10th Marathi 7.Hirawe Sangati 7.हिरवे सांगाती| गुलजार

KTBS KARNATAKA

STATE SYLLABUS

CLASS – 10

MARATHI MEDIUM

SUBJECT – MARATHI

PART – 2

मराठी

परिचय:
          संपूरन सिंग कालरा (1936) हे कवी, गीतकार, नाटककार, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ते हिंदी आणि उर्दू भाषेत ‘गुलजार’ या टोपणनावाने लेखन करतात. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ‘मेरे अपने’, ‘आंधी’, ‘मौसम’, आणि ‘इजाजत’ यांचा समावेश आहे. त्यांनी कुसुमाग्रज यांच्या कवितांचा हिंदी आणि उर्दू भाषेत ‘कुसुमाग्रजकी चुनी सुनी नगमें’ या नावाने अनुवाद केला. 2002 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2004 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. गीतलेखनासाठी त्यांना ग्रॅमी आणि ऑस्कर पुरस्कारही मिळाले आहेत.
अनुवाद: सविता दामले
मूल्य: वृक्षप्रेम
साहित्य प्रकार: ललित लेख
संदर्भ ग्रंथ: ऋतुरंग दिवाळी अंक, अनुवाद – सविता दामले
टीपा:
राखी: सुप्रसिद्ध अभिनेत्री
शैलेंद्र: सुप्रसिद्ध हिंदी गीतकार
अमलतास/बहावा: पिवळी फुलं येणारा मोठा वृक्ष
चिनार: थंड हवामानात वाढणारा वृक्ष

सारांश –
      या पाठात कवी गुलजार यांनी झाडे आणि माणसातील घनिष्ठ नाते स्पष्ट केले आहे.ते म्हणतात की झाडे आणि माणसांवर वातावरणाचा एकसारखा परिणाम होतो.त्यांनी पिंपळ, जांभळ, कडुनिंब आणि गुलमोहोरासारख्या झाडांचे उल्लेख करत बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. झाडांबरोबर खेळताना त्यांनी अनुभवलेली शांतता आणि आनंद वर्णन केला आहे.झाडांशी संवाद साधल्याने त्या झाडांच्या वाढीवरही सकारात्मक परिणाम होतात,असेही गुलजार सांगतात.या पाठात निसर्गप्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.


प्र.1 खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.


1. गुलजार यांचे मूळ नाव काय?
उत्तर: संपूरन सिंग कालरा हे गुलजार यांचे मूळ नाव होते.


2. माणूस कोणाप्रमाणे आहे?
उत्तर: माणूस झाडासारखा आहे.


3. लेखकाचे बालपण कोणत्या गल्लीत गेले?
उत्तर:
लेखकाचे बालपण रोशनआरा गल्लीत गेले.

4. गुलजार यांना पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला?
उत्तर: 2004 साली गुलजार यांना पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला.

5. गुलजार झाडांना काय म्हणतात?
उत्तर: गुलजार झाडांना सांगाती म्हणतात.

  
6. जांभळाचे झाड लेखकाला कसे वाटते?
उत्तर: जांभळाचे झाड लेखकाला आजोबांप्रमाणे वाटते.

7. पपईचे झाड केव्हा मरते?
उत्तर: तीन वेळा फळ दिल्यानंतर पपईचे झाड मरते.

8. बांबूला केव्हा फुले येतात?
उत्तर: बांबूच्या वनाचा नाश होताना बांबूला फुले येतात.

9. कुसुमाग्रजांच्या कवितांच्या अनुवादाचे नाव काय?
उत्तर: ‘कुसुमाग्रजकी चुनी सुनी नगमें’ हे कुसुमाग्रजांच्या कवितांच्या अनुवादाचे नाव होय.

10. कुठल्या झाडाचा प्रत्येक भाग औषधी असतो?
उत्तर: पिंपळझाडाचा प्रत्येक भाग औषधी असतो.

11. कडूलिंबाच्या फुलांना लेखक काय म्हणतात?
उत्तर: कडूलिंबाच्या फुलांना लेखक झुमके म्हणतात.

