ताव्यातून कसे मुक्त झाले? 

उत्तर –   फ्रेंच वसाहती: पाँडिचेरी, करैकल, माहे आणि चंद्रनगर या फ्रेंच वसाहती होत्या. 

– भारतीयांनी स्वातंत्र्याची मागणी केली आणि काँग्रेससह इतर संघटनांनीही विलिनीकरणाचा आग्रह धरला. 

– 1954 मध्ये पाँडिचेरी भारतात विलीन झाले आणि 1963 मध्ये पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले.

9. गोवा पोर्तुगीजांच्या पासून कसा मुक्त झाला? 

उत्तर –  गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यामुळे भारताने गोवा सोडून देण्याची मागणी केली, पण पोर्तुगीजांनी ती नाकारली.म्हणून 1961 मध्ये,भारतीय सैन्याने गोवा जिंकले आणि तो भारताचा भाग झाला.सुरुवातीला गोवा केंद्रशासित प्रदेश होता, पण 1987 मध्ये ते घटक राज्य बनला.

10. भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेचे वर्णन करा. 

उत्तर –   राज्यकारभार लोकांना सोपा व्हावा यासाठी भाषेच्या आधारावर राज्यांची रचना करण्याची मागणी झाली. 

– 1953 मध्ये, पोट्टी श्रीरामलू यांच्या उपोषणानंतर आंध्र प्रदेश हे पहिले भाषावार राज्य बनले. 

– फजल अली आयोगाने राज्य पुनर्रचनेची शिफारस केली. 

– 1956 मध्ये, संसदेत ‘राज्य पुनर्रचना कायदा’ मंजूर करण्यात आला, आणि 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. 

– पुढे कर्नाटक, केरळ, आणि पंजाब यांसारखी राज्ये भाषेच्या आधारावर पुन्हा रचली गेली.

सरावासाठी प्रश्न आणि उत्तरे
1. भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते?

उत्तर –  लॉर्ड माउंटबॅटन
2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर –  जवाहरलाल नेहरू
3. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर –  डॉ. राजेंद्र प्रसाद
4. भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी का लागू झाले?
उत्तर –  भारत प्रजासत्ताक बनवण्यासाठी
5. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर –  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणता उपाधी दिली गेली?
उत्तर –  पोलादी पुरुष
7. जुनागढ राज्याचा नवाब कोणत्या देशात पळाला?
उत्तर –  पाकिस्तान
8. हैदराबादचे संस्थान कोणाच्या अधिपत्याखाली होते?

उत्तर –  निजाम

9. जम्मू आणि काश्मीर भारतात कधी सामील झाले?
उत्तर –  1949 मध्ये
10. गोवा कोणत्या देशाच्या ताब्यात होते?
उत्तर –  पोर्तुगीज
11. पोट्टी श्रीरामलू यांनी कोणत्या राज्यासाठी उपोषण केले?
उत्तर –  आंध्र प्रदेश
12. राज्य पुनर्रचना कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला?
उत्तर –  1956
13. भारताने गोवा कधी ताब्यात घेतले?
उत्तर –  1961
14. पाँडिचेरीला केंद्रशासित प्रदेश कधी घोषित केले गेले?
उत्तर –  1963
15. भारतामध्ये सध्या किती राज्ये आहेत?
उत्तर –  28 राज्ये

Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *