इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
नागरिक शास्त्र
पाठ 8
8. OUR CONSTITUTION
आपले संविधान
अभ्यास
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होते.
2. आपले भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले.
3. संसदेची दोन सदने लोकसभा आणि राज्यसभा.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. संविधान म्हणजे काय? याचा आम्हाला काय फायदा आहे?
उत्तर – एखाद्या देशाने अनुसरलेले मुलभूत कायदे म्हणजे संविधान होय.
संविधान आपल्या देशाच्या कारभारासाठी आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये निश्चित करण्यासाठी याचा फायदा होतो.
2. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते ?
उत्तर – डॉ.राजेंद्रप्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते.
3. डॉ.बी.आर. आंबेडकर यानी संविधान रचना कार्यात कोणते योगदान दिले?
उत्तर – डॉ.बी. आर. आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
4. गणराज्य म्हणजे काय ?
उत्तर – प्रजेकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी मार्फत कारभार चालविला जातो त्या व्यवस्थेला गणराज्य असे म्हणतात.
5. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ?
उत्तर – संविधानात्मक सर्वधर्मसमभावाला धर्मनिरपेक्षता असे म्हणतात यामध्ये जात, पंथ, धर्म यात भेदभाव नसलो.
6. संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
उत्तर – 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करतात.
7. भारतीय संविधान रचना सभेतील महिला सदस्यांची नांवे सांगा.
उत्तर – संविधान सभेच्या महिला सदस्यांमध्ये राजकुमारी अमृत कौर,लिला रॉय,मालती चौधरी,सरोजिनी नायडू, बेगम एजाज रसूल, विजयालक्ष्मी पंडित आणि इतरांचा समावेश होता.