12. पूर्वजांनी पिंपळाला कशाचे रूप दिले आहे?
उत्तर: पूर्वजांनी पिंपळाला देवाचे रूप दिले आहे.

13. बंगाली परंपरा कोणती आहे?
उत्तर: झाडांशी बोलणे ही बंगाली परंपरा आहे.

प्र.2: रिकाम्या जागा भरा


1.आसपासच्या वातावरणामुळे माणसाचा स्वभाव बदलतो.


2. पिंपळाचा प्रत्येक अवयव औषधीच्या रूपात आपल्या हाती येतो.


3. पिंपळाभोवती पार बांधतात.


4. आम्ही सगळे एकाच कुटुंबातले आहोत असे वाटते!


5. जांभळाचे झाड म्हणजे गारवा होय.


6. आजही माझं झाडाशी नातं आहे.


7. जणू काही तो साई असं देवाचं नाव घेतोय असे वाटते.


8. प्रख्यात कवी शैलेंद्र यांचं गाणं आहे.


9. कडुनिंबाची पांढरी पिवळी फुलं झुमक्यां प्रमाणे दिसतात.


10. असा तो …………………….लपंडाव पाहतांना खूप मजा येते.

प्र.3: खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांमध्ये उत्तरे लिहा.
1. ‘
मनुष्य एक झाडअसे लेखकास का वाटते?
उत्तर: लेखकास असे वाटते की,जसे झाडांवर वातावरणाचा परिणाम होतो,तसेच माणसांवरही होतो.त्यामुळे माणूस आणि झाड यांचे कौटुंबिक नाते आहे.म्हणूनच ‘मनुष्य एक झाड’ असे लेखकास वाटते.

2. लेखक व त्यांचे मित्र लहानपणी कोणकोणते खेळ खेळत?
उत्तर: लेखक आणि त्यांचे मित्र पिंपळाच्या पानांपासून खेळ करत. ते कुल्फीवाला आणि पानाचं दुकानही खोटं खोटं चालवत असत.

3. जांभळाच्या झाडाला लेखक गारवा का म्हणतात?
उत्तर: जांभळाच्या झाडाखाली लेखक आणि त्यांचे मित्र खेळत असत. त्या झाडाची सावली थंडगार वाटत असे, म्हणून ते झाड त्यांना गारवा वाटत असे.


4. लेखकाने गुलमोहोराची काळजी कशी घेतली?
उत्तर: लेखकाने आपल्या घरासमोरच्या जागेत फाटकाजवळ गुलमोहोराचे रोपटे लावले.सुरुवातीला गुलमोहर नाजूक असल्याने त्याची काळजी घेतली पाहिजे. लेखकाने गुलमोहोराभोवती कुंपण बांधून  आणि त्याला पाणी देऊन गुलमोहोराची काळजी घेतली.

5. बांबूच्या झाडाला फुले केव्हा येतात?
उत्तर: बांबूच्या वनाचा नाश होताना बांबूला फुले येतात आणि त्यानंतर झाड सुकते.

6. राखीने दिलेले झाड वाढत का नव्हते?
उत्तर: राखीने लेखकाला झाड देताना सांगितले होते की,त्याच्याशी बोलावे लागते,कारण बंगाली परंपरेत असे करतात. लेखकाने झाडाची नीट काळजी घेतली,पण त्याच्याशी बोलले नव्हते.म्हणून ते झाड नीट वाढत नव्हते.

7. पानगळीच्या मोसमात कोणती वरात चालते?
उत्तर: पानगळीच्या मोसमात लाल, पिवळी, आणि केशरी पाने खाली पडतात, जणू रंगीबेरंगी वरातच चालली आहे.

प्र. 4 खालील प्रश्नांची उत्तरे पाच ते सहा वाक्यात लिहा:
(1)
माणूस झाडासारखा असतो म्हणजे काय?
उत्तर: माणसाचे आणि झाडांचे नाते खूप जिव्हाळ्याचे आहे. दोघांवरही ऊन, सावली, थंडी, आणि उष्णतेचा परिणाम होतो. झाडांप्रमाणेच माणसाचा स्वभावही त्याच्या आसपासच्या वातावरणानुसार बदलतो. झाडांसोबत माणसाचं एक कौटुंबिक नातं असल्यासारखं वाटतं. म्हणूनच लेखकाला माणूस हा झाडासारखा वाटतो. माणूस आणि झाड दोघेही एकाच साखळीचे महत्त्वाचे घटक आहेत.

(2) जांभळाच्या झाडाबद्दल लेखकाच्या कोणकोणत्या आठवणी आहेत?
उत्तर: लेखकाच्या लहानपणी जांभळाचं झाड त्याच्यासाठी सावली आणि गारवा देणारा सोबती होता. त्या झाडाखाली तो आणि त्याची मित्रमंडळी गोट्या खेळायचे. उन्हाळ्यात ती झाडाची सावली मुलांसाठी आधारवड होती, जणू एखाद्या वडिलांसारखी. घरातील लोकं बाहेर जाऊ देत नसत, पण जांभळाच्या झाडाखाली खेळायचं सांगितलं की ते परवानगी देत. लेखकाला हे झाड आजोबांसारखं वाटायचं, जणू ते त्यांना आशीर्वाद देतंय.

(3) चाफ्याच्या झाडाला लेखक “बडी माँ” का म्हणतात? त्याची गंमत कोणती?
उत्तर: चाफ्याच्या झाडाला पान तोडल्यावर पांढऱ्या दुधासारखा चीक येतो, म्हणून लेखकाने त्याला “बडी माँ” असं नाव दिलं. या झाडात एक मजेशीर लपंडाव असतो.फुलं आली की पाने दिसत नाहीत, आणि पानं आली की फुलं गायब होतात. लेखकाला असं वाटतं की पानं आणि फुलं बडी माँच्या अंगावर बागडत आहेत. हा लपंडाव पाहणं लेखकाला आनंद देतो.

(4) जंगलात पानगळीच्या दिवसात कोणते दृश्य दिसते?
उत्तर: पानगळीत झाडं हिरवा रंग सोडून लाल, पिवळ्या, आणि केशरी रंगांनी भरतात. बहावा आणि चिनारची झाडं रंगीबेरंगी वरात काढल्यासारखी भासतात. झाडांवरून गळालेली लाल पानं जमिनीवर सांडून रंगोत्सव घडवतात.हे दृश्य पाहून लेखकाचं मन हरपून जातं.चंद्रही त्या पानांसारखा पिवळसर-केशरी वाटतो.

प्र.5 संदर्भासह स्पष्टीकरण (सोप्या भाषेत)
1) ‘‘तो वृक्ष राखीचा आहे.”
संदर्भ :
हे वाक्य ‘‘हिरवे सांगाती’’ या पाठातून घेतले असून गुलजार हे या पाठाचे लेखक आहेत.
स्पष्टीकरण : अभिनेत्री राखीने गुलजार यांना एक झाड भेट दिले होते.त्यांनी ते झाड आपल्या अंगणात लावले आणि त्याची काळजीपूर्वक निगा राखली. म्हणून लेखक म्हणतात, ‘‘तो वृक्ष राखीचा आहे.”

2) ‘‘झाडे चैतन्यशील असतात.”
संदर्भ :
हे वाक्य ‘‘हिरवे सांगाती’’ या पाठातून घेतले असून लेखक गुलजार आहेत.
स्पष्टीकरण : लेखक म्हणतात की,झाडांवर त्यांचे खूप प्रेम आहे. त्यांनी झाडांवर अनेक कविता केल्या आहेत, कारण झाडांजवळ त्यांना शांत आणि आनंदी वाटते. झाडांसाठी ते लांबवर प्रवासालाही जातात, कारण झाडांमध्ये त्यांना चैतन्य जाणवते.

प्र.6 खालील प्रश्नांची उत्तरे आठ-दहा वाक्यांत (सोप्या भाषेत)
1) ‘‘हिरवे सांगाती’’ या पाठात आलेल्या वृक्षांची वैशिष्ट्ये
उत्तर:
‘‘हिरवे सांगाती’’ या पाठात आलेल्या वृक्षांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे –

  पिंपळ: प्राचीन वृक्ष असून औषधी गुणधर्म असतात.

  जांभळाचे झाड: उन्हाळ्यात सावली देते आणि फळंही मिळतात.

  बांबू: फुलं आल्यानंतर वनाचा नाश होतो.

  कडूलिंब: झाड औषधी आहे आणि त्याची पांढरी फुलं कानातील झुमक्यासारखी वाटतात.

  चाफा: पानं आणि फुलं लपंडाव खेळतात – पानं असली की फुलं गायब आणि फुलं आली की पानं गळून पडतात.

  पपई: तीन वेळा फळ दिल्यानंतर मरते.

  गुलमोहर: लाल फुलं मुकुटासारखी दिसतात आणि जून ते सप्टेंबरपर्यंत त्याला शेंगा लागतात.

भाषाभ्यास  :
खालील वाक्यातील अलंकार ओळखा व लक्षणे लिहा.
1. झाड म्हणजे आमची दोस्तमंडळीच!

अलंकार: उपमा अलंकार
लक्षण: झाडांची तुलना मित्रांसोबत केली आहे,जणू ते सोबती आहेत.

2. जांभळाच्या झाडाजवळ खेळतांना जणू आजोबांजवळ खेळतोय असे वाटे!
अलंकार: चेतनगुणोक्ती अलंकार
लक्षण: झाडाला जिवंत आजोबा मानल्याने बालपणाच्या भावना उलगडतात.

3. कडूनिंबाची छोटी छोटी फुले म्हणजे झुमकेच!
अलंकार: रूपक अलंकार
लक्षण: फुलांना कानातले झुमके म्हणत, त्यांचं रूप स्पष्ट केलं आहे.

4. चंद्रही पिकल्या पानासारखा टपकन् हिरवळीवर पडेल.
अलंकार: उपमा अलंकार
लक्षण: चंद्राची तुलना पिकलेल्या पानाशी केली आहे.

“चेतनगुणोक्ती” अलंकाराची उदाहरणे आणि सौंदर्य:

चेतनगुणोक्ती अलंकारात निर्जीव वस्तूंना किंवा झाडांना सजीव (जिवंत व्यक्तीचे) मानून त्या सजीवांप्रमाणे वागत आहेत असे वर्णन आलेले असते.

उदाहरणे:
1. जांभळाच्या झाडाजवळ खेळतांना जणू आजोबांजवळ खेळतोय असे वाटे.
सौंदर्य:
झाडाला जिवंत आजोबांचा मानल्याने बालपणाच्या भावना उलगडतात.

2. झाड म्हणजे आमची दोस्तमंडळीच!
सौंदर्य:
झाडांना दोस्त मानून मानवी नात्यांचा अनुभव व्यक्त केला आहे.

  1.  जुने – नवे
    2. थंड – गरम
    3. रात – दिवस
    4. मोठे – छोटे
    5. काळजी – निर्धास्त
    6. उष्णता – गारवा
    7. गोड – आंबट
    8. लहान – मोठे
    9. पानगळ – पानफुट
    10. उजाड – हिरवेगार

1. पिंपळाचे महत्त्व काय आहे?
2. लेखकाने कोणते खेळ खेळले?
3. लेखकाचा बालपणातील आवडता झाड कोणते होते?
4. पिंपळाचा प्रत्येक अवयव कशासाठी उपयुक्त आहे?
5. बांबूचे झाड कधी फुलते?
6. लेखक जांभळाच्या झाडाला गारवा का म्हणतात?
7. गुलमोहोराची फुले कोणत्या रंगाची असतात?
8. झाडांशी संवाद साधल्याने काय होते?
9. लेखकाची झाडांशी नाळ कशी जुळली?
10. लेखक कोणकोणत्या झाडांना प्रिय मानतो?
11. लेखक प्रवासाला कधी निघतो?
12. झाडांच्या संगतीत लेखकाला कसे वाटते?
13. पानगळ म्हणजे काय?
14. लेखकाने ‘बडी माँ’ हे नाव कोणत्या झाडाला दिले?
15. पिंपळाभोवती पार बांधण्याचे कारण काय?


Share with your best friend :